RNI No. MAHBIL / 2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
गुरुवार, ऑगस्ट २६, २०२१ / भाद्रपद ४ , शके १९४३
वर्ष ७ , अंक ४७ ]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
मिरा भाईंदर महानगरपालिका
अधिसूचना
क्रमांक: मिभामनपा/सचिव/ ६२ / २०२१-२२
नामनिर्देशित पालिका सदस्य नियुक्तीबाबत मा . सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेमध्ये मा . सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी सदर प्रकरणी महाराष्ट्र शासनाचे संबंधित मंत्री यांस आदेशाच्या तारखेपासून ३ आठवड्यांच्या आत पक्षकारांस सुनावणी देऊन व त्यांस आपले मत मांडणेची संधी देऊन नव्याने निर्णय घेण्यास आदेशित केले आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मा. मंत्री , नगरविकास विभाग , महाराष्ट्र राज्य यांनी सर्व पक्षकारांची दि . १७ ऑगस्ट २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी आयोजित केलेली होती . सुनावणी दरम्यान सर्व पक्षकारांना आपले लेखी / तोंडी म्हणणे मांडण्याची संधी देऊन, सुनावणीअंती मा . मंत्री , नगरविकास विभाग यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम ४५१ अन्वये महासभा दिनांक ७ डिसेंबर २०२० , ठराव क्र. २६ विखंडीत करून , मिरा भाईंदर महानगरपालिकेवर तौलानिक संख्याबळानुसार नामनिर्देशित पालिका सदस्यांची नियुक्ती करणेसाठी आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी शिफारस केल्याप्रमाणे सदस्यांच्या नियुक्तीस मान्यता देत असल्याचा आदेश पारित केलेला आहे. करीता नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
महानगरपालिका आयुक्त यांनी नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेसाठी मान्यता दिलेनुसार , मी वासुदेव शिरवळकर , नगरसचिव , मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ नियम ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करीत आहे.
(१)
भाग दोन- ७२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , ऑगस्ट २६ , २०२१ / भाद्रपद ४ , शके १ ९ ४३
अ.क्र.
(१)
नामनिर्देशित पालिका सदस्याचे नाव (२)
पुरस्कृत पक्षाचे / आघाडीचे नाव (३)
१
अॅड. खन शफीक अहमद सादत खान
काँग्रेस लोकशाही आघाडी
२
शिवसेना
श्री. सिंह विक्रमप्रताप रमापती
३
श्री . अजित भगवान पाटील
भारतीय जनता पार्टी
४
भारतीय जनता पार्टी
श्री. अनिल बाबुराव भोसले
भारतीय जनता पार्टी
५
श्री . भगवती तुगनचंद शर्मा
भाईंदर
दिनांक २६ ऑगस्ट २०२१ .
वासुदेव शिरवळकर, नगरसचिव, मिरा भाईंदर महानगरपालिका.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .