Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL Weekly (27 May-2 June- 2021)

Published 27 May 2021

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31744

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - ल

गुरुवार ते बुधवार , मे २७ जून २, २०२१/ज्येष्ठ ६-१२ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ३ ]

[पृष्ठे ३, किंमत: रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय ) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक , चार- अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उद्योग वेतन मंडळ, मुंबई यांचेसमोर

विवाद क्र. सीबीआर ०१/२०१२

प्रथम पक्ष

को.ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन रायगड

विरूद्ध

द्वितीय पक्ष

दि अण्णासाहेब सावंत को .ऑप . अर्बन बँक महाड लि.

मूळ वेतन , वेतनश्रेणी , अतिरिक्त वेतनवाढ, महागाई भत्ता , घरभाडे भत्ता, शहर पूरक भत्ता, वाहन भत्ता , वैद्यकीय भत्ता, अधिकारी भत्ता इतर मागण्यांबाबत .

उपस्थिती:

श्री. विश्वजित सावंत , सरचिटणीस

युनियनच्या वतीने उपस्थित प्रतिनिधी.

बँकेच्या वतीने प्रतिनिधी .

श्री . दिनेश येरूणकर, व्यवस्थापक ( ऑपरेशन )

आदेश

क्र. औसं/ संकीर्ण/१ / २०२०/ कार्या-८ / २६७३ , दिनांक २३/३/२०२१ .- जनरल सेक्रेटरी, को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, रायगड यांनी मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १ ९ ४६ कलम ४२ ( २ ) आणि मुंबई औद्योगिक संबंध नियम , १ ९ ४७ कलम ५२ अन्वये द्वितीय पक्ष चेअरमन, दि अण्णासाहेब सावंत को . ऑप. अर्बन बँक लि . , महाड यांना वेतनश्रेणी , मूळ वेतन, वेतनश्रेणी , अतिरिक्त वेतनवाढ, महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , शहर पूरक " भत्ता , वाहन भत्ता , वैद्यकीय भत्ता अधिकारी भत्ता इतर मागण्यांमध्ये फेरबदल करण्याकरीता विहीत नमुना " ल " अन्वये दि. २२ / ० ९ / २०१० रोजी नोटीस दिली होती . उभय पक्षकारांत करार न झाल्यामुळे को. ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन , महाड यांनी मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम , १ ९ ४६ कलम ५४ (१ ) व मुंबई औद्योगिक संबंध नियम , १ ९ ४७ कलम , ६२ अन्वये विहित नमुना " न " मध्ये दि. ०४/१०/२०१० रोजी समेटकर्ता , मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम , १ ९ ४६, पनवेल/ रायगड यांना आपल्या मागण्यांबाबत प्रस्तावित केलेला बदल अंमलात न आणल्याबद्दल सूचना दिली.

(१)

भाग एक-ल-१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक - ल, गुरुवार ते बुधवार , मे २७ -जून २ , २०२१/ज्येष्ठ ६-१२, शके १ ९ ४३

२. समेटकर्ता , मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम , १९ ४६ , पनवेल यांनी उभय पक्षकारांत तडजोड होण्याची शक्यता नसल्याने कलम, ७३ - अ/ ८६- कक अन्वये सहकारी बँक उद्योगाकरिता असलेल्या वेतन मंडळाकडे सदरचा दावा दाखल करण्यासाठी दि. २८/११/२०११ रोजी प्रथम पक्ष " को . ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन , महाड " यांना " असफल प्रमाणपत्र " दिले.

३. प्रथम पक्ष को . ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन, महाड यांनी दि. १७/०१/२०१२ रोजी मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १ ९ ४६ च्या कलम ८६ - कक अन्वये सदरचा दावा निवाड्यासाठी वेतन मंडळाकडे दाखल केला.

४. वेतन मंडळाने सदरच्या दाव्यातील प्रथम पक्ष " को. ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन , रायगड " यांना आपल्या " दाव्याचे निवेदन " दि. १७/०२/२०१२ रोजी किंवा त्यापुर्वी वेतन मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले . तसेच प्रतिवादी , " दि अण्णासाहेब सावंत को . ऑप अर्बन बँक लि. , महाड " यांना त्यांचे " लेखी निवेदन " व " दाव्याबाबतचे निवेदन " दि. १७/०२/२०१२ रोजी किंवा त्यापुर्वी वेतन मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दि. १३/०२/२०१२ रोजीच्या नोटीसद्वारे दिले होते . त्याचप्रमाणे दि. १३/०२/२०१२ रोजीच्या नोटीसद्वारे समेटकर्ता, मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९ ४६ , पनवेल यांना सदर प्रकरणांतील मूळ कागदपत्रे/ दस्तऐवज दि . १७/०२/२०१२ पूर्वी या कार्यालयाकडे पाठविण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

समेटकर्ता , मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १ ९ ४६ , पनवेल यांनी त्यांचे पत्र दि. २७/०२/२०१२ अन्वये सदर प्रकरणांतील कागदपत्रे/ दस्तऐवज या कार्यालयाकडे पाठविली .

