RNI No. MAHBIL/ 2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग सोमवार , सप्टेंबर १३ , २०२१ / भाद्र २२ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ३३ (२ ) ]
[ पृष्ठे ३, किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक ४८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१
दिनांक १३ सप्टेंबर २०२१
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१.
क्रमांक झेडपीबी. २०२० /प्र.क्र.०२/पं.रां.५. ज्याअर्थी , महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ (१९ ६५ चा महा.४० ) याच्या कलम ३ चे पोट-कलम ( २ ) , ( २ क) व ( ३ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगर विकास विभाग क्र. एमयुएन. २०१९/प्र.क्र.२१५/ नवि १८ , दिनांक ३ ऑगस्ट २०२१ ( यात यापुढे जिचा " उक्त अधिसूचना" असा निर्देश करण्यात आला आहे . ) अन्वये महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व माळेवाडी महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट- कलम( २ ) , ( २ क) व ( ३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अकलूज नगरपरिषद या नावाने नगरपरिषद गठित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा पाच ) याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता , हक्क आणि दायित्वे ( त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे ;
त्याअर्थी , आता, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे , असा निदेश देते की, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज
(१)
भाग एक - अ ( म.उ.वि. )- ४८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , सप्टेंबर १३, २०२१/ भाद्र २२, शके १ ९ ४३ व माळेवाडी महसुली गावासंबधात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता , हक्क आणि दायित्वे ( तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायीत्वे धरून) ही , शासन निर्णय , ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच . १ ९९ ७ / सीआर-६४५/ ५६(४७) दिनांक २० जुलै १ ९९९ या मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर अकलूज नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीकांत लोंढे, शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप-विभाग , सप्टेंबर १३ , २०२१/ भाद्र २२ , शके १ ९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001
Dated 13th September 2021
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACт , 1961 .
No. ZPB . 2020/ CR- 02/PR 5.- Whereas , the Government of Maharashtra , under the Notification , Urban Development Department, No. MUN- 2019/C.R.215/UD - 18 , dated 3rd August 2021 ( hereinafter referred to as " The said Notification " ) issued in exercise of the powers conferred by sub - sections (2), (2A) and ( 3) of Section 3 of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) has specified the local area of revenue village of Akluj and Malewadi in Solapur district to be a transitional area , for which a Muncipal Council as provided in sub - sections ( 2) , (2A ) and ( 3) of Section 3 of the said Act , by the name of the Akluj Muncipal Council , is constituted ;
And whereas , pursuant to the said notification , it is expedient to issue an order for transfer of assets , rights and liabilities of the existing local authority ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it ) to the successor local authority under clause ( vi) of sub- section ( 2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( vi ) of sub- section (2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah V of 1962 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets , rights and liabilities of the Solapur Zilla Parishad , ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it ) in respect of the revenue village Akluj and Malewadi in Solapur District shall stands transferred to and shall vest in the Akluj Muncipal Council on the terms and conditions specified in the Government Resolution , Rural Development and Water Conservation Department , No. MPH - 1997/CR- 645 /56 ( 47 ) , dated the 20th July 1999 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHRIKANT LONDHE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .