RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक ३२] गुरुवार, जून १७, २०२१/ज्येष्ठ २७, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ५४
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
जा. क्रमांक : ठामपा/आयुक्त/वियो-ठाणे/उसंनर/८१
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम-३८ सह कलम २३ (१) नुसार
ठाणे महानगरपालिका, ठाणे क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
शासनाने नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीएमसी. १०८२/२३०-एनसी/सेल (१), दिनांक १५ जून १९८२ अन्वये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली असून ती दिनांक १ ऑक्टोबर १९८२ पासून अस्तित्वात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीपीएस/१२९७/१३१९/सीआर-१४८-९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये विकास योजनेच्या काही भागास मंजुरी देण्यात आली होती तसेच विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्राकडील (Excluded Part) शासन निर्णय क्र. टीपीएस. १२०१/२७४/सीआर-२४/२००१/नवि-१२ दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजुरी देण्यात आलेली आहे व सदर विकास योजना दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे निर्देशिलेला) च्या कलम २३ (१) सह कलम ३८ अन्वये ठाणे महानगरपालिका नियोजन प्राधिकरण या नात्याने, सुधारित विकास योजनेच्या मंजुरीच्या दिनांकापासून वीस वषार्ंच्या आत किमान एकदा तरी ठाणे शहराची सुधारित मंजूर विकास योजना पुन्हा सुधारित करणे आवश्यक असल्याने, प्रारूप सुधारित (दुसरी वेळ) विकास योजनेचा मसुदा तयार करून, महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मागार्ंने सूचना प्रसिद्ध करून, प्रारुप सुधारित (दु.सु.) विकास योजना राज्य शासनास मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) अन्वये ठाणे महानगरपालिकेने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ३८, दिनांक १९ मे २०२१ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
भाग दोन-५४---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून १७, २०२१/ज्येष्ठ २७, शके १९४३ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.
ज्या नागरिकांच्या या विकास योजनेच्या प्रस्तावाबाबत काही सुचना/हरकती असतील त्या त्यांनी ही सुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
ठाणे, दिनांक १६ जून २०२१.
डॉ. विपिन शर्मा, भा.प्र.से., महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून १७, २०२१/ज्येष्ठ २७, शके १९४३ ३THANE MUNICIPAL CORPORATION, THANE
No. TMC/Comm./D.P.Thane/DDTP/81
NOTICE
[ Declaration of Intention to prepare Development Plan of Thane Municipal
Corporation under Section 23(1) read with section 38 of the Maharashtra
Regional and Town Planning Act, 1966 ]
Thane Municipal Corporation, Thane has been constituted by the State Government under Urban Development Department's resolution No. TMC.1082/230-NC/Cell(i), dated 15th June 1982 and it came into existence from date 1st October 1982. As per State Government under Urban Development Department's resolution No. TPS.1297/1319/CR-148-97/UD-12, dated 4th October 1999 Development Plan was partially sanctioned and rest of portion (Excluded Part) was sanctioned by State Government under Urban Development Department's resolution No. TPS. 1201/274/ CR-24/2001/UD-12, dated 3rd April 2003 and such Development Plan came into force from date 14th May 2003 ;
And whereas, under sub-section (1) of section 23 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") read with section 38, atleast once in twenty years from the date on which a Development Plan has come into operation, therefore the Thane Municipal Corporation as a Planning Authority (hereinafter referred to as "the said Planning Authority") shall prepare draft Development Plan and publish a notice of such preparation in the Official Gazette and in other prescribed manner and submit the draft Development Plan to the State Government for sanction ;
Hence,the Thane Municipal Corporation by its resolution No. 38, date 19th May 2021, has given consent to declare its intention to revise the sanctioned Development Plan (second revision) as per provision of section 23(1) read with section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly,this notice is being published.
The plan showing boundary of the area included in Development Plan of Thane Municipal Corporation is kept open for inspection by the public on office working days,during office hours at the head office of Thane Municipal Corporation, Thane as required under section 23(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Any suggestion/objection of the public in this regard may be forwaded in writing to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation within a period of 60 (sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette.
The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.
DR. VIPIN SHARMA, I.A.S., Thane, Municipal Commissioner, Date : 16th June 2021. Thane Municipal Corporation, Thane.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.