महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक ९६] शुक्रवार, ऑगस्ट ६, २०२१/श्रावण १५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २२०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
नगरविकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक ६ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.
क्रमांक लामनपा-२०१६/प्र.क्र.११३/नवि-२४. लातूर शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ हे शासन अधिसूचना क्र. लामनपा-२०१६/प्र.क्र.११३/नवि-२४, दिनांक २ नोव्हेंबर २०१९ अन्वये अधिसूचित करण्यात आले आहेत. या सेवा प्रवेश नियमातील परिशिष्ट-२ मध्ये अ.क्र. ७ व अ.क्र. ४२ मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५७ (३) अंतर्गत सुधारणा करण्यासाठी या(cid:४६२)ारे पुढील नियम करण्यात येत आहेत :
नियम
१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याप्ती :
(१) या नियमांना " लातूर शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) (सुधारणा) नियम, २०२१ " असे संबोधण्यात येईल.
(२) हे नियम अंतिमरित्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून अंमलात येतील.
(३) या नियमांन्वये, लातूर शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ च्या परिशिष्ट (२) मधील तक्त्यातील अ.क्र. ७ येथील " लिपिक-टंकलेखक " व अ.क्र. ४२ येथील " स्वच्छता निरीक्षक " या पदाच्या नेमणुकीची पद्धत व टक्के वारी आणि नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीच्या पद्धती यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :