Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी असाधारण राजपत्र क्रमांक 42 दिनांकित 4 जून 2021 उप विभागीय अधिकारी, माणगांव यांचे कार्यालय, उप विभाग माणगांव क्रमांक उविअमा/भूसं/कात-2/बार्पे/एसआर-93-13/2020

Published 04 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जून ४, २०२१/ज्येष्ठ १४, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ३२] शुक्रवार, जून ४, २०२१/ज्येष्ठ १४, शके १९४३ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ४२

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणंगाव यांचे कार्यालय, उप विभाग माणगांव

नमुना--१

खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस

क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/बार्पे/एसआर-९३-१३/२०२०.-----ज्याअर्थी, मृद संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा-ठाणे यांनी बार्पे गावाचे धरणाच्याकरिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ०३/२०१५/प्र.क्र. ३४/ अ-२, दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंेबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जिल्हा संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा-ठाणे यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, रायगड यांचे आदेश क्र. भूसंपादन/टे-६/मौजे बार्पे/२०१९, दिनांक १७ डिसेंबर २०१९ व आदेश क्र. भूसंपादन/ टे-६/मौजे बार्पे/२०२०, दिनांक १४ सप्टेंबर २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१७ आणि तद्नुषंगिक शासन निर्णय, तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्रमांक एलक्युएन-०१/२०१७/प्र.क्र. १२/अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत ;

त्याअर्थी, आता

१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, मी, श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगांव याद्वारे, (एक) अनुसूची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जिल्हा संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा-ठाणे यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोेटीस प्रसिद्ध करीत आहे ; आणि

(दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या व शेडयूल-१ च्या तरतुदीनुसार संबंधीत जमिनीसाठी परिगणीत होेणाया एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५% रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्िचत करण्यात येईल.

(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे जिल्हा संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,कळवा-ठाणे यांचे नावे खरेदी देण्यास स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णत: व अंतिमरित्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे. (१) भाग एक (को.वि.पु.)--४२--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जून ४, २०२१/ज्येष्ठ १४, शके १९४३ २. संबंधीत भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे (विकल्प) उपविभागीय अधिकारी, माणगांव यांच्याकडे दाखल करावीत.

३. संमतीपत्राचा (विकल्प) विहित नमुना उपविभागीय अधिकारी, माणगांव यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत प्राधिकृत अधिकायामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.

४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखडयाची प्रत उपविभागीय अधिकारी, माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकायाच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरिक्षणासाठी खुली ठेवणेत आली आहे.

बार्पे

माणगांव, दिनांक २८ मे २०२१. प्रशाली जाधव-दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.