५. प्रथम पक्ष " को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन , रायगड " यांनी दि. १४.०३.२०१२ रोजी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ " दाव्याचे निवेदन " वेतन मंडळाकडे सादर केले. तसेच प्रतिवादी " दि अण्णासाहेब सावंत को. ऑप . अर्बन बँक लि. , महाड " यांनी उत्तरादाखल आपले " लेखी निवेदन " दि. १४/०६/२०१२ रोजी वेतन मंडळासमोर दाखल केले सदर दाव्यात उभय पक्षकारांनी मागण्यांशी संबंधीत कागदपत्रे व दस्तऐवज दाखल केले .

६. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षकारांनी सदर विवादबाबत चर्चा सुरू असल्याचे कळविले. त्यानंतर प्रथम पक्ष " को . ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन, महाड " व द्वितीय पक्ष " दि अण्णासाहेब सावंत को . ऑप. अर्बन बँक लि. , महाड " या उभय पक्षकारांमध्ये दि . २८/११/२०१२ रोजी झालेला करार वेतन मंडळाकडे सादर केला होता व वेतन मंडळाला लेखी निवेदनाद्वारे विनंती केली की , कराराला अनुसरुन योग्य ते संमती आदेश करावे .

७. दरम्यानच्या काळामध्ये सहकारी बँक उद्योगाकरिताच्या वेतन मंडळाचे मा . अध्यक्ष श्री . अशोक पोहेकर यांचे निधन झाल्यामुळे वेतन मंडळाचे कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे सदर प्रकरणांत कोणतेही आदेश पारित करण्यात आले नव्हते.

८. महाराष्ट्र शासन , उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांची अधिसूचना क्र. मुऔस -६२०१६ /प्र.क्र . १७७/ कामगार -२ , दि. ०६/ ०३/ २०१९ व दि. ०८ / ०३ / २०१९ अन्वये सहकारी बँक वेतन मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. सदरच्या वेतन मंडळाने दि. २७ / ०५ / २०१ ९ रोजीच्या नोटीसद्वारे उभय पक्षकारांना दि. ०७ / ०६ / २०१९ रोजी वेतन मंडळासमोर सुनावणीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले .

९. दि. ०७ / ०६ / २०१ ९ रोजी वादी " को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, रायगड " व प्रतिवादी " दि अण्णासाहेब को. ऑप. अर्बन बँक लि. , महाड " यांचे प्रतिनिधी वेतन मंडळासमोर हजर राहून लेखी निवेदन सादर केले. सदर लेखी निवेदनामध्ये उभय पक्षकारांच्या संमतीने दि. २८ /११ / २०१२ रोजी वेतन करार झाला असल्याने सदर करारानुसार प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली .

१०. सहकारी बँक उद्योगाकरिताच्या वेतन मंडळाने " को. ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन , महाड " यांनी दाखल केलेल्या विवादातील मागण्या व दि. २८/११/२०१२ रोजी उभय पक्षकारांमध्ये झालेला करार पडताळून पाहिला आणि त्या आधारे पुढील आदेश पारीत करण्यात येत आहेत .

आदेश

प्रथम पक्ष " को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, महाड " व द्वितीय पक्ष " दि अण्णासाहेब को. ऑप . बँक लि. , महाड " यांच्यामध्ये सदर विवादात अंतर्भूत असलेल्या मागण्यांसंबंधात दि . २८/११/२०१२ रोजी झालेल्या करारास सहकारी बँक उद्योग वेतन मंडळ या आदेशाद्वारे संमती देत आहे व हा दावा एकमताने निकालात काढत आहे. तसेच सहकारी बँक उद्योग वेतन मंडळ प्रथम पक्ष " को. ऑप . बँक एम्प्लॉईज युनियन , रायगड " यांनी सदरच्या दाव्यात कलम ११ ९ ड अन्वये केलेला अंतरिम अर्ज उभय पक्षकारात करार झाल्यामुळे निकालात काढत आहे.

ठिकाण: - मुंबई

दिनांक: - ०७ / ०६/२०१९ .

अनिल आनंदराव ढुमणे , अध्यक्ष

नितीन काळे , स्वतंत्र सदस्य ३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- ल, गुरुवार ते बुधवार, मे २७ -जून २ , २०२१/ज्येष्ठ ६-१२, शके १ ९ ४३

मोहन कोमराजी येणुरे , सदस्य

संजीव रमाकांत देशपांडे , सदस्य

रविंद्र त्रिंबकराव सहस्त्रबुद्धे, सदस्य

जयंता आदमने , सदस्य

प्रविण दरेकर , सदस्य

प्रविण दटके , सदस्य

अनुपस्थित आशिष गोविंदप्रसाद नावंदर , सदस्य

अनुपस्थित प्रदिप जगताप , सदस्य

विजय माधवराव मोगल , सदस्य

भारत विठ्ठल तांबोळकर , सदस्य

अनुपस्थित प्रसाद अरविंद पोटभरे , सदस्य

चंद्रशेखर गजानन मैडकर , सदस्य

विनोद उदयनारायण मिश्रा, सदस्य

भगवान रामचंद्रराव पाटील, सदस्य

अच्युत मधूसुदन कऱ्हाडकर , सदस्य

अजय विठ्ठलदासजी मुंदडा , सदस्य

रोमा सुनिल गुप्ते, प्रभारी सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISIIED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.