|
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ३७(३)]
गुरुवार, सप्टेंबर ९, २०२१/भाद्र १८, शके १९४३
[पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ५४
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ८ सप्टेंबर २०२१
अधिसूचना
क्रमांक डीआयपी-२०२१/प्र. क्र. ८५/३०.----माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते कै.गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे शुक्रवार,
दि. ३० जुलै २०२१ रोजी सोलापूर येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करुन श्रध्दांजली
अर्पण केली.
कै. गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट, १९२७ रोजी सोलापूर जिल्ह्यतील पिंपरी (ता. मोहोळ) येथे झाला. त्यांचे शिक्षण
बी.ए., एलएल. बी. पयर्ंत झाले होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कै. गणपतराव देशमुख यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी सभेचा
कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकिर्द सुरु झाली. कै. देशमुख आबा म्हणून सर्व परिचित होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी विरोधी आंदोलनातही
ते सक्रीय होते. सांगोले मतदारसंघातून वयाच्या चौतिसाव्या वर्षी ते विधिमंडळात पोहचले. १९६२ ते २०१४ पयर्ंतच्या अकरा विधानसभा निवडणुका
जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९७७ मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी कृषी, ग्रामविकास, विधि व न्याय खाते तसेच पणन, रोजगार
हमी योजना खात्याचे मंत्रीपदही भुषविले होते. विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचेही ते अध्यक्ष होते. विधानमंडळाच्या विविध समित्यांवरही त्यांनी
सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळ, शेतकरी शिक्षण संस्था, सांगोले, माणगंगा सहकारी साखर कारखाना, सांगोले तालुका शेतकरी साखर
कारखाना, शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोले, शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणी यांसह महाराष्ट्र राज्य पाणी परिषदेचे अध्यक्ष
म्हणूनही कै. देशमुख यांनी भरीव कार्य केले आहे.
शेती, सहकार, शिक्षण क्षेत्राविषयी आत्मियता असलेल्या कै. देशमुख यांच्या दिनक्रमात वाचन आणि जनमानसात रमणे, त्यांच्या अडीअडचणी
सोडविणे याच गोष्टी प्राधान्यक्रमावर होत्या. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
यांचा कै. गणपतराव देशमुख यांनी लोकप्रतिनीधींसाठी आदर्श निर्माण केला. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
ते आयुष्यभर झटत राहीले. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा होता. कामांच्या पाठपुराव्यातही ते तरुणांच्या पुढे असत.
भाग एक (म.उ.वि.)----५४
(१) |
|