Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असा क्र. 20, दिनांक 23 सप्टेंबर 2021, ग्राम विकास विभाग, सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3. सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3.--महाराष्ट्र ग्रामपंचाय अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 आणखी सुधारणा करण्याबाबत अध्यादेश.

Published 23 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35530

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ७ , अंक ११ ]

गुरुवार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ६ , किंमत: रुपये २३.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-६ सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ३. - महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ग्राम विकास विभाग

बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट, मुंबई ४०० ००१ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१ .

MAHARASHTRA ORDINANCE No. III OF 2021 .

AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT AND THE MAHARASHTRA ZILLA PARISHADAS AND PANCHAYAT SAMITIS ACT , 1961 .

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ३ .

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९६१ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

(१)

भाग चार- २०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र १ ९ ५ ९ चा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महा . ३ . तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली १९ ६२ चा महा . ५ .

आहे ;

त्याअर्थी आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत: -

प्रकरण एक

प्रारंभिक

संक्षिप्त नाव व १. ( १ ) या अध्यादेशास , महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( सुधारणा ) प्रारंभ . अध्यादेश , २०२१, असे म्हणावे.

(२) तो , तात्काळ अंमलात येईल .

प्रकरण दोन

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याची सुधारणा

२. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " ग्रामपंचायत अधिनियम " असा केलेला १ ९ ५ ९ चा आहे ) याच्या कलम १० मध्ये , पोट- कलम ( २ ) मधील, खंड ( क ) ऐवजी , पुढील खंड दाखल करण्यात येईल: - ३.

अधिनियम क्रमांक सन १ ९ ५९ चा ३ याच्या कलम १० ची सुधारणा .

" (क) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाच्या जागा , पंचायतीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण , पंचायतीमधील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही आणि अशा जागा , पंचायतीमधील वेगवेगळ्या प्रभागांना आळीपाळीने नेमून देण्यात येतील :

परंतु , संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असणा - या पंचायतीमध्ये, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती यांच्याकरिता जागा राखून ठेवल्यानंतर, उर्वरित जागा , कोणत्याही असल्यास, नागरिकांच्या मागास वर्गाच्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात येतील :

परंतु आणखी असे की , केवळ अंशतः अनुसूचित क्षेत्रांमध्ये येणा-या पंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास वर्गातील व्यक्तींसाठी असणारे आरक्षण , या खंडाच्या तरतुदींनुसार असेल :

परंतु तसेच , अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक- द्वितीयांश जागा , नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील ; " .

सन १ ९ ५ ९ चा

अधिनियम क्रमांक

३. ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० मध्ये, पोट -कलम ( ४ ) मधील, खंड ( ब) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल : -

३ याच्या

कलम ३० ची सुधारणा.

" (ब ) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाची सरपंचांची पदे , पंचायतींमधील अशा पदांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण , संबंधित जिल्ह्यातील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही :

परंतु , अशा प्रकारे राखून ठेवलेल्या पदांच्या एक -द्वितीयांश पदे , नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील ; " .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३

प्रकरण तीन

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ याची सुधारणा

१९ ६२ चा

४. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १९ ६१ ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " जिल्हा सन १ ९ ६२ चा महा . ५. परिषद व पंचायत समिती अधिनियम " असा केलेला आहे ) याच्या कलम १२ मध्ये, पोट- कलम ( २ ) मधील , महाराष्ट्र

अधिनियम क्रमांक खंड ( क ) ऐवजी , पुढील खंड दाखल करण्यात येईल : -

५ याच्या कलम

१२ ची सुधारणा.

" (क) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाच्या जागा , जिल्हा परिषदेमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण, जिल्हा परिषदेमधील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही आणि अशा जागा , जिल्हा परिषदेमधील वेगवेगळ्या निर्वाचक गटांना आळीपाळीने नेमून देण्यात येतील :

परंतु , संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असणा- या जिल्हा परिषदेमध्ये, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती यांच्याकरिता जागा राखून ठेवल्यानंतर , उर्वरित जागा, कोणत्याही असल्यास, नागरिकांच्या मागास वर्गाच्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात येतील :

परंतु, आणखी असे की, केवळ अंशतः अनुसूचित क्षेत्रांमध्ये येणा- या जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांच्या मागास वर्गातील व्यक्तींसाठी असणारे आरक्षण, या खंडाच्या तरतुदींनुसार असेल :

परंतु तसेच , अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक-द्वितीयांश जागा , नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील ; " .

सन १ ९६२ चा महाराष्ट्र ५. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम याच्या कलम ४२ मध्ये, पोट-कलम (४ ) मधील, खंड ( ब ) ऐवजी , पुढील खंड दाखल करण्यात येईल : -

अधिनियम क्रमांक

५ याच्या कलम

४२ ची सुधारणा.

" (ब) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाची अध्यक्षांची पदे , जिल्हा परिषदांमधील अशा पदांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण , राज्यातील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही:

परंतु, अशा प्रकारे राखून ठेवलेल्या पदांच्या संख्येच्या एक- द्वितीयांश पदे , नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील ; " .

महाराष्ट्र ६. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम ५८ मध्ये, पोट- कलम ( १ब ) मधील , खंड सन १ ९ ६२ चा (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल : -

अधिनियम क्रमांक

५ याच्या कलम ५८ ची सुधारणा.

(क) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाच्या जागा, पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण , पंचायत समितीतील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही आणि अशा जागा , पंचायत समितीमधील वेगवेगळ्या निर्वाचक गणांना आळीपाळीने नेमून देण्यात येतील :

परंतु , संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असणा- या पंचायत समितीमध्ये , अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती यांच्याकरिता जागा राखून ठेवल्यानंतर , उर्वरित जागा , कोणत्याही असल्यास , नागरिकांच्या मागास वर्गाच्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात येतील :

परंतु आणखी असे की , केवळ अंशतः अनुसूचित क्षेत्रामध्ये येणा- या पंचायत समितीमध्ये नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी असणारे आरक्षण, या खंडाच्या तरतुदींनुसार असेल :

परंतु तसेच, अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक- द्वितीयांश जागा , नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील. " .

