RNI No. MAHBIL /2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ४१ ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ११.०० शुक्रवार, ऑगस्ट १३ , २०२१ / श्रावण २२ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ५२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ( नागरी क्षेत्र कमाल धारणा ) बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
प्रकरण क्रमांक सी/युएलसी /डे- XV / ६ ( १ ) / SR /XIV - १५२ .- ज्याअर्थी, श्री . हसन बाबामिया बांगी यांनी ते धारण करीत असलेल्या मौजे- बोरीवली, ता. बोरीवली येथील स.क्र. ५०/४ ( न.भू.क्र. ३२० ) मधील क्षेत्राबाबत नाजकधा कलम ६ ( १ ) खालील विवरणपत्र दिनांक १६ ऑगस्ट १ ९ ७६ रोजी दाखल केले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाने नाजकधा कलम ८ ( ४ ) खालील आदेश ( संदर्भ क्र.२ ) दिनांक ३० मार्च १ ९९ ० रोजी पारित केले असून त्यानुसार एकूण २३८६.४० चौ.मी. क्षेत्रापैकी १८८६.४० चौ.मी. क्षेत्र अतिरिक्त घोषित करण्यात आले आहे . तद्नंतर सदर अतिरिक्त घोषित क्षेत्राबाबत नाजकधा कलम १० ( १ ) ( संदर्भ क्र. ३ ) व १० ( ३ ) ( संदर्भ क्र. ४ ) च्या अधिसूचना अनुक्रमे दिनांक २० एप्रिल २००० व दिनांक १५ जून २००५ रोजी पारित करण्यात आल्या असून सदर अधिसूचना अनुक्रमे दिनांक २८ डिसेंबर २००० व दिनांक २५ ऑगस्ट २००५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तद्नंतर नाजकधा कलम १० ( ५ ) ( संदर्भ क्र.५ ) खालील नोटीस दिनांक १६ नोव्हेंबर २००५ रोजी बजाविण्यात आली आहे व सदर जमिनीचा ताबा नगर भूमापन अधिकारी, बोरीवली यांचेमार्फत दिनांक २८ डिसेंबर २००५ रोजी घेण्यात आलेला आहे.
आणि ज्याअर्थी, या कार्यालयातील नस्ती क्र. एसआर- IV/ २०३,२०४ चे अवलोकन करता नाजकधा कलम २१ खालील सुटीचे आदेश ( संदर्भ क्र.१ ) दिनांक ७ जुलै १ ९ ७ ९ अन्वये १ ) श्री. रतिलाल गोकुळदास ठक्कर, २ ) श्री . हसन बाबामिया बांगी व ३ ) श्री. चिंतामण शिवराम पाटील धारण करीत असलेल्या मौजे- बोरीवली, ता. बोरीवली येथील स.क्र. ५०/२ , ५०/४ व ५०/५ मधील एकूण ६६८८.२० चौ.मी. क्षेत्रापैकी ५८३७.७१ चौ.मी. क्षेत्रास सूट देण्यात आलेली आहे. श्री. हसन बाबामिया बांगी यांनी नाजकधा कलम ६ ( १ ) खालील विवरणपत्रात नाजकधा कलम २१ खाली सुटीसाठी अर्ज केल्याचे नमूद केलेले असताना व सदर मौजे- बोरीवली , ता. बोरीवली येथील स.क्र. ५०/४ न.भू.क्र. ३२० मधील क्षेत्रास नाजकधा कलम २१ खाली दिनांक ७ जुलै १ ९ ७ ९ रोजी सूट दिलेली असताना नाजकधा कलम १० खालील कार्यवाही चुकीची व निष्प्रभ ठरते .
आता त्याअर्थी, वरील सर्व विवेचनाचा विचार करता मौजे- बोरीवली, ता . बोरीवली येथील स.क्र. ५०/४ न.भू.क्र. ३२० मधील क्षेत्राबाबत करण्यात आलेली नाजकधा कलम १० खालील संपादनाची कार्यवाही सदर आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु ) ५२-१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , ऑगस्ट १३ , २०२१ / श्रावण २२ , शके १ ९ ४३ सबब, महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २५ ऑगस्ट २००५ रोजी पृष्ठ क्र. ३ ९ वर प्रसिद्ध झालेली अधिसूचना रद्द करण्यात येत आहे.
अनुसूची
गांव
क्षेत्रफळ अ.क्र.
जिल्हा
स.क्र./न.भु.क्र.
तालुका
बोरीवली
बोरीवली
१
५०/४
१८८६.४० मुंबई उपनगर
३२०
१८८६.४०
एकूण
वांद्रे ( पूर्व ) , मुंबई , दिनांक २ ९ जुलै २०२१ .
मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म. ) , बृहन्मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .