Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Weekly (13-19 May 2021)

Published 13 May 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 31732

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- अ

वर्ष ७ , अंक १४]

गुरुवार ते बुधवार , मे १३-१९ , २०२१/वैशाख २३-२९ , शके १ ९ ४३

[पृष्ठे ५

[ किंमत : रुपये ९.०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ मे २०२१

अधिसूचना

क्रमांक उचौस -२०२१/प्र.क्र.५७ /का-२१ , दिनांक ३० मार्च २०२१ अन्वये श्री. परम बीर सिंह यांनी त्यांच्या दिनांक २० मार्च २०२१ रोजीच्या पत्रात तत्कालीन मा . गृह मंत्री , गृह यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याकरीता उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती मा. श्री . कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची उपरोक्त नमुद शासन निर्णयान्वये एक सदस्यीय उच्च स्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. सदर उच्चस्तरीय चौकशी समितीस शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक उचौस-२०२१ /प्र.क्र.५७ / का-२१ , दिनांक ३ मे २०२१ अन्वये चौकशी आयोग अधिनियम, १ ९ ५२ (१ ९ ५२ चा ६० ) मधील कलम ४ , ५ , ५ अ, ८ व ९ लागू करण्यात आले आहे .

त्याअर्थी , कलम ४ व ८ नुसार खाली नमुद नियमावली प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मा. न्या. के. यु. चांदीवाल उच्चस्तरीय चौकशी समिती कार्यपध्दतीचे नियम [कलम ४ व ८ चौकशी आयोग कायदा , १९ ५२ नुसार]

१. मा. चौकशी आयोगाचे ठिकाण: - जुने सचिवालय , विस्तारित इमारत, २ रा मजला, फोर्ट, मुंबई- ३२ .

२. मा. चौकशी आयोगाची वेळ सकाळी ११-३० ते १-३० व दुपारी २-३० ते ५-३० अशी राहील . शासकीय सुट्ट्या व्यतिरिक्त सोमवार ते शुक्रवार कामकाज चालेल.

३. मा . आयोगाचे रजिस्ट्रार / प्रबंधक/ सचिव यांना आयोगाचे हुकुमाप्रमाणे समन्स, नोटीसा व पत्रव्यवहार यावर सही करण्याचा अधिकार आहे. मा . आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणीची तारीख निश्चित करून साक्षीदार/ पक्षकारांना नोटीस / समन्स काढली जाईल .

४. जरूर आहे. या नियमाचा भंग करणाऱ्यावर चौकशीचे कामात व्यत्यय आणण्याबद्दल योग्य ती कारवाई करण्यात येईल . चौकशीचे कामकाज मा. आयोगाचे हॉल मध्ये चालेल . हॉलमध्ये बसणाऱ्या सर्वांचे मोबाईल फोन बंद अथवा शांत स्वरूपात ठेवणे

(१)

भाग चार-अ-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, मे १३-१९, २०२१ / वैशाख २३-२९ , शके १ ९ ४३

५. चौकशीचे कामात कोणाला वकील लावणे असल्यास तशी त्यास परवानगी आहे. तथापि वकील नाहीत म्हणून मुदत मिळणार नाही. वकीलास हजर ठेवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर राहील . वकील नसले तरी चौकशीचे कामकाज चालू राहील. तथापि , वकीलाचे अथवा व्यक्तीचे आजारपणामुळे येणे शक्य नसले तर मुदतीबाबत आयोग तारतम्याने विचार करेल .

६. कागदपत्रे हजर करण्यास , साक्षीदार आणण्यास अथवा केसची तयारी करण्याचे कारणावरून मुदत मिळणार नाही. वकील गैरहजर अथवा कोर्टात काम करीत आहेत या कारणावरून मुदत मिळणार नाही.

७. साक्ष सुरू झाल्यावर त्याची साक्ष पूर्ण होईतो कामकाजाचे वेळात रोजचे रोज सुरू राहील . साक्षीदारास कागदपत्रांवरून विचारणा करणार असल्यास त्याची पूर्व तयारी ही संबंधित व्यक्तिची जबाबदारी राहील. व त्या निमित्ताने मुदत मिळणार नाही .

८. साक्षीदारास हजर ठेवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील . आयोगास जरूर वाटल्यास वस्तुनिष्ठ मुल्यमापनानुसार ( objective assessment ) आयोग समन्स/ नोटीस काढून साक्षीदारास बोलावतील .