भाग चार- २०-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १, शके १ ९ ४३

सन १ ९ ६२ चा

७. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम याच्या कलम ६७ मध्ये, पोट-कलम ( ५ ) मधील, खंड महाराष्ट्र (ब) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल : –

अधिनियम क्रमांक

५ याच्या कलम ६७ ची सुधारणा.

" ( ब) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवावयाची सभापतीची पदे, पंचायत समितीमधील अशा पदांच्या एकूण संख्येच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील आणि एकूण आरक्षण , राज्यातील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही:

परंतु, अशा प्रकारे राखून ठेवलेल्या पदांच्या एक-द्वितीयांश पदे, नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील . " .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३

निवेदन

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम , ( १ ९ ५ ९ चा ३ ) याचे कलम १० ( २ ) ( क) व कलम ३० ( ४ ) ( ब) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९६१ ( १९ ६२ चा महा . ५ ) याचे कलम १२ ( २ ) (क) , कलम ४२ (४ ) ( ब) , कलम ५८ ( १ब) (क) व कलम ६७ (५) (ब) यांमध्ये, अनुक्रमे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती यांमध्ये नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी जागा राखून ठेवण्यासाठी तरतूद आहे . उक्त अधिनियमांमध्ये, ग्रामपंचायती व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये नागरिकांच्या मागास वर्गासाठी निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या २७ टक्के इतक्या आरक्षणाची तरतूद आहे .

२. राज्य निवडणूक आयोगाने, अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग यांमधील व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यासाठी दिनांक २७ जुलै , २०१८ व दिनांक १४ फेब्रुवारी , २०२० रोजीच्या अधिसूचना व इतर अधिसूचना काढल्या होत्या , आणि त्यानुसार , राज्य निवडणूक आयोगाने , जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतलेल्या आहेत .

३. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ याच्या कलम १२ ( २ ) (क ) याच्या तरतुदी आणि राज्य निवडणूक आयोगाने , वाशिम , अकोला , नागपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांच्याबाबतीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची तरतूद करणा -या, दिनांक २७ जुलै , २०१८ व दिनांक १४ फेब्रुवारी , २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनांविरोधात विकास किसनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर [रिट याचिका (दिवाणी) क्रमांक २०१ ९ ची ९ ८० ] यामध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते .

सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्या दिनांक ४ मार्च , २०२१ च्या आदेशान्वये , उक्त अधिसूचना, अवैध व कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वात नसणा- या, इतर मागास वर्गाच्या जागांच्या आरक्षणासाठी तरतूद करतात त्या मर्यादेपर्यंत , त्या अधिसूचना रद्दबातल केल्या आहेत आणि या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जागा , त्याबाबतीत अधिसूचना काढून, संबंधित स्थानिक संस्थेच्या उर्वरित मुदतीसाठी सर्वसाधारण / खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांमधून राज्य निवडणूक आयोगाकडून तात्काळ भराव्यात असा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने असाही निर्णय दिला आहे की , संबंधित स्थानिक संस्थामधील इतर मागास वर्गाच्या बाबतीतील आरक्षण , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास वर्ग यांच्यासाठी एकत्रितपणे राखून ठेवलेल्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या मर्यादेपर्यंत अधिसूचित करता येऊ शकेल .

४. उक्त न्यायनिर्णयाच्या परिच्छेद १२ मध्ये , सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, इतर मागास वर्गासाठी स्थानिक संस्थांमध्ये जागा राखून ठेवण्यापूर्वी राज्याने , पुढीलप्रमाणे तिहेरी चाचणीचे / शर्तीचे अनुपालन करण्याची आवश्यकता आहे: - ( १ ) राज्यामधील स्थानिक संस्थांनिहाय मागासलेपणाचे स्वरूप व परिणाम यांची समकालीन सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करणे, ( २ ) आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन, स्थानिक संस्थानिहाय तरतूद करण्याची आवश्यकता असलेल्या आरक्षणाचे प्रमाण विनिर्दिष्ट करणे , जेणेकरून , मोठ्या प्रमाणात चूक होणार नाही ; आणि ( ३ ) कोणत्याही परिस्थितीत , असे आरक्षण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास वर्ग यांच्यासाठी एकत्रितपणे राखून ठेवलेल्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

उक्त न्यायनिर्णयानुसार , शासनाने, उक्त काम , महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा महा . ३४ ) अन्वये घटित केलेल्या महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाकडे सोपवलेले आहे . आयोगाला , उक्त प्रयोजनासाठी समकालीन सखोल चौकशी करण्याकरिता वाजवी वेळ लागेल.

५. उक्त न्यायनिर्णयामधील परिच्छेद २८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की , १९ ६१ च्या अधिनियमाच्या कलम १२ ( २ ) (क) च्या वैधतेला दिलेले आव्हान निरर्थक ठरले आहे . त्याऐवजी, ती तरतूद या अर्थाने वाचण्यात यावी की , संबंधित स्थानिक संस्थांमधील इतर मागास वर्गाच्या बाबतीतील आरक्षण , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास वर्ग यांच्यासाठी एकत्रितपणे राखून ठेवलेल्या एकूण जागांच्या ५० ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३

टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही इतक्या मर्यादेपर्यंत अधिसूचित करता येतील. दुस- या शब्दांत सांगायचे झाले तर , या न्यायालयाच्या घटनापