RNI No. MAHBIL/ 2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
मंगळवार , मे १८ , २०२१ /वैशाख २८ , शके १ ९ ४३
वर्ष ७, अंक ३१]
[पृष्ठे २, किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ४१
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) , काळ प्रकल्प क्र. २ , माणगाव यांजकडून
क्रमांक उजिभू- भूसं/ कात-१ / एस आर ५४६/३२-२/२०२१.
ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा -तीन ) चे कलम एक, पोट - कलम ( ३ ) अन्वये काढण्यात आलेली व दिनांक १५ एप्रिल २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र , भाग चार ब पृष्ट क्र. ०१ ते ०२ वर प्रसिध्द करण्यात आलेली दिनांक १५ एप्रिल २०२१ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र . आयडीसी / २०२१ / (प्र. क्र . १८३ ) / उ-१४ उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विनिर्दीष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात एप्रिल , २०२१ महिन्याच्या १५ व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे
आणि ज्याअर्थी, या सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी उक्त प्रकरण सहाचे उपबंध उपरोक्ताप्रमाणे अंमलात आले आहेत . अशा क्षेत्रांत आहेत ;
आणि ज्याअर्थी , अधिनियमाचे प्रकरण सहा हे ज्या क्षेत्रांना लागू करण्यात आले आहेत अशा क्षेत्रांत असणाऱ्या आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमार्फत ( त्यात यानंतर ज्याचा " उक्त महामंडळ " असा निर्देश करण्यात आला आहे ) विकास करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा उक्त अधिनियमांच्या उद्दिष्टांच्या पृष्ट्यर्थ असेल अशा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ आवश्यक असणाऱ्या जमिनी संपादन करण्याची शक्ती उक्त अधिनियमाच्या कलम ३२ अन्वये राज्य शासनास प्रदान करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनिमयाचे कलम २ , खंड (क) अन्वये काढण्यात आलेली आयडीसी / १८ ९ २ ( १७४४१ ) , उद्योग १४ , दिनांक ११ जून १ ९९ ३ अन्वये राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६२ यांचा नियम २८ अन्वये ही जी कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत अशी उक्त अधिनियमाचे कलम ३२ , कलम ३३ पोट - कलम ( २ ) , कलम ३६ व कलम ३८ खालील जिल्हाधिकाऱ्यांची कामे पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) , काळ प्रकल्प क्र. २, माणगांव यांस उक्त नियमानुसार अधिकार प्राप्त झाले आहेत ;
आणि ज्याअर्थी, औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी सोबतच्या अनुसूची मध्ये वर्णन केलेल्या जमिनी महामंडळास आवश्यक आहे असे उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) , काळ प्रकल्प क्र. २ , माणगांव यांचे मत झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, मा . जिल्हाधिकारी , रायगड यांनी त्यांचे कडील पत्र क्र. भूसंपादन/टे . ६ / २६ ९ ३०७ / २०१४ , दिनांक ११ ऑगस्ट २०१४ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेल्या भूसंपादन धोरणास आणि मोबदल्याप्रती देय असलेल्या तरतुदीची प्रसिद्धी केली आहे .
त्याअर्थी , आता उक्त अधिनियमाचे कलम ३२ पोट- कलम ( २ ) अन्वये उपरोक्त प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या शक्तीचा वापर करून याद्वारे उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) , काळ प्रकल्प क्र. २ , माणगांव खाली नमूद केलेल्या जमिनीमध्ये भू- धारकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तिचा हितसबंध आणि कोणताही अधिकार असणाऱ्या सर्व व्यक्तींना खाली उल्लेख केलेल्या जमिनी मध्ये उक्त प्रयोजनार्थ का संपादन करण्यात येऊ नयेत या सबंधी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखे पासून ३० दिवसाच्या आत खाली सही करणाऱ्यास लेखी स्वरुपात कारणे दाखविण्यांबद्दल नोटीस देत आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु . )-४१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मे १८ , २०२१ /वैशाख २८ , शके १ ९ ४३ या नोटीसीचे तारखेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी शिवाय विक्री करून , पट्ट्याने देऊन , गहाण ठेवून अभिहस्तांकन करून , आणि अदलाबदल करून किंवा अन्य रितीने करावयाच्या उक्त जमिनीच्या / जमिनींच्या विल्हेवाटीसंबंधी केलेला कोणताही करार किंवा तीवर केलेला कोणताही खर्च किंवा ती मध्ये / त्यामध्ये केलेल्या सुधारणा उक्त जमिनीच्या अंतिमतः संपादन करण्यात येतील अशा भागांसबंधी भरपाई निर्धारित करण्याऱ्या अधिकाऱ्यांकडून उक्त अधिनियमाचे कलम ३३ , पोट - कलम ( पाच) व भूमी संपादन अधिनियम , १८ ९ ४ ( १८ ९ ४ चा एक ला ) यांच्या कलम २४ (सातव्यांदा ) अन्वये विचारात घेतल्या जाणार नाहीत .
ज्यांची व्यक्तीगत सुनावणी करण्याची इच्छा असेल अशा कोणत्याही व्यक्तीस या नोटीसीचे तारखे पासून एक महाच्या आत भेटीची वेळ ठरवून कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी ११-०० ते १-०० वाजेपर्यंत खाली सही करणाऱ्यांच्या कार्यालयात माणगांव येथे समक्ष जातीने किंवा आपल्या कायदेशीर मुखत्यारामार्फत हजर रहाता येईल .
सं.नं. / ग.नं. (२)
अ. क्र. (१)
१
३८
२
३८
३
३९
४
४०
५
४१
६
६०
६०
७
८
६१
९
६२
१०
६२
११
६३
५२६
१२
१३
५२७
१४
५२८
६६०
१५
६६१
१६
माणगांव,
दिनांक ३० एप्रिल २०२१ .
अनुसूची
रोहा-माणगांव औद्योगिक क्षेत्र जिल्हा रायगड , ता . माणगांव , गाव जामगांव
हिस्सा नं . (३)
क्षेत्र (हे.आर) (४)
अ
१.४३९
ब
१.१७०
०.६००
१.३४०
०.६७०
०.५६०
१
२
५.३४०
०.३००
१
२.२५०
२
१.२१०
०.२८५
१.१३८
१.०२३
१.२००
०.३७०
अ
१.१८५
२०.०८०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर ,
उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) ,
काळ प्रकल्प क्र . २ , माणगांव .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBΑΙ 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .