Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 23 DATE 10 june 2021 to 16 june 2021 १) शासकीय अधिसुचना १) अव्वर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- * औरंगाबाद शहराची विकास योजना (वाढीव हद्द) मौ. चिकलठाणा. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. २ उस्मानाबाद यांजकडून :- * उचित नुकसान भरपाई मिळणे बाबत. १) मौ. दहिफळ, ता. वाशी. २) गाव चिंचपूर खु. ता. परंडा ३) मौ. राळेसावंगी ता. भूम. २) उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांजकडून :- * विरासत मंजूर करणे बाबत. ३) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांजकडून :- * नावात बदल करणे बाबत. ४) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांजकडून :- * नावात बदल करणे बाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) औरंगाबाद महानगर पालिका यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये. २) मुख्याधिकारी उस्माबाबाद यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये.

Published 10 June 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-10.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. २३] गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ [ पृष्ठे - ११ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे ४८७ ते ४८९ भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

४८९ ते ४९४ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ५८ ते ६० भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक. ०२/०६/२०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ क्र. टिपीएस-३०२१/१४३/प्र.क्र.३०(अ)/२०२१/नवि-३०.-- ज्याअर्थी, औरंगाबाद शहराची विकास योजना (वाढीव हद्द) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७ (ज्यास यापुढे ''उक्त अधिनियम'' असे संबोधिलेे आहे.) च्या कलम ३१ नुसार शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसुचना क्र. टिपीएस-३०८८/ ४५४/प्र.क्र. ५९/८८/नवि-१२, दि. १५ ऑक्टोंबर, १९९१ अन्वये मंजूर झाली असून, ती दि. १९ नोव्ळेंबर, १९९१ पासून अंमलात आली आहे. (यापुढे ज्यास ''उक्त विकास योजना'' असे संबोधिलेे आहे);

औ. भाग १--२३ ४८७

आणि ज्याअर्थी, ''उक्त विकास योजनेमध्ये, मौ चिकलठाणा, स.नं २१६ (क्षेत्र ७.०७ हे. आर.) आणि स.क्र. २१७ (क्षेत्र ७.८९ हे. आर) असे एकूण १४.९६ हे. आर क्षेत्र (यापुढे ''उक्त क्षेत्र'' असे संबोधिले आहे) (आ.क्र.११) ''वीटभट्टी'' या प्रयोजनासाठी आरक्षित दर्शविलेले आहे. (यापुढे ''उक्त आरक्षण'' असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी दि ०१/०३/२०१९ रोजीचे आदेश क्र. २०१८/मशाका/जमिन-२/प्र.क्र.१६१/शा.ज/कवि-१२१ या आदेशन्वये उक्त नमुदाप्रमाणे १४.९६ हे. आर क्षेत्र जिल्हा क्रिडा अधिकारी, औरंगाबाद यांना प्रदान केलेले असून सदर आदेशामधील नमूद अटीनुसार मंजूर विकास योजनेत उक्त क्षेत्रावरील उक्त आरक्षणाचे अनुषांगाने फेरबदल आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, औरंगाबाद महानगरपालिकेने (यापुढे ''उक्त महापालिकेने'' असे संबोधिले आहे) उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) मध्ये दिलेली वैधानिक पध्दती अनुसरुन उक्त विकास योजनेतील उक्त क्षेत्र उक्त आरक्षणातून वगळून ''जिल्हा क्रिडा संकूल प्रकल्प औरंगाबाद'' या प्रयोजनासाठी आरक्षित करणेसाठी फेरबदलाचा प्रस्ताव (यापुढे ''उक्त प्रस्तावित फेरबदल'' असे संबोधिले आहे) शासनाच्या मंजूरीसाठी सादर केलेला आहे;

४८८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ भाग १ - पुरवणी

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, प्रस्तावित फेरबदल काही अटी व शर्ती सापेक्ष मंजूर करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ पोटकलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकाराचा वापर करुन उक्त विकास योजनेतील उक्त प्रस्तावित फेरबदलास खालील नमूद अटी व शर्ती सापेक्ष शासन मंजूरी देत आहे आणि त्यासाठी उपरोल्लेखित, दि.१५ अज्ञॅक्टोबर, १९९१ ची अधिसुचना सुधारित करण्यात येत आहे.

''विकास योजना मंजूरीच्या अधिसुचनेच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे''

नोंद

मौ. चिकलठाणा येथील स.नं.२१६ (क्षेत्र ७.०७ हे. आर) आणि स. क्र. २१७ (क्षेत्र ७.८९ हे.आर.) या क्षेत्रावरील ''वीटभट्टी'' (आरक्षण क्र.

११) हे आरक्षण वगळण्यात येत असून स.क्र. २१६ (क्षेत्र ७.०७ हे. आर.) स.क्र. २१७ (क्षेत्र ७.८९ हे. आर.) मौ. चिकलठाणा हे (एकूण १४.९६ हे आर.) हे क्षेत्र ''जिल्हा क्रिडा संकूल प्रकल्प, औरंगाबाद'' प्रयोजनासाठी खालील अटी व शर्तीसापेक्ष आरक्षित आरक्षित करण्यात येत आहे.

१) मौ. चिखलठाणा, ता. व जि. औरंगाबाद येथील स.क्र. २१६, २१८ च्या हद्दीवरुन किमान १५.० वा अधिक रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध झालेनंतरच क्रिडा संकुलासाठी भेगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.

२) प्रस्तावित फेरबदलाखालील जागेवर भविष्यकाळात विकास करताना सदन जागेलगत असणाया जलप्रवाहास संरक्षक भिंतीचे नियोजन करणे बंधन कारक राहील.

''उक्त फेरबदल दर्शविणाया भग नकाशाची प्रत आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये नागरीकांच्य अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.''

सदर अधिसुचनेची प्रत शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/ नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

विना मोरे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

-----------------------

GOVERNMENT OF MAHARASHTRA Urban Development Department,

Mantralaya, Mumbai - 400 032,

Dated: 02/06/2021

NOTIFICATION

The Maharashtra Regional and Town Planning Act,1966 No. TP8-3021/143/CR-30/2021/UD-36: Whereas the Development Plan of Aurangabad, (Extended boundary) has been sanctioned by the Government u/s 31 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act"), vide Notification NO.TPS-3088/454/CR-59/88/UD-12, dated 15th October, 1993 and it has come into force with effect from 19th November, 1991. (hereinafter referred to as "the said Development Plan");

And whereas, in the said Development Plan, the land admeasuring '7.07 H.R. out of Survey No.216 and land admeasuring 7.89 H.R. out of survey N0.217 (Total 14.96 H- R.) of Mouja Chikalthana, (hereinafter referred to as "the said land"), is reserved for " Brick Kiln "(Reservation No.l 1)" ( hereinafter referred to as the said reservation);

And where as. Collector Aurangabad Vide its order bearing No.2018/मशाका/जमीन-२/प्र.क्र.१६१/शा.ज./क.वि.-१२१ dated 01/03/2019, has allotted the said land to District Sports Officer, Aurangabad and according to the condition mentioned in the said order dated 01.03.2019, modification is necessary to the said Development plan in respect to the said reservation on the said land;

And whereas, Aurangabad, Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Corporation") after following all the legal formalities stipulated under section 37(1) of the said Act, has submitted to the Government for its sanction a proposal for modification to the said Development Plan, so as to delete the said land from the said reservation and reserve the same for "'District Krida Sankul Prakalp, Aurangabad." ( hereinafter referred to as "the proposed Modification");

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ ४८९

And whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Towrt Planning, Maharashtra State, the Government is of opinion that the proposed Modification in the said Development Plan should be sanctioned with some terms and conditions;

Now, therefore in exercise of the powers conferred on it under subsection (2) of section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said proposed modification with the terms and conditions mentioned below and for that purpose amends the above said notification dated the 15th October, 1991 as follows :-

"In the Schedule of modification appended to the notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry-

ENTRY

The reservation of "Brick Kiln" (Reservation of 11) is deleted from the land bearing S.No.2l6(area 7.07 H.H)and S.No. 217(area 7.89 H.R.)(Total area 14.96 H.R.)and the said land is reserved/or "District Krida Sankul Prakalp, Aurangabad" with following terms and conditions 1. Occupation Certificate for the proposed District Krida Sankul Prakalp, Aurangabad shall be issued only after the completion of approach road having width 15.0 m.t or more on tile Northern Boundary of S.No.216,217 & 218.

2. Retaining wall along the water body adjacent to the said land will have to be constructed before undertaking any development in the future.

A copy of the part plan showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Commissioner, Municipal Corporation, Aurangabad during office hours on all working days for inspection of public fora period of one month.

This notification shall also be available on the Government website www.maharashtra. gov.in (Acts & Rules) .

By order and in the name of the Governor of Maharasfatra,

Vcena More, Under Secretary to Government. ----------------------

संकिर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

२

उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद,

यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११ (०१ ) ची

प्राथमीक अधिसुचना

क्र. २०२०/उपजिअ/भूस/सिआर-०१. दिनांक- २५/०३/२०२१ ----- ज्या अर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड(इ) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसुचना, महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्र. एम. आय. एस.-११/२०१४/सिआर-७७ (भाग-२)/ अ-२ दिनांक ११/०९/२०१५ (यात या पुढे जिचा निर्देश उक्त अधिसुचना असा करण्यात आला आहे) याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ऐ) मध्ये व्याख्या केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी एखादया जिल्हयातील १०००० हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याने मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमिनीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त जमिन असा करण्यात आला आहे) संपादनाची कार्यवाही ही सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे, आणि म्हणूनच उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे सुचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

४९० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ भाग १ - पुरवणी

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, या सोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. (सदर प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीचे विस्थापन होणार नाही)

ज्या अर्थी कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुर्नवसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे ( सदर प्रकल्पात पुनर्वसन व पुर्नवसाहत करण्याची आवश्यकता नाही.)

त्याअर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम चार अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसुचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर,जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, अणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीच्या बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यास त्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) नुसार जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क नियम महाराष्ट्र २०१४ ( यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) व्दारे विहीत केल्या प्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावती करणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणर असल्याचे देखील घोषित करण्यत येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद यांस पदनिर्देशित केले आहे.

राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद.

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

मौजे - दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाबाबत विवरण.

प्रकल्पाचे नाव - पाझर तलाव दहिफळ मौ. दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद

प्रकल्पाचे वर्णन - पाझर तलाव दहिफळ मौ. दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद

समाजाला मिळणारे लाभ -पाझर तलाव दहिफळ मौ. दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद यामुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.

अनुसूची तीन

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, पाझर तलाव दहिफळ मौ. दहिफळ ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद या कामामुळे कुठल्याही व्यक्तीचे विस्थापन होणार नाही.

अनुसूची चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अधिका-याने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

जिल्हा जलसंधारण अधिकारी जि. प. लघु पाटबंधारे उस्मानाबाद यांनी सामाजिक परिणाम निर्धारण करण्याची आवश्यकता नाही असे प्रमाणित केले आहे.

अनुसूची पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ - प्रशासक म्हणुन नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम - लागु नाही.

ब - प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता लागु नाही.

क - ज्या अधिसुचनाव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसुचनेचा तपशील - लागु नाही.

टिप- १. सदर प्रकल्पासाठी होणा-या भूसंपादनामुळे कुठल्याही व्यक्तीचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे अधिनियम ४३ अन्वये प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही.

२. उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद यांचे यांचे कार्यालया मध्ये निरीक्षण करता येईल.

सदर अधिसुचनेव्दारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायदयाचे कलम ११ चे उप कलम ०१ खाली अधिसुचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासुन ६० दिवसाच्या आत उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये
१. २ ३
१ ९० ०.०२
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ ४९१ ३ आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने कलम १५ जिल्हाधिकारी उस्मानाबाद, यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९

(०१)

२०१८/भूसं/कक्ष-२/सिआर -२०.--- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११(०१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र./७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीचा अनुसुची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

गाव:- चिंचपुर खु. तालुका:- परंडा अ.क्र.

च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.

आणि ज्या अर्थी अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुर्नवसाहत योजनेचा सारांश अनुसूचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.

आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका- याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भूम यास पदनिर्देशित करीत आहे.

जिल्हा :- उस्मानाबाद

भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये

१

२

१

१८८ २

१८८ ३

१८८ ४

४९४ ५

१६७ ६

१९१ ७

१८६ ८

१८६ ९

१८६

एकुण

३

०.६१

०.५८

०.४४

०.५९

०.२८

०.२१

०.३५

०.२५

०.१६

३.४७

स्वाक्षरीत/-

(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद४९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ भाग १ - पुरवणी अनुसूची दोन ४ सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाबाबत विवरण.

