Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 229 (13th August 2021)

Published 13 August 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १३, २०२१/श्रावण २२, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ७, अंक १००] शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१/श्रावण २२, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २२९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर, ९ वा मजला, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक १३ ऑगस्ट २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५.

क्रमांक एमएमसी. ०९२०/प्र.क्र. ७५/अधिनियम.----- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४६) मधील कलम ३० च्या पोट-कलम (२) च्या खंड (e) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने, करण्याचे योजिलेल्या पुढील नियमांचा मसुदा, यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम ३० च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाकडून उक्त मसुदा दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

सदर मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, उपरोक्त दिनांकापूर्वी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर, ९ वा मजला, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१ यांना प्राप्त होतील, त्या शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

नियमांचा मसुदा

(१) या नियमास महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (सुधारणा) नियम, २०२१ असे म्हणावे. (२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम, १९६७ मधील ( यापुढे "मुख्य नियम" असे संबोधण्यात येईल) नियम ३६ मध्ये नमूद "रुपये शंभर" या मजकुराऐवजी "रुपये दोन हजार" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(३) मुख्य नियमाच्या नियम ५२ मध्ये नमूद "रुपये साठ" या मजकुराऐवजी "रुपये दोन हजार" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, दौलत देसाई, शासनाचे सहसचिव. भाग चार--ब----२२९---१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १३, २०२१/श्रावण २२, शके १९४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital Ground, 9th Floor, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 13th August 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA MEDICAL COUNCIL ACT, 1965.

No. MMC. 0920/C.R.75/Adhiniyam.— The following draft of rules which the Government of Maharashtra proposes further to amend the Maharashtra Medical Council Rules, 1967, in exercise of the powers conferred by clause (e) of sub-section (2) of section 30 of the Maharashtra Medical Council Act, 1965 (MAH. XLVI of 1965) and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub- section (1) of section 30 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that, the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 30th August 2021.

2. Any objection or suggestion which may be received by the Secretary, Medical Education and Drugs Department, G.T.Hospital Campus, 9th Floor, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, from any person with respect to the said draft, before the aforesaid date, will be considered by the Government.

DRAFT RULES

1. These Rules may be called the Maharashtra Medical Council (Amendment) Rules, 2021.

2. In rule 36 of the Maharashtra Medical Council Rules, 1967 (hereinafter referred to as "the principal Rules"), for the words "rupees one hundred" the words "rupees two thousand" shall be substituted.

3. In rule 52 of the principal Rules, for the words "rupees sixty" the words "rupees two thousand" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DAULAT DESAI, Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.