Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 139 (गृहनिर्माण विभाग) २५ मे २०२१ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६. क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.८८/गृनिभू.

Published 25 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ६३] मंगळवार, मे २५, २०२१/ज्येष्ठ४, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/ प्र.क्र.८८/गृनिभू.—महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा.२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक" या पदाकरिता शासनाच्या समक्रमांकाच्या दिनांक ३ डिसेंबर २०२० च्या अधिसूचनेन्वये विनियमित के लेल्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, ते असे : —

१. या नियमांना, "महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सहायक (सेवा प्रवेश) (सुधारणा) नियम, २०२१" असे म्हणावे.

२. या नियमांत संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, —

" मूळ सेवा प्रवेश नियम " म्हणजे शासनाच्या अधिसूचना क्र. सेप्रनि. २०२०/प्र.क्र. ८८/ गृनिभू, दिनांक ३ डिसेंबर, २०२० अन्वये विनियमित करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक" या पदाकरिताचे सेवा प्रवेश नियम.

(१)

भाग चार-ब—१३९-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२१/ज्येष्ठ४, शके १९४३

३. मूळ सेवा प्रवेश नियमातील नियम ४ सुधारित करण्यात येत असून मूळ सेवा प्रवेश नियमातील नियम ४ खालीलप्रमाणे असेल.

४. नियम ३ येथे नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने व नामनिर्देशनान्वये करावयाची नियुक्ती यांचे प्रमाण ९०:१० असे राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीनिवास मोकलीकर,

शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२१/ज्येष्ठ४, शके १९४३ ३

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि. २०२०/प्र.क्र.८८/ गृनिभू.— महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा.२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "वरिष्ठ लिपिक" या पदाकरिता शासनाच्या समक्रमांकाच्या दिनांक ३ डिसेंबर २०२० च्या अधिसूचनेन्वये विनियमित के लेल्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे ते असे : —

१. या नियमांना "महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील वरिष्ठ लिपिक (सेवा प्रवेश) (सुधारणा) नियम, २०२१ असे म्हणावे.

२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, —

"मूळ सेवा प्रवेश नियम म्हणजे शासनाच्या अधिसूचना क्र. सेप्रनि. २०२० / प्र.क्र. ८८/ गृनिभू, दिनांक ३ डिसेंबर २०२०, २०२० अन्वये विनियमित करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक या पदाकरिताचे सेवा प्रवेश नियम,

३. मूळ सेवा प्रवेश नियमातील नियम ४ सुधारित करण्यात येत असून मूळ सेवा प्रवेश नियमातील नियम ४ खालीलप्रमाणे असेल,

४. नियम ३ येथे नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने व नामनिर्देशनान्वये करावयाची नियुक्ती यांचे प्रमाण ८०:२० असे राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीनिवास मोकलीकर,

शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.