प्रकल्पाचे नाव :- पाझर तलाव चिंचपूर खु. मौ.चिंचपुर खु. ता.परंडा जि.उस्मानाबाद

प्रकल्पाचे वर्णन :- पाझर तलाव चिंचपूर खु. मौ.चिंचपुर खु. ता.परंडा जि.उस्मानाबाद

समाजाला मिळणारे लाभ :- परंडा तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रात या कालव्यामुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.

अनुसूची तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गाव - चिंचपूर खु. तालुका- परंडा जिल्हा - उस्मानाबाद अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हे.आर.मध्ये) ०१ निरंक

निरंक पुनर्वसाहत करण्याची आवश्यकतानाही, सबब माहिती निरंक उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांजकडून

शुध्दीपत्रक

क्र.२०१६/भूसं/सीआर/१३, दिनांक - १५.०३.२०२१.--- उप विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी,भूम यांची भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम ११ अधिसुचना क्रमांक २०१६/भूसं/सििआर-१३ दिनांक २८.०१.२०२० अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग १ ला पूरवणी विभाग, औरंगाबाद दिनांक १३.०२.२०२० - १९.०३.२०२० च्या पृष्ठ क्रमांक (३८१,३८२,३८३) वर प्रसिध्द झालेली आहे. सदर अधिसूचनेतील दुरुस्ती खालील प्रमाणे वाचावी.

गांव - राळेसांगवी ता.भूम जि.उस्मानाबाद

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना क्र. १ टप्पा क्रमांक ३ (ब) अंतर्गत, हिवर्डा कालवा मौ.राळेसांगवी ता.भूम जिल्हा उस्मानाबाद.

करीता वाचावे
अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र हे. आर स.नं./ग.नं क्षेत्र हे. आर
१ २ ३ ४ ५
१ ३८६ ०.२६ ३८६ ०.४४
एकुण ०.२६ ०.४४

टिप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक :- २९.०१.२०२१

ठिकाण :- उस्मानाबाद

स्वाक्षरीत/- (कौस्तुभ दिवेगावकर,) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.

---------------------------------------------------

स्वाक्षरीत/- (मनिषा राशिनकर) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम.

---------------------------------

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ ४९३ ५

उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी, परभणी यांजकडून

जाहिर प्रगटन

अर्जदार :- दिपक प्रभाकरराव गंुडाळे व प्रकाश प्रभाकरराव गुंडाळे रा.परभणी

वाद - विषय :- हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये विठ्ठल मंदिर परभणी या देवस्थानची सेवा अदा करण्यासाठी खिदमतमाश जमीनीची विरासत मंजुर करणे बाबत.

खिदमतमाश इनाम जमीनीचा तपशिल

अ.क्र. गावाचे नांव देवस्थानचे नांव गट क्रमांक क्षेत्र (हे.आर.)
१ परभणी श्री. विठ्ठल मंदिर, गांधी पार्क परभणी २३ ९.३१
२ २४ ७.७८

क्र. २०२०/जमाबंदी/इनाम/विरासत/कावि-१.-- उपरोक्त विषयी अर्जदार बाबत वरील तपशीलाप्रमाणे "खिदमत माश" इनाम जमीनीची विरासत दिपक प्रभाकरराव गुंडाळे व प्रकाश प्रभाकरराव गुंडाळे रा.परभणी यांनी अर्जदार दिपक प्रभाकरराव गुंडाळे व प्रकाश प्रभाकरराव गुंडाळे रा.परभणी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५२ अन्वये "श्री विठ्ठल मंदिर यांच्या हक्कात चार आणे (०-४-०) या प्रमाणे विरासत मंजुर करणे बाबत परभणी" ता.परभणीची सेवा अदा करण्या बाबत खिदमत माश इनाम कोणाचे काही आक्षेप तसेच हितसंबंध असल्यास सदर जाहिर प्रगटन जमीन (वरीलप्रमाणे) जमीनीची विरासत प्रभाकर रामभाऊ गुंडाळे रा.परभणी राजपत्रात प्रसिध्द झालेपासुन पंधरा (१५) दिवसाचे आत लेखी पुराव्यासह यांच्या नावे मंजुर असुन त्यांच्या मृत्यु नंतर वर नमुद "खिदमत माश" इनाम उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांचेकडे जमीनीचे चार आणे या प्रमाणात हिस्सा विरासत धारक यांचे वारस या समक्ष सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त आक्षेपांचा विचार करण्यात येणार नात्याने अर्जदार यांचे नावे हैद्राबाद अतियात अधिनियम १९५२ अंतर्गत नाही व प्रकरणात नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व मंजुर करणे बाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे.

