Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Extra Ordinary Gazette No. 19, Dated 2nd September 2021 Higher and Technical Education Department, Maharashtra Ordinance No. II of 2021

Published 02 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ७, अंक १०] गुरुवार, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.--- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ यात आणखी पृष्ठे १-३ सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २ सप्टेंबर २०२१.

MAHARASHTRA ORDINANCE No. II OF 2021.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STATE BOARD OF

TECHNICAL EDUCATION ACT, 1997.

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्र राज्य तंत्र १९९७ चा महा. ३८.

शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;

त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (सुधारणा) अध्यादेश, २०२१, असे संक्षिप्त नाव व प्रारंभ.

म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

(१)

भाग चार-१९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ २. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" १९९७ चा महा. ३८.

असा केला आहे) याच्या कलम २६ मधील,----

(एक) पोट-कलम (३) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम २६ ची सुधारणा.

""परंतु, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करिता, असे अर्ज १५ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी करण्यात येतील."";

(दोन) पोट-कलम (४) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

""परंतु, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करिता विहित कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अशा सर्व अजार्ंची मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते १० ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी शासनाकडे पाठविण्यात येतील."".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ३५ मधील, पोट-कलम (२) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

""परंतु, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करिता, संस्था बंद करू इच्छिणारे व्यवस्थापन, १५ सप्टेंबर २०२१ सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम ३५ ची सुधारणा.

रोजी किंवा त्यापूर्वी मंडळाकडे अर्ज करील."".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ ३

निवेदन

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ (१९९७ चा महा. ३८) मध्ये, पदविकास्तरीय तंत्र शिक्षणाशी संबंधित असणाया बाबींचे नियमन करण्याकरिता राज्य मंडळाची स्थापना करण्यासाठी तरतूद केली आहे. उक्त अधिनियमाची कलमे २६, २७ व ३५ यांमध्ये नवीन संस्था, नवीन पाठयक्रम, जादा विद्याशाखा, नवीन विषय, जादा तुकडया सुरू करण्यासाठी व संस्था बंद करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता अर्ज करण्याची आणि छाननीनंतर अर्ज शासनाकडे पाठविण्याची कालमर्यादा विहित केली आहे. नवीन संस्था सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, त्याने ज्या वर्षापासून परवानगी मागितलेली आहे त्याच्या अगोदरच्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी मंडळाकडे विहित नमुन्यात अर्ज करील अशी तरतूद उक्त कलम २६ च्या पोट-कलम (३) मध्ये केली आहे. उपरोक्त विहित कालमर्यादेत मिळालेल्या अशा सर्व अजार्र्ंची मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी शासनाकडे पाठविण्यात येतील अशी तरतूद उक्त कलम २६ च्या पोट-कलम (४) मध्ये केली आहे. नवीन पाठयक्रम, जादा विद्याशाखा, नवीन विषय आणि जादा तुकडया सुरू करण्याच्या परवानगीच्या कार्यपद्धतीबाबत तरतूद कलम २७ च्या पोट- कलम (५) मध्ये केली आहे. संस्था बंद करू इच्छिणारे व्यवस्थापन, आधीच्या वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी मंडळाकडे अर्ज करील, अशी तरतूद कलम ३५ च्या पोट-कलम (२) मध्ये केली आहे. तथापि, कोविड-१९ सार्वत्रिक साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे, उक्त अधिनियमामध्ये विहित केलेल्या कालमर्यादेचे अनुपालन करणे शक्य झाले नाही.

२. संपूर्ण भारत, कोविड-१९ सार्वत्रिक साथरोगाला तोंड देत आहे आणि त्याचा शैक्षणिक व सामाजिक- र्आथिक क्षेत्रावर मोठयाप्रमाणात प्रतिकूल परिणाम झाला आहे. या सार्वत्रिक साथरोगामुळे तरुण पिढीसाठी रोजगारविषयक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. अशी गंभीर परिस्थिती विचारात घेता आणि तरूणांना भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी प्रस्तावित केल्याप्रमाणे उदयोन्मुख क्षेत्रांतील कौशल्य शिक्षण देऊन त्यांच्यासाठी शैक्षणिक व रोजगारविषयक संधी वाढविण्याकरिता, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन संस्था, नवीन पाठयक्रम, जादा विद्याशाखा, नवीन विषय, जादा तुकडया सुरू करण्यासाठी , संस्था बंद करण्यासाठी परवानगी घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी व अर्ज छाननी झाल्यानंतर शासनास पाठविण्यासाठी नवीन वेळापत्रक विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते. या प्रयोजनार्थ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ याची कलमे २६ व ३५ मध्ये यथोचित सुधारणा करणे इष्ट वाटते.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,

भगत सिंह कोश्यारी,

दिनांक २ सप्टेंबर २०२१.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विकास चंद्र रस्तोगी,

शासनाचे प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.