Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Extra 50, Dated 8 June 2021, Notice (u/s 115 read with sec. 40 (3) (d) of MR & TP Act) No. MIDC/ILP/ D-60076/2021

Published 08 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012 /46121

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

मंगळवार , जून ८ , २०२१ /ज्येष्ठ १८ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक २९ ]

[पृष्ठे ४ , किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ५०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत )

सूचना

(म.प्रा.व.न.र अधिनियम कलम ११५ सह कलम ४० ( ३ ) (घ) अन्वये)

क्र.मऔविम/ आय.एल.पी./ D -६००७६ / २०२१

ज्याअर्थी , शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो. -१ ९ १६/प्र.क्र.२२१/ उद्योग -२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टिक पार्क ( Logistics Park ) धोरण-२०१८ जाहीर करणेत आले. ( यापुढे उक्त धोरण असे नमूद केले आहे. ) आणि ज्याअर्थी, उक्त धोरणा नुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कच्या विकासनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ४३- (१ - ब ) नुसार राज्य शासनाच्या सर्व साधारण किंवा विनिर्दिष्ट निदेशांच्या अधीन राहून , महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ' एकात्मिक औद्योगिक क्षेत्र ' म्हणून अधिसूचित करता येईल व सदर अधिसूचनेद्वारे एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ च्या तरतुदीनुसार मऔविम विशेष नियोजन प्राधिकरण असेल ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग , उर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आय.डी.सी. २०२० /प्र.क्र .२७७ /उद्योग १४ , दिनांक २५ ऑगस्ट २०२० , अन्वये मौ. डोहोळे, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील १०.८८६ हे . आर . क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १ ९ ६१ चे कलम २ (खंड-ग ) अन्वये ' औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहीर केले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने कमीत कमी ५ एकर ( २ हेक्टर ) जमिनीवर व किमान १५ मी. रुंदीचा पोहोच रस्ता असलेल्या क्षेत्रावर एकात्मिक लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे . नगरविकास विभाग , महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र. टिपीएस-१८१८ /अनौसं / १३ / प्र.क्र .१०५ / नवि-१३ दि. १३ जून २०१८ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. १८.५ (A) च्या प्रमाणे अंमलबजावणी करावयाची आहे ;

आणि ज्याअर्थी , मे. आयूषी स्पेसेस एल.एल.पी. ह्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सदरील क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या ( लॉजिस्टिक पार्क ) विकसनासाठी मंजुरीस्तव सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १ ९ ६६ कलम ११५ सह कलम ४० ( ३ ) (घ) अन्वये उक्त क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्याआधी नागरिकांकडून सूचना/ हरकती मागविण्याकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

(१)

भाग दोन- ५०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून ८ , २०२१/ज्येष्ठ १८ , शके १ ९ ४३

त्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्रारूप विकास आराखड्याची नोटीस म.प्रा.व.न.र. अधिनियमाचे कलम ११५ सह कलम ४० ( ३ ) (घ ) अन्वये नागरिकांकडून सुचना/ हरकती मागविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. उक्त नोटीसीची प्रत व एकात्मिक औद्योगिक क्षेत्राचा ( लॉजिस्टिक पार्क ) प्रारुप विकास आराखडा हा या नोटीसचा भाग समजण्यात यावा . सदरील नोटीस ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध राहील . तसेच नियोजन प्रस्ताव दर्शविणारा प्रारुप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहील .

मुख्य नियोजक यांचे कार्यालय , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पाचवा स्तर , उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग , मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी ( पूर्व ) , मुंबई ४०० ० ९३ .

उक्त प्रारुप विकास आराखड्या संबंधी नागरिकांच्या काही सुचना/ हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ३० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांच्या कार्यालयात खालील ठिकाणी लेखी स्वरुपात पाठवाव्यात. मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , पाचवा स्तर , उद्योग सारथी , महाकाली गुंफा मार्ग , मरोळ औद्योगिक वसाहत , अंधेरी ( पूर्व) मुंबई ४०००९३ .

विहित मुदतीत आलेल्या हरकती / सूचनांचा विचार करून शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती/ सूचनांचा विचार केला जाणार नाही .

मुंबई,

अविनाश पाटील,

दिनांक ८ जून २०२१.

मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , जून ८ , २०२१ /ज्येष्ठ १८ , शके १ ९ ४३

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking )

Notice

(u / s 115 read with sec . 40 ( 3) ( d) of MR & TP Act)

No. MIDC / ILP / D - 60076/ 2021

Whereas , Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government in Industries , Energy and Labour Department vide its Notification No. म. औ.धो.- १ ९ १६ / प्र.क्र.२२१/ उद्योग -२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ (Herein referred as the said Policy) ;

And whereas , as per section 43 ( 1 B ) of Maharashtra Industrial Development Act , 1961. That subject to the general or specific directions of the State Government , the Corporation may by notification in the Official Gazette , notify any industrial area as the ' Integrated Industrial Area ' and upon such notification . The Corporation shall become the Special Planning Authority for such ' Integrated Industrial Area ' under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .

And whereas , vide Notification No. IDC 2020/ ( C.R.277 . ) /ND - 14 , dated 25th August 2020 of Industries Energy & Labour Department , Government of Maharashtra declared- 10.886 Ha area of Village - Dohole , Tal : Bhiwandi , Dist : Thane , to be an ' Industrial Area ' under clause ( g) of section 2 of Maharashtra Industrial Development Act , 1961 ;

And whereas , Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Logistic Parks on the land admeasuring at least 5 Acres ( 2Ha) and having minimum 15 MTR wide access , in accordance with the regulation No.18.5 (A) in revised development control regulations of MIDC approved as per Urban Development , GoM Notification No.TPS - 1818 / UOR / 13 / CR - 105/18 /UD - 13 , dated 13th June 2018 ;

And whereas , M / s . AYUSHI SPACES LLP . , made an application requesting Maharashtra Industrial Developing Corporation to approve their Proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area ( Logistic Park) in Village - Dohole , Tal : Bhiwandi , Dist : Thane .

And whereas , as provided in section 115 of the Maharashtra Regional Town Planning Act , 1996 , as modified u / s 40( 3) ( d) it is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and objections from the citizens :

Therefore , Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes Notice u / s 115 read with 40 ( 3 ) ( d) of the MR & TP Act in Government Gazette for Draft Master Plan for inviting suggestions / objection from citizen . The copy of this notice and proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area ( Logistic Park ) shall form part of this notice . The notice is made available on the Website of MIDC i.e www.midcindia.org .The proposed Draft Master Plan of the Notified Integrated Industrial area ( Logistic Park) is kept open for citizen's inspection during office hours at the following office:

Office of the Chief Planner , Maharashtra Industrial Development Corporation , Udyog Sarathi , Mahakali Caves Road , Marol Ind . area , Andheri ( E. ) , Mumbai- 400 093 .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , जून ८ , २०२१ /ज्येष्ठ १८ , शके १ ९ ४३

Suggestions/objections if any in Writing shall be submitted to the office of the Chief Planner of Maharashtra Industrial Development Corporation . Udyog Sarathi , Mahakali Caves Road , Marol Indl . area Andheri ( E. ) , Mumbai - 400 093. Within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette . Suggestions / objections received within stipulated Period of 30 days from the date publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered after considering the suggestions/ objections received ; the draft master plan shall be submitted to the Government forapproval .

AVINASH PATIL ,

Mumbai ,

dated 8th June 2021 .

ChiefPlanner ,

Maharashtra Industrial Development Corporation .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.