९. साक्षीदाराची सर तपासणी प्रतिज्ञापत्राने होईल . त्या साक्षीदाराची उलट तपासणी ( Cross Examination ) आयोगाचे चौकशी मुद्दे/कक्षा यास अनुसरून थोडक्यात राहील. उलटतपासणीत एकाहून अधिक प्रश्नांचा एकत्रित एक प्रश्न , मोघम , संदिग्ध नसावेत. मा. आयोगाचे वकील गरजेनुसार साक्षीदारांना उलट तपासणीत प्रश्न विचारू शकतात . प्रश्न व उत्तर रेकॉर्डवर घेणे बद्दल मा . चौकशी आयोगाचा निर्णय अखेरचा राहिल .

१०. चौकशीचे काम फक्त प्रतिज्ञापत्राचे व कागदपत्रांचे आधारे करायचे की तोंडी पुरावे घ्यायचे याचा निर्णय मा . आयोग घेतील.

११. साक्षीदारांचा क्रम मा. आयोग , वकीलांचे म्हणणे ऐकून व एकूण परिस्थितीनुरुप घेतील . साक्षीदारांची सरतपासणी त्याचे प्रतिज्ञापत्राने होईल व त्याचा उलट तपास घेण्याची मुभा विरूद्ध बाजूस राहील.

१२. साक्षीपुरावे मराठीत / इंग्रजीत नोंदले जातील.

१३. जबानी नोंदवितांना अनावधानाने झालेल्या चुका असल्यास त्या दुरूस्त करण्यास त्याच दिवशी अगर दुसऱ्या दिवशी सकाळचे सत्रात नजरेस आणल्यास विरूद्ध बाजूचे म्हणणे ऐकून दुरुस्ती करावी किंवा नाही हे ठरविले जाईल . याशिवाय दुसरे आक्षेप विचारात घेतले जाणार नाही .

१४. नोंदलेले ( रजिस्टर्ड ) दस्तऐवज मूळ कागद किंवा त्याची प्रमाणित नक्कल शाबिती शिवाय विचारात घेतले जातील . तथापि जरूरीप्रमाणे अशा कागदपत्रांची शाबितीबाबत मा . आयोग ठरवतील.

१५. झेरॉक्स कॉपीज बद्दल सर्व पक्षांचे एकमत असल्यास त्याच्या शाबितीची जरूरी पडणार नाही , पण एखादया पक्षाची योग्य कारणांवरून हरकत असल्यास त्या झेरॉक्सची शाबिती जरूर राहील .

१६. सरकारी कागदपत्रे , रेकॉर्ड व सार्वजनिक संस्था, बँक यांच्या प्रमाणित नकला शाबिती शिवाय स्विकारल्या जातील.

१७. वर्तमानपत्रातील मजकूर विचारात घेतला जाणार नाही.

१८. कामकाजातील कागदपत्रांच्या नकला मिळणेबाबतचा निर्णय , त्यासाठी उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करून घेतला जाईल , व त्याचा खर्च संबंधित पक्षकारास करावा लागेल .

१ ९ . समन्स, नोटीसा रजिस्टर्ड पत्र पोहोच पावतीसह पोस्टामार्फत संबंधित व्यक्तीच्या खर्चाने पाठविले जातील . व ते पोस्टाने पाठविण्याची तजवीज संबंधित व्यक्तीस करावी लागेल . साक्षीदारास हजर ठेवण्याची जबाबदारी संबंधित पक्षकारावर राहील . साक्षीदार गैरहजर असल्याचे कारणावरून मुदत देणे वस्तुनिष्ठ निर्णयावर अवलंबून राहिल.

२०. साक्षीसाठी कोणास बोलावणे, कागदपत्रे हजर करण्यास समन्स/ नोटीसा पाठविणे मा. आयोगाच्या अखत्यारीत असेल.

२१. सिव्हिल प्रोसिजर कोड , क्रिमिनल प्रोसिजर कोड व पुराव्यासह कायदा यांच्या तांत्रिक तरतुदी व नियम या आयोगाचे कामकाजास लागू नाहीत. तथापि सर्वसाधारणपणे नैसर्गिक न्यायाचे नियम व वरील कायद्याची मार्गदर्शक सूत्रे याचा विचार करून निर्णय घेतले जातील . यास अपवाद कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्टचे कलम क्रं. ४ मधील तरतुदींचा राहील.

