Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ-मध्य उप विभाग, असा क्र. 44, असा क्र. 44, ग्रामविकास विभाग, आदेश, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961, क्रमांक झेडपीबी-2016/प्र.क्र. 20/प.रा. 5.

Published 23 August 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31748

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -अ- मध्य उप- विभाग

सोमवार , ऑगस्ट २३ , २०२१ / भाद्रपद १, शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ३१ ]

[पृष्ठे ३ , किंमत: रुपये २६.००

असाधारण क्रमांक ४४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

ग्राम विकास विभाग

बांधकाम भवन , २५ मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक २३ ऑगस्ट , २०२१ .

आदेश

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ .

क्रमांक झेडपीबी-२०१६/प्र.क्र .२० /पं.रा.५. ज्याअर्थी , महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१ ९६५ चा महा.४० ) याच्या कलम ३४१क चे पोट - कलम ( १ ) व ( २ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना , नगर विकास विभाग क्र.एमयुपी २०१७ /प्र.क्र.१४ / नवि १८ , दिनांक ८ डिसेंबर, २०२० (यात यापुढे जिचा ८८ उक्त अधिसूचना " असा निर्देश करण्यात आला आहे. ) अन्वये महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील देहू महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट- कलम ( २ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे देहू नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठीत करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा पाच ) याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता , हक्क आणि दायित्वे ( त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे;

त्याअर्थी , आता, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे , असा निदेश देते की, पुणे जिल्ह्यातील देहू महसुली गावासंबधात पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता, हक्क आणि दायित्वे ( तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे भाग एक- अ (म.उ.वि. ) - ४४-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग, ऑगस्ट २३, २०२१/ भाद्रपद १ , शके १ ९४३ धरून ) ही , शासन निर्णय , ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच -१ ९९ ७ / सीआर-६४५/५६(४७ ) दि.२० जुलै १ ९९९ या मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर देहू नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मंगेश मोहिते ( भा.प्र.से. ) , शासनाचे सह सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग , ऑगस्ट २३ , २०२१ / भाद्रपद १ , शके १९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan , 25 Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated the 23rd August 2021 .

Order

MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT , 1961 .

No. ZPB - 2016/CR - 20/PR 5.-Whereas , the Government of Maharashtra , vide Notification , Urban Development Department , No. MUP- 2017/C.R.14/UD - 18 dated 8th December , 2020 (hereinafter referred to as " the said Notification " ) issued in exercise of the powers conferred by sub - sections (1), and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) has specified the local area of revenue village of Dehu in Pune District to be a transitional area , for which a Nagar Panchayat as provided in sub - sections (2) of said section 341A of the said Act , by the name of the Dehu Nagar Panchayat , is constituted ;

And whereas , pursuant to the said notification , it is expedient to issue an order for transfer of assets , rights and liabilities of the existing local authority ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it ) to the successor local authority under clause ( vi) of sub- section (2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( vi) of sub - section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah V of 1962 ) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets , rights and liabilities of the Pune Zilla Parishad , ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it ) in respect of the revenue village Dehu in Pune District shall stands transferred to and shall vest in the Dehu Nagar Panchayat on the terms and conditions specified in the Government Resolution , Rural Development and Water Conservation Department , No. MPH - 1997/CR- 645 /56 (47 ) , dated the 20th July , 1999 .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

MANGESH MOHITE ( I.A.S. ) , Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.