Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 114 (27rd April 2021) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक कृबास.120/प्र.क्र.19/21-स

Published 27 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

मंगळवार , एप्रिल २७ , २०२१/वैशाख ७ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ५२ ]

[पृष्ठे २, किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ११४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) , नियम व आदेश.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ एप्रिल २०२१ .

वाचा.- १. समक्रमांकाचे शासन आदेश दिनांक २४ जानेवारी २०२० , १० जुलै २०२० व २२ जानेवारी २०२१ .

२ . या विभागाचे आदेश क्र . संकिर्ण ०१२० /प्र.क्र . ७० / १३स , दिनांक ६ एप्रिल २०२१ .

३. महसूल व वन विभागाचे दिनांक ४ मार्च २०२१ व १३ एप्रिल २०२१ रोजीचे आदेश .

आदेश

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनियमन ) अधिनियम, १ ९ ६३ आणि नियम, १ ९ ६७ .

क्रमांक कृबास . १२० /प्र.क्र. ११९ / २१ -स. ज्याअर्थी , जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेला साथीचा रोग ( Pandemic) कोरोना विषाणू ( कोविड-१ ९ ) मुळे जगभर उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता , कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात दिनांक २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू होता . कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या अनेक उपायांत Social Distance पाळणे महत्वाचे व आवश्यक असल्यामुळे , राज्यातील ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत अशा कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका वाचा क्र. १ येथील आदेशानुसार वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अंमलबजावणी सुरू आहे. परंतु , साथीचा रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार असल्याने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका दिनांक २४ जानेवारी २०२१ पासून ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत . आणि सदर आदेशाची मुदत दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी समाप्त होत आहे ;

ज्याअर्थी , कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता ग्रामपंचायत सदस्य आणि कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था येथून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत , अशा राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणुका वाचा क्र. २ येथील आदेशानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यत कोविड-१ ९ चा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे उचित होणार आहे ;

(१)

भाग चार- ब- ११४-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब , एप्रिल २७ , २०२१/वैशाख ७ , शके १ ९ ४३ ज्याअर्थी, मार्च २०२१ पासून राज्यात कोविड-१ ९ चा दररोज वाढत असलेला प्रादुर्भाव व त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत असलेली रुग्णांची संख्या विचारात घेऊन , कोविड-१ ९ चा प्रभाव कमी करण्यासाठी वाचा क्र . ३ येथील आदेशानुसार " Break the chain " अंतर्गत राज्यात कलम १४४ लागू करून काही अंशी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे , अशा परिस्थीतीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सद्यःस्थितीत घेणे उचित होणार नाही ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनियमन ) अधिनियम , १ ९ ६३ (यानंतर " APMC Act , १ ९ ६३ " असा उल्लेख आहे) मधील कलम १४ (३ - अ ) नुसार कोणत्याही नैसर्गीक आपत्तीच्या कारणास्तव कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका १ वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास आहेत. या तरतुदीनुसार आतापर्यंत १ वर्षापर्यंत निवडणुका वाचा क्र. १ येथील आदेशानुसार पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु , APMC Act , १ ९ ६३ च्या कलम ५ ९ नुसार , APMC Act , १ ९६३ मधील कोणत्याही उपबंधातून बाजार समित्यांना सूट देण्याचा शासनास अधिकार आहे . त्यामुळे या प्राप्त अधिकारानुसार कोरोना विषाणू ( कोविड-१ ९ ) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता , सध्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे APMC Act , १ ९ ६३ च्या कलम १४ (३ - अ ) मध्ये शिथीलता देऊन , बाजार समित्यांच्या निवडणुका आणखी पुढे ढकलणे आवश्यक झाल्याची शासनाची खात्री झाली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनयमन ) अधिनियम , १ ९ ६३ मधील कलम ५ ९ च्या तरतुदीअन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे असे आदेश देत आहे की

(१ ) ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत व ज्या प्रकरणी मा . उच्च/ मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे विवक्षित आदेश दिले आहेत , अशा कृषी उत्पन्न बाजार समित्या वगळून , राज्यातील इतर कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका दिनांक २४ एप्रिल २०२१ पासून आणखी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

( २ ) या आदेशाच्या दिनांकास ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळे कार्यरत आहेत , परंतू वरील मुदतवाढीच्या कालावधीत ज्या संचालक मंडळाची मुदत ( Term) संपणार आहे , अशा संचालक मंडळांविरुद्ध अनियमिततेबाबत तक्रारी आहेत व अशा तक्रारीनुसार प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे , अशी संचालक मंडळे वगळून इतर संचालक मंडळाना , निवडणुका पुढे ढकलण्याचा म्हणजेच दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे . तथापि, अशा संचालक मंडळांना , त्यांचा ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यांनतरच्या पुढील लगतच्या दिनांकापासून , मुदतवाढ मिळाल्याच्या दिनांकापर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही , त्यांना फक्त अंतरिम व्यवस्था म्हणून काम पहाता येईल .

(३ ) सदर आदेशाच्या दिनांकास , ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहेत, त्या प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळास दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

का. गो. वळवी , शासनाचे उप सचिव .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.