Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex.45) (29th June 2021) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, जिल्हा मुंबई उपनगर (भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 25 खाली अधिसूचना क्रमांक उपजिभूक्र.7/भूसं/मुंउजि/एलएक्यू 843/2021

Published 29 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ७ , अंक ३४ (२ )]

मंगळवार , जून २ ९ , २०२१ / आषाढ ८ , शके १ ९ ४३

[ पृष्ठे २ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ४५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, जिल्हा मुंबई उपनगर

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे

कलम २५ खाली अधिसूचना

क्रमांक उपजिभूक्र. ७ / भूसं/ मुंउजि / एलएक्यू ८४३ / २०२१.-मौजे मालाड तालुका बोरीवली जिल्हा मुंबई उपनगर येथील " भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ " अंतर्गत न.भू.क्र .८२७ भाग स . क्र. २३ ९ भागचे भूसंपादन.

ज्याअर्थी, प्रस्तुत भूसंपादन प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशान्वये उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन) क्र. ७ यांना प्राधिकृत केले आहे . प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २५-३१ ऑक्टोबर २०१८ रोजी व कलम १ ९ ( १ ) ची अधिसूचना दिनांक ११ जानेवारी २०१ ९ रोजी प्रसिद्ध झाली .

ज्याअर्थी , विहित मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाल्याने व भूमिसंपादन अधिनियम , २०१३ चे कलम २५ अन्वये अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करणेत येऊन निवाडा घोषित करण्याच्या कालावधीत ६ महिन्यांची वाढ यापूर्वी मंजूर करण्यात आली आहे ;

ज्याअर्थी , उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन ) क्र. ७ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना महामारीमुळे झालेला प्रशासकीय विलंब , मा. उच्च न्यायालयात बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपादनाखालील जमिनीच्या क्षेत्राबाबत दाखल केलेली Notice of Motion (L ) No. 103/2019 व Review Petition ( L ) No. 41/2019 याचिका , तसेच हितसंबंधितांनी संपादनाखालील क्षेत्राबाबत नोंदविलेला आक्षेप व मा. उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका ( L) क्र . ६०४२/२०२० या अद्याप निर्णित झालेल्या नसलेने अंतिम निवाडा घोषित करणे उचित होणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुदतवाढ न दिल्यास संपादनाची संपूर्ण प्रक्रिया संपुष्टात येईल ;

आणि ज्याअर्थी , कलम १ ९ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने उपरोक्त कलम २५ च्या अधिसूचनेद्वारे वाढीव ६ ( सहा ) महिन्यांच्या कालावधीत निवाडा घोषित करणेस झालेल्या विलंबास समर्थन करणारी परिस्थिती असून सदर मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची माझी खात्री झाली आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु . ) -४५-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जून २ ९, २०२१/आषाढ ८ , शके १९ ४३ त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी , या नात्याने प्रकरणात १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा असलेला अधिकार वापरून खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण्यास दिनांक ११ जुलै २०२१ पासून ६ ( सहा) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे.

अनुसूची- एक जमिनीचे वर्णन

मौजे - मालाड

जिल्हा - मुंबई उपनगर

तालुका - बोरीवली

अ. क्र.

स . क्र.

दि. २ ९ / ०८ / २०२० रोजीचे

कलम १ ९ ( १ ) चे

न. भू. क्र.

शुद्धिपत्रकानुसार अधिसूचित केलेले क्षेत्र (चौ.मी. )

(२) (३)

(१)

(४)

१.

८२७अ २३ ९ पै.

१,४२,८२३.८०

संपादनाचे प्रयोजन. - पुनर्वसन व पुनर्स्थापन , २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरिता भूसंपादन .

मुंबई ,

दिनांक २ ९ जून २०२१ .

राजीव निवतकर, जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR

CHARNI ROAD , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.