Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब (असाधारण क्रमांक 176) - गृहनिर्माण विभाग यांची अधिसूचना क्रमांक सेप्रनि-2020/प्र.क्र. 99/गृनिभू

Published 16 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

बुधवार, जून १६, २०२१/ज्येष्ठ २६ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ७४]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९.००

असाधारण क्रमांक १७६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ जून २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ .

क्रमांक सेप्रनि-२०२० /प्र.क्र.९९ / गृनिभू. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम , १ ९ ७६ ( सन १ ९ ७७ चा महाराष्ट्र-२८ ) यांच्या कलम १८४ च्या पोट- कलम ( २ ) च्या खंड ( एक) आणि कलम १ ९च्या पोट - कलम ( ५ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम , आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील " मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी " या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे , ते असे: -

१. या नियमांना , " महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी ( सेवा प्रवेश ) नियम , २०२१ " असे म्हणावे.

२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -

(अ) " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे .

(ब) " प्राधिकरण " म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १ ९ ७६ ( सन १ ९ ७७ चा महाराष्ट्र २८ ) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.

३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी सेवेतील मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी या पदावरील नियुक्ती माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी हे पद धारण करणाऱ्या व या पदावर ३ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या व्यक्तीमधून गुणवत्तेच्या व ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीला पदोन्नती देऊन करण्यात येईल. एमबीए किंवा संगणक अभियांत्रिकी/ संगणक तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीमधील एम.ई. / एम.टेक. ही अर्हता धारण केलेली व्यक्ती किंवा सॉफ्टवेअर / सॉफ्टवेअर डोमेन बाबत माहिती व अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल.

(१)

भाग चार- ब- १७६-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १६, २०२१ /ज्येष्ठ २६ , शके १ ९ ४३

४. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल , तर तिला सदर परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील .

५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात , बदलीस पात्र राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.