Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ext. No. 71 (20-08-2021) : ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर विकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक ठामपा/शविवि/क्लस्टरसेल/११४

Published 20 August 2021

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/46121

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

शुक्रवार , ऑगस्ट २० , २०२१/ श्रावण २ ९ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ४६]

[पृष्ठे ३ , किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७१

प्राधिकृत प्रकाशन

ठाणे महानगरपालिका, ठाणे

शहर विकास विभाग

अधिसूचना

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १ ९ ६६ )

क्रमांक ठामपा / शविवि / क्लस्टरसेल / ११४ . ज्याअर्थी , ठाणे शहराची सुधारीत विकास योजना शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १ ९ ६६ चे कलम ३१ ( १ ) नुसार ( यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केला आहे. ) शासन निर्णय क्र . टिपीएस . १२ ९ ७ / १३१ ९ / सीआर -१४८ / ९ ७ / नवि-१२ , दिनांक ४ ऑक्टोबर , १ ९९९ अन्वये मंजूर केली असून , ती दिनांक २२ नोव्हेंबर १ ९९९ पासून अंमलात आहे . तसेच सुधारीत विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्राची (Excluded portion ) विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस . १२०१ / २७४ / सीआर -२८ / २००१ / नवि-१२ , दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये शासनाने उक्त अधिनियमानुसार मंजूर केली असून ती दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आहे ; (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे. )

आणि ज्याअर्थी , ठाणे महानगरपालिका प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीत काही बदल करून शासनाने निर्णय क्र.टिपीएस / १२ ९ ५/ सीआर- २२२ / ९ ४ /नवि-१२ , दिनांक २८ एप्रिल १ ९९ ५ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३१ ( १ ) अन्वये विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली आहे व सदर नियमावली दिनांक १ जून १ ९९ ५ पासून अंमलात आहे ;

आणि ज्याअर्थी , राज्य शासनाने शासन निर्णय क्र . टिपीएस. १८१८/प्र.क्र . २३६/ १८ / कलम ३७ ( १कक) (ग) व कलम २० ( ४ )/ नवि -१३ , दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली , ( यापुढे " उक्त विकास नियंत्रण नियमावली " असे संबोधिलेली ) मधील विनियम क्र. १४.८ नुसार नागरी पुनरुत्थान योजनेकरीता विनियम विहित केलेले आहेत. आणि उक्त विकास नियंत्रण नियमावली दिनांक ३ डिसेंबर २०२० पासून ठाणे महापालिकेला लागू आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम क्र. १४.८.१ ( ii ) (b ) च्या तरतुदीनुसार नागरी पुनरुत्थान आराखडा तयार करणेचे, अधिसूचित करण्याचे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सुधारीत करण्याचे अधिकार आयुक्त यांना असल्याचे नमूद आहे .

त्याअर्थी, उक्त विकास नियंत्रण नियमावलीनुसार मला प्रदान केलेल्या अधिकारान्वये, ठाणे शहराच्या हद्दीतील आनंदनगर ( पूर्व द्रुतगती मार्गालगत ) हे क्षेत्र याद्वारे नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. ४५ आनंदनगर (पूर्व द्रुतगती महामार्गालगत) म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर नागरी पुनरुत्थान आराखड्याच्या ( क्षेत्र ११.९ १ हेक्टर ) सीमा पूर्व द्रुतगती महामार्ग , रेल्वेलाईन, नाला व ठाणे महापालिका हद्द यांनी वेढलेली आहे .

(१)

भाग दोन -७१-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑगस्ट २०, २०२१ / श्रावण २९ , शके १ ९ ४३

सदर आराखड्याची हद्द दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ खालील ठिकाणी , पुढील तीस दिवसांकरीता ठेवण्यात येत आहेत.

( १ ) उप संचालक, नगर रचना , क्लस्टर सेल , यांचे कार्यालय , माजीवाडा, ठाणे.

(२ ) शहर विकास विभाग , चौथा मजला , ठाणे महानगरपालिका, ठाणे.

(३ ) नौपाडा- कोपरी प्रभाग समिती कार्यालय.

ही अधिसूचना व अधिसूचीत नकाशा www.tmctp.thanecity.gov.in या संकेत स्थळावर सुद्धा उपलब्ध आहे .

ठाणे ,

डॉ. विपिन शर्मा , भा.प्र.से. आयुक्त,

दिनांक : १७ ऑगस्ट २०२१.

ठाणे महानगरपालिका, ठाणे .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , ऑगस्ट २० , २०२१ / श्रावण २ ९, शके १ ९ ४३

THANE MUNICIPAL CORPORATION

TOWN DEVELOPMENT DEPARTMENT

NOTIFICATION

(Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 )

No. TMC /TDO/ Cluster Cell/114.-Whereas , the Revised Development Plan of the Thane City has been sanctioned by the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , ( hereinafter referred to as " the said Act " ) vide Notification No.TPS - 1297/ 1319/CR- 148 /97/UD -12 , dated 4th October 1999 , which has come into force with effect from 22nd November 1999 , and the Excluded Part ( EP ) of the said Development Plan has been sanctioned under the said Act vide Government Notification No. TPS/ 1201/274/CR- 28/ 2001/UD - 12 , dated 3rd April 2003 which has come into force with effect from the 14th May 2003 ; ( hereinafter referred to as " the said sanctioned development plan") .

And whereas , the Development Control Regulations of Thane Municipal Corporation has been sanctioned by the Government after making some modifications in draft Development Control Regulations of Thane City vide Urban Development Department , vide Notification No. TPS / 1294/ 1259/CR - 222/94/UD - 12 , dated 28th April 1995 under section 31 ( 1 ) of the said act which has come into force with effect from the 1st June 1995 ;

And whereas , State Government has sanctioned Unified development control and Promotion regulations vide resolution No. TPS . 1818/CR236/ 18 /DP & RP/ sec . 37 ( 1AA ) ( c ) & sec . 20 ( 4 )/UD - 13 , dated 2nd December 2020 ( hereinafter referred to as " the said regulations " ) and regulation No. 14.8 of the said regulations specifies regulation for Urban Renewal Scheme and the said regulation are in force for Thane Municipal Corporation from dated 3rd December 2020 ;

And whereas , as mentioned in the regulation No. 14.8.1 ( ii ) ( b ) of the said regulations , that commissioner can prepare and notify Urban Renewal Plan and revise the same , as and when required.

Therefore , as per powers conferred to me vide the said regulations , the Anand Nagar ( near Eastern Express Highway ) area within limits of Thane Municipal Corporation is hereby declared as Urban Renewal Plan No. 45 Anand Nagar ( near Eastern Express Highway) . The boundaries of this Urban Renewal Plan ( area - 11.91 hect .) is bounded by Eastern Express Highway , Railway line , Nalla and Thane Corporation limit .

The plans showing boundaries of new Urban Renewal Plan area is kept for inspection by general public at following places for next thirty days .

1. Office of the Deputy Director of Town Planning , Cluster Cell , Majiwada , Thane 2. Town Development Department , 4th Floor , Thane Municipal Corporation , Thane 3. Naupada Kopri Ward Office .

This notification and notified plan is also available on website www.tmctp.thanecity.gov.in

DR. VIPIN SHARMA , I.A.S. Thane,

dated the 17th August 2021 .

Commissioner , Thane Municipal Corporation .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.