Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I. Central Ext. 28 (27th May 2021) (Eknath Gaikwad Death) क्र. डीआयपी. 2021/प्र.क्र. 59/30

Published 27 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31745

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग

गुरुवार , मे २७ , २०२१ /ज्येष्ठ ६ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १९ ( ३ )]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ मे २०२१

अधिसूचना

क्र . डीआयपी . २०२१/प्र.क्र. ५९ / ३०.-" महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री , माजी संसद सदस्य, ज्येष्ठ नेते श्री . एकनाथ गायकवाड यांचे बुधवार , दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या दुःखद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली .

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री , माजी संसद सदस्य , ज्येष्ठ नेते श्री. एकनाथ गायकवाड यांचे बुधवार, दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी मुंबई येथे निधन झाले . ज्येष्ठ नेते श्री . एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे . त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे लोकाभिमुख आणि विकासाची दृष्टी असणारे , राज्यातील समाजकारण- राजकारणातील दोन पिढ्यांसाठीचे मार्गदर्शक असे नेतृत्व गमावले आहे.

ज्येष्ठ नेते श्री . एकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म दिनांक १ जानेवारी १ ९ ४० रोजी सातारा जिल्ह्यातील बोरखळ येथे शेतकरी कुटुंबात झाला. मुंबईला कर्मभूमी मानलेल्या श्री . गायकवाड यांनी १ ९ ८५, १ ९९ ० आणि १ ९९९ अशा तीन निवडणुकांतून धारावी विधानसभा मतदार संघाचे विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले होते . त्यांनी १ ९९ ३ ते १ ९९ ५ या कालावधीत समाजकल्याण आणि कामगार कल्याण आणि त्यानंतर १ ९९९ ते २००४ या कालावधीत आरोग्य , वैद्यकीय शिक्षण , सामाजिक न्याय , कामगार , उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भुषविले होते .

त्यानंतर त्यांनी २००४ आणि २०० ९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधून संसद सदस्य म्हणून त्यांनी मुंबई दक्षिण - मध्य मतदार संघातून लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केले होते . लोकसभेच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या ज्येष्ठ नेते गायकवाड यांनी अभय शिक्षण केंद्र आणि रयत महासंघाचीही स्थापना करून सामाजिक कार्याची उभारणी केली आहे.

पक्षीय राजकारणात एकनिष्ठतेचे उत्तम उदाहरणही ज्येष्ठ नेते श्री . गायकवाड यांनी घालून दिले आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे . त्यांनी राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत, पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक अशा कामाचा आदर्श घालून दिला आहे .

(१)

भाग एक (म.उ.वि. ) -२८-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-मध्य उप - विभाग, मे २७ , २०२१/ ज्येष्ठ ६ , शके १ ९ ४३

अशा उत्तम संघटक, अभ्यासू, मनमिळावू , उत्तम जनसंपर्क असणाऱ्या , प्रत्येकाच्या मताचा आदर करणाऱ्या, कार्यक्षम आणि जनमानसातील लोकप्रिय नेत्याचे बुधवार , दि.२८ एप्रिल २०२१ रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे . ज्येष्ठ नेते श्री . एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची ताकद गायकवाड कुटुंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सीताराम कुंटे , शासनाचे मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.