RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार, सप्टेंबर १६ , २०२१ / भाद्र २५ , शके १ ९ ४३ [ पृष्ठे ७ , किंमत: रुपये ११.०० वर्ष ७ , अंक ४४]
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी , पालघर उप विभाग पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक पीडी/ भू.सं. /हायस्पीड रेल/ अधिसूचना/कावि-६०० / २०२१. भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत , करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) यामधील कलम ३ चा खंड (इ ) च्याद्वारे परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११ / २०१४ /प्र.क्र.७७ / अ-२ , दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे. ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाचा कलम ३ खंड (झेड ए ) मध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा अधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास या सोबत जोडलेल्या अनूसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) . सार्वजनिक प्रयोजनासाठी ( यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे ) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते . ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे अणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( १ ) च्या तरतुदी अन्वये याद्वारे असे अधिसूचीत करण्यात येते की उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी , प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तिचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे , यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे ;
आणि ज्याअर्थी , कलम ४३ च्या पोट-कलम ( १ ) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे .
(१)
भाग एक ( को.वि.पु. )-५६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६, २०२१ /भाद्र २५ , शके १ ९ ४३ त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोट- कलम ४ अ नुसार कार्यवाही पूर्ण होईल . त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.
परंतु , उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु , आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षर्तीची जिल्हाधिकाऱ्याकडून भरपाई दिली जाणार नाही .
तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- नियम ( ५ ) नुसार जिल्हाधिकारी भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम १४ (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे. ) यांच्या नियम १० च्या उप नियम ( ३ ) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमीअभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे .
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चा खंड ( छ ) अन्वये , समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमाखालील , जिल्हाधिकाऱ्याची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी पालघर उप विभाग पालघर यांस पदनिर्देशित केले आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६ , २०२१ / भाद्र २५, शके १ ९ ४३
अनुसूची-एक
अ.क्र. गावाचे नाव
अंदाजित क्षेत्र हे . आर मध्ये (खाजगी)
भूमापन किंवा गट क्र .
१
कमारे
१६५
०.०१.३९
१६४
०.११.४५
१६२ (वनखाते )
०.०४.७२
०.१४.८६
१५९
०.०५.४५
१७२ (गुरुचरण)
१५४
०.०९.५९
१५३
०.०७.०१
१५१
०.०१.०१
१४९
१४८
०.१८.९ ४
१४६
०.१२.६३
१४५
१३९
०.०२.८२
१४०
०.२५.१३
११७ (वनखाते)
०.४०.१५
०.०४.०६
११७/५८ व ११७/६२
१.२९ .५५
१२० (वनखाते)
भाग एक (को.वि.पु. )- ५६-१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६, २०२१ /भाद्र २५ , शके १ ९ ४३
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाचे विवरण
मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प
प्रकल्पाचे नाव
प्रकल्पाचे वर्णन
मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये ४.३० कि.मी. व गुजरात मध्ये ३४८.०४ कि.मी. आहे.
मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वेप्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे , व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .
समाजाला मिळणारे लाभ
स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील .
तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ , सुरक्षित आणि जलद प्रवास , भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६ , २०२१ / भाद्र २५, शके १ ९ ४३
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
(१ ) प्रकल्पाचे बांधकाम
(२ ) प्रकल्पाचे परिचालन
(३ ) प्रकल्पाची देखभाल
या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६, २०२१ /भाद्र २५ , शके १ ९ ४३
अनुसूची-चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश ) शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांनी त्यांचे अधिसूचना क्र. संकीर्ण-०१ / २०१५ प्र.क्र .३ /अ-२ , दिनांक १३ मार्च २०१५ द्वारे भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३० ) या मध्ये कलम १० समाविष्ट केले असून, त्यामध्ये अशी तरतूदी केली आहे की , समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते . त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १२ ९ , दिनांक ३० मे २०१ ९ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६ , २०२१ / भाद्र २५, शके १ ९ ४३
अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अ
उप जिल्हाधिकारी पुनर्वसन पालघर
प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम .
प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता
ब
उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) जिल्हाधिकारी कार्यालय , रुम नं . ११४ , पहिला मजला , कोळगांव , बोईसर रोड, पालघर , तालुका व जिल्हा पालघर , पिन कोड ४०१ ४०४ .
क ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब वर्ष ५ , अंक ९ २ ( २ ) गुरुवार , जुलै ११ , २०१ ९ / आषाढ २० , शके १ ९ ४१ , महसूल व वनविभाग , अधिसूचना दिनांक ९ जुलै २०१ ९ अन्वये उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) , जिल्हाधिकारी कार्यालय पालघर , यांची प्रशासक , पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे .
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यक्यता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे ११ चे उप कलम ( १ ) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उप विभागीय अधिकारी , भूसंपादन अधिकारी , पालघर यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविणेत येईल.
धनाजी तोरस्कर ,
पालघर ,
दिनांक १५ सप्टेंबर २०२१ .
उप विभागीय अधिकारी , पालघर उप विभाग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.