संबंधितांनी नोंद घ्यावी.

तेव्हा सर्व जनतेस मौ.परभणी तसेच सर्व हितसंबंधितंाना सुचीत

ठिकाण :- परभणी

करण्यात येते की, अर्जदार यांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम

दिनांक :- /०४/२०२१

१९५२ अन्वये "श्री विठ्ठल मंदिर परभणी" ता.परभणीची सेवा अदा करण्या

(संजय कुंडेटकर) उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी, परभणी.

४९४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ भाग १ - पुरवणी ६ ७

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद

अधिसुचना

अधिसुचना

जा.क्र.जिउनि/नि.महात्माज्योतीबाफुले/नासहपतसं/नोंदणी/१५९३/२०२१ .- क्र. जिउनि/राजिनासहपत/उपविधीदु./अधिसुचना१४७५/२०२१.--- या

नोंदणी क्रमांक अेजीडी/अेजीडी/आरएसआर/सीआर/२३१/२०२१ दिनांक अधिसुचनेद्वारे अधिसुचित करण्यात येते की, राष्ट्रमाता जिजाऊ नागरी

२१.५.२०२१ अन्वये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद या सहकारी पतसंस्था म. जिजाऊ मंदीर, राजर्षी शाहू भवन, म्हाडा कॉलनी,

पत्राव्दारे अधिसुचना करित आहे, महात्मा ज्योतीबा फुले मागासवर्गीय बाबा पेट्रोल पंप, सी.बी.एस. रोड, औरंगाबाद या संस्थेने वर्ाषिक अधिमंडळ

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुलाबनगर, टाऊन हॉल, औरंगाबाद हि सभा दि. २१/०३/२०२१ रोजी ठराव क्र. ९ नुसार संस्थेच्या नावात बदल

संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) अन्वये करण्याचा ठराव संमत केलेला असून संस्थेचे नाव व पत्ता नवरंग नागरी

नोंदविण्यात आली आहे.

सहकारी पत संस्था म. औरंगाबाद, शॅापलेट भुखंड क्र. ०१ एन-७,

सिडको, अोंकार गॅस एजन्सी समोर, औरंगाबाद असे बदललेले असून त्या

उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी दुरुस्तीद्वारे मान्यता घेतलेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण अन्वये तिचे वर्गीकरण अधिनियम १९६० चे कलम १५ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम "साधन संपत्ती संस्था" व "कर्ज देणाया साधनसंपत्ती संस्था", असे १९६१ चे नियम १४(२) नुसार नाव बदलाबाबत सदर अधिसुचना निर्गमित करण्यात आले आहे.

केलेली आहे.

अनिलकुमार मंु. दाबशेडे, अनिलकुमार मंु. दाबशेडे,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद.

-------------------

-------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १७] गुरुवार ते बुधवार, जून, १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यांच्याकडून औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद

(महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये)

अधिसुचना

जा.क्र./मनपा/नरवि/ससंनर/वि.यो./२०२१/१९२१ कार्यालय महानगरपालिका औरंगाबाद

दिनांक :- ०३/०६/२०२१.

औरंगाबाद महानगरपालिका हद्दी करीता टिपीएस-३०९९/११०७/ सीआर-४७(बी)/२०००/यु.डी.३० दिनांक १८/०४/२००१ अन्वये मंजूर असून ती अंमलात आहे. (यापुढे उक्त विकास योजना म्हणून संबोधिलेली आहे). यामध्ये कटकटगेट ते पोलीस मेस हा १८.०० मीटर व ३०.०० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे.

ज्याआर्थी सद्यस्थितीत कटकट गेट ते पोलीस मेस या रस्त्याचे काम शासकीय अनुदानातुन सुरु असून, सदरील रस्ता कटकट गेट जवळ १८.०० मीटर रुंदीचा A to B व त्यापुढील रस्ता औरंगाबाद शहर मंजुर विकास योजनेनुसार B to C पयर्ंत ३०.०० मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे.

ज्याआर्थी B या बिंदुजवळ १८.०० मीटर रुंदीचा रस्ता हा ३०.०० मीटर रुंदीच्या रस्त्यास मिळतो. तसेच या ठिकाणी वळण आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन रहदारीची औ.भाग १ अ-१७

५८

कोंडी होते. तसेच या वळणालगत असलेल्या खाजगी मिळकतीवरील इमारतीमुळे वळणावर वाहनधारकांच्या दृषमानतेस अडथळा निर्माण होऊन या ठिकाणी अपघात होतात.

ज्याआर्थी मुळ शासन मंजुर विकास योजना सन १९७५ मध्ये रस्त्याचा भाग A to B व B to C पयर्ंत हा ३०.०० मीटर रुंदीचा प्रस्तावित होता. तथापि दरम्यानच्या काळात मुळ मंजुर विकास योजनेमध्ये सुधारणा होऊन सुधारित मंजुर विकास योजना सन २००१ मध्ये प्रसिध्द झाली. यामध्ये या रस्त्याच्या A to B या भागात बदल करुन सदरचा भाग हा १८.०० मीटर रुंदीचा विकास योजना रस्त्यामध्ये नियोजीत मुख्य रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी कटकट गेट ते पोलीस मेसकडील वळण या भागात (सोबतच्या नकाशातील भागA to B) यामध्ये १८.०० मीटर रुंद नियोजीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होणे व गर्दी होणे हे प्रकार टाळण्यासाठी कटकट गेट ते पोलीस मेस हा विकास योजना रस्ता अंखडपणे ३०.०० मीटर रुंदीचा करण्याचे नियोजीत केलेले आहे.

करीता सोबतच्या नकाशातील भाग A to B या भागातील नियोजीत रस्त्याची रुंदी वाढविणे आवश्यक आहे. सदर भागातील रस्त्याची रुंदी विकास योजनेमध्ये १८.०० मीटर असुन ती ३०.०० मीटर रुंद करणे आवश्यक असल्याने या आखणीत बदल करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये कार्यवाही करणे आवश्यक आहे.

त्यानुसार प्रस्तावित फेरबदल दर्शविणाया उक्त विकास योजनेच्या भाग नकाशावर प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यांनी दिनांक टाकून स्वाक्षरी केली असून, हा भाग नकाशा सहाय्यक संचालक नगर रचना, महानगरपालिका औरंगाबाद यांच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ ५९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) मधील तरतूदीनुसार ही अधिसुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन तीस दिवसाच्या आत सदर फेरबदलाबाबत ज्यांच्या कोणत्या सूचना / हरकती असल्यास त्यांनी अशा सूचना/ हरकती लेखी स्वरुपात सहाय्यक संचालक नगररचना, महानगरपालिका औरंगाबाद यांचेकडे सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त हरकती / सुचनांवर योग्य तो विचार करुन प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येईल.

नियोजीत बदल

भाग नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे कटकट गेट ते पोलीस मेस या ३०.०० मीटर रुंद विकास योजना रस्त्याची (कटकट गेट वळणा जवळील) रुंदी व आखणीमध्ये बदल करुन १८.०० मीटर रुंदीचा असलेल्या मंजुर विकास योजना नकाशातील भागात बदल करुन संपुर्ण रस्ता कटकट गेट ते पोलीस मेस सोबतच्या नकाशात दर्शविल्याप्रमाणे ३०.०० मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता म्हणून प्रस्तावित करणे.

ठिकाण: औरंगाबाद

दिनांक : / /२०२१.

आस्तिक कुमार पाण्डेय (भा.प्र.से.)

प्रशासक, महानगरपालिका, औरंगाबाद

-----------------------------------

From : Administrator of Aurangabad Municipal Corporation, Aurangabad

(Modification in the sanctioned Development Plan for Aurangabad (AA) u/s 37 of Maharashtra Regional & Town Planning Act 1966)

Notification

Out No./AMC/TP/ADTP/D.P./2021/1921 Aurangabad Municipal Corporation Date: 03/06/2021.

And whereas Government Urban Development Depart- ment vide its notification No. TPS-3099/1107/CR-47(B)/2000/ UD-30, Dt. 18/04/2021 sanctioned the Development Plan for Aurangabad City Area.

And whereas at present the concreting work of Katkat Gate to Police Mess Road is in Progress through Government grants.

The mentioned road of Katkat Gate to Police Mess (From Point A & B as shown in part plan) is of 18 m wide near Katkat Gate & from Point B to C is of 30m wide as per sanctioned development plan for Aurangabad city dated 18/04/2001.

And whereas the road of 18m width near point B meets the roads having width of 30 m & there is turn at this point result- ing in huge traffic congestion & obstruction to the visibility of Motorists hence this point might experience large number of accidents.

And whereas as per the government approved Develop- ment Plan of year 1975, section A to B & B to C was proposed as 30m wide. However in the meantime the revised develop- ment plan approved in the year 2001 section A to B has been modified & updated to 18.00 wide Development Plan Road.

Since this road is the main road carrying huge traffic & con- necting the old city and new city (Cidco), the width of the road near Katkat Gate turn (Section A to B as shown in the part plan attached hereby) is 18.00 m & hence insufficient and causes obstruction to the visibility of motorist and also from traffic congestion. To avoid this, the entire road from Katkat Gate to Police Mess (Inlcuding the turn is proposed to be 30.00m wide Development Plan Road.

And therefore it is essential to increase to width of the road from section A & B (As shown in part plan attached hereby) at turning and for that minor modification of final development plan under section 37 of M.R. & T.P. act 1966 to change the width of this road is mandatory.

And therefore the part plan of said minor modification of development plan showing the proposed modification has been signed by Administrator, Aurangabad Municipal Corpo- ration and is kept available for public observation on working days during working hours in Municipal Corporation Aurangabad.

According to the provisions of section 37 (1) of the Maharashtra regional and town planning act 1966, those who have any suggestions/objections regarding this change should submit such suggestions/objections in writing to A.D.T.P., Municipal Corporation, Aurangabad, within thirty days from the date of publication of this notification in the Gazette of Government of Maharashtra. After considering the suggestions / objections received, the proposal will be sub- mitted to Government for final approval.

Proposed Change

18 m wide Development Plan road from Katkat Gate to Po- lice Mess at section A & B as shown in part plan (Near Katkat Gate Turn) to be changed to 30m wide Development Plan road and the entire road from Katkat Gate to Police Mess (Includ- ing the turn) is proposed to be changed as 30 m wide road, as shown in part plan of sactioned Development Plan attached hereby.

Administrator

Aurangabad Municipal Corporation

--------------------

६० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून १०-१६, २०२१ : ज्येष्ठ, १९-२५, शके १९४३ भाग १ - पुरवणी प्रस्तावित फेरबदल २

मुख्याधिकारी यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम

उस्मानाबाद शहराच्या मंजुर विकास योजनेतील प्रस्तावानुसार मौजे उस्मानाबाद येथील सर्वे नं. ११८ आरक्षण ३९ म्हाडा या आरक्षण हे (भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे) रद्द करणे बाबत.

३७ अन्वये सुचना

जाहिर सुचना

ज्या अर्थी उस्मानाबाद शहाराची (दुसरी सुधारीत विकास योजना) महाराष्ट्र

्प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ (१)

अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसुचना क्र. टीपीएस-

वरील बदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगात दर्शविण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी उक्त फेर बदला बाबत जनतेकडुन सुचना व हरकती मागविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे. जे नागरिक हि सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि हरकती लेखी स्वरुपात सादर करतील त्यांचा विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करणेपुर्वी ही नगर परिषद करील.

३४०९६/१२५६/प्र.क्र.९९/२००९/नवि-३० दि.०४ एप्रिल २०१२ अन्वये मंजुरी

झाली असून, ती दि. १५ डिसेंबर २०१२ पासुन अंमलात आली आहे.

ज्या अर्थी, उस्मानाबाद नगर परिषदेने विशेष सभा विषय क्र.

उक्त विकास योजनेत प्रसतावित केलेला फेर बदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थनगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.

०४ दि. २१.१२.२०२० अन्वये मंजुर विकास योजना मध्ये उक्त अधिनियमाच्या

ठिकाण : नगर परिषद कार्यालय, उस्मानाबाद

कलम ३७ अन्वये खालील फेरबदल करावयाचे ठरविले आहे.

दिनांक : ३०/०४/२०२१

मंजुर विकास योजना प्रस्ताव

उस्मानाबाद शहराच्या मंजुर विकास योजनेतील प्रस्तावानुसार

(मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर) मा. अध्यक्ष नगर परिषद, उस्मानाबाद मौजे उस्मानाबाद येथील सर्वे नं. ११८ आरक्षण ३९ म्हाडा या आरक्षण हे

(भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे)

---------------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-10.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-10.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.