२२. मा . आयोगाच्या कामकाजा संबंधाने यथायोग्य रिपोर्ट करण्यास हरकत नाही . विशेष परिस्थितीत साक्षीदाराचे जबाब , जबानी ही इनकॅमेरा घेण्यात येईल.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, मे १३-१९ , २०२१ /वैशाख २३-२९, शके १ ९ ४३

२३. मा. आयोगाचे कामकाजाचे संपूर्ण काळात कामकाजाबद्दल वर्तमानपत्रात मत प्रदर्शन, लेख अथवा आयोगाचे कार्यकक्षेतील विषयासंबंधी लेख , मत प्रदर्शन वर्तमानपत्रात अथवा स्वतंत्रपणे छापून अथवा संगणक इंटरनेट मार्फत प्रसिध्द करता येणार नाही. या नियमाचा भंग करणाऱ्याने मा. आयोगाचे कामकाजात बाधा आणली असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल .

२४. या नियमात आवश्यकतेप्रमाणे बदल , दुरुस्त्या करण्याचे अधिकार आयोगास आहेत.

भैय्यासाहेब बेहेरे , मुबंई,

दिनांक ११ मे २०२१ .

प्रबधंक,

उच्चस्तरीय चौकशी समिती .

भाग चार-अ-२ ४

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार , मे १३-१९ , २०२१/ वैशाख २३-२९ , शके १ ९ ४३

महसुल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ मे २०२१ .

अधिसूचना

जैविक विविधता अधिनियम , २००२ .

क्रमांक डब्ल्यूएलपी -०२१५/प्र.क्र. ३६/फ-१.-जैविक विविधता अधिनियम , २००२ ( २००३ चा १८ ) च्या कलम २२ अनुसार तसेच याबाबतीत इतर सर्व अधिकारांचा वापर करून व शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग , क्रमांक डब्ल्यूएलपी-१०० ९ /प्र.क्र . १५ ( भाग ३ ) /फ-१ , दिनांक २ जानेवारी २०१२ आणि डब्ल्यूएलपी -१०० ९/प्र.क्र . १५ / फ-१ , दिनांक ३ जुलै २०१४ यांचे अधिक्रमण करून , महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळावर पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती खालीलप्रमाणे करीत आहे: -

१ . सचिव , कृषि विभाग

२. सचिव , आदिवासी विकास विभाग

३ . प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) , महाराष्ट्र राज्य, नागपूर

४ . राज्यातील चार कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रत्येकी एक वर्षासाठी चक्राकार पद्धतीने.

५. सचिव , पदुम व पणन विभाग

राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांचा मंडळावर नियुक्तीचा चक्रानुक्रम खालीलप्रमाणे राहील: -

१. कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख , कृषि विद्यापीठ , अकोला.

२ . कुलगुरू , डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषि विद्यापीठ , दापोली .

३. कुलगुरू, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी .

४. कुलगुरू, महात्मा फुले, कृषि विद्यापीठ, राहुरी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

गजेंद्र नरवणे ,

उप सचिव (वने) , महसूल व वन विभाग .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, मे १३-१९ , २०२१ / वैशाख २३-२९ , शके १ ९ ४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk Mantralaya , Mumbai 400 032 , dated 11th May , 2021

NOTIFICATION

BIOLOGICAL DIVERSITY ACст , 2002 .

No. WLP - 0215/CR - 36/F -1 . In exercise of the powers conferred under section 22 of the Biological Diversity Act , 2002 ( 18 of 2003 ) and in supersession of the Government Notification Revenue and Forest Department , No. WLP - 1009 / C.R.15 (Part 3 )/F - 1 , dated 2nd January 2012 and WLP - 1009/C.R.15/F - 1 , dated 3rd July 2014 , the State Government of Maharashtra hereby appoints the following ex - officio members to the Maharashtra State Biodiversity Board :

1. Secretary , Agriculture Department .

2. Secretary , Tribal Development Department .

3. Principal Chief Conservator of Forests (Wildlife) .

4. Vice - Chancellors of the 4 Agricultural Universities of the State on rotational basis for a period of one year each .

5. Secretary Animal Husbandry, Dairy Development and Fisheries .

The sequence of rotation to be followed for the appointment of Vice Chancellors of the Agricultural University of the State to the Board is given hereunder :-

1. Vice Chancellor , Dr. Panjabrao Deshmukh , Krishi Vidyapeeth, Akola

2. Vice Chancellor , Dr. Balasaheb Sawant , Konkan Krishi Vidyapeeth , Dapoli 3. Vice Chancellor , Vasantrao Naik , Marathwada Krishi Vidyapeeth , Parbhani 4. Vice Chancellor , Mahatma Fule , Krishi Vidyapeeth , Rahuri .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

GAJENDRA NARWANE , Deputy Secretary to the Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.