Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 112 (23rd April 2021) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक कृबास-0120/प्र.क्र. 19/21-स

Published 23 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ५०] शुक्रवार, एप्रिल २३, २०२१/वैशाख ३, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ११२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २२ एप्रिल २०२१.

आदेश

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि १९६७.

क्रमांक कृबास-०१२०/प्र.क्र.१९/२१-स.–ज्याअर्थी, जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेला साथीचा रोग (Pandemic) कोरोना विषाणू (कोविड-१९) मुळे जगभर उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात दिनांक २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू होता. कोरोनाचा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या अनेक उपायांत Social Distance पाळणे महवाचे व आवश्यक असल्यामुळे, राज्यातील ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत अशा कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका वाचा क्र. १ येथील आदेशानुसार वेळोवळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्याचा प्रबळ अंमलबजावणी सुरू आहे. परंतु, साथीचा रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार असल्याने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका दिनांक २४ जानेवारी २०२१ पासून ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. आणि सदर आदेशाची मुदत दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी समाप्त होत आहे ;

ज्याअर्थी, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीकरीता ग्रामपंचायत सदस्य आणि कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था येथून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत, अशा राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाया कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणुका वाचा क्र. ०२ येथील आदेशानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पयर्ंत कोविड-१९ चा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे उचित होणार आहे ;

ज्याअर्थी, मार्च, २०२१ पासून राज्यात कोविड-१९ चा दररोज वाढत असलेला प्रादुर्भाव व त्यामुळे मोठया प्रमाणात वाढत असलेली रुग्णांची संख्या विचारात घेऊन, कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी वाचा क्र. ०३ येथील आदेशानुसार "Break the chain" अंतर्गत राज्यात कलम १४४ लागु करून काही अंशी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशा परिस्थितीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सद्यस्थितीत घेणे उचित होणार नाही ; (१) भाग चार-ब-११२–१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल २३, २०२१/वैशाख ३, शके १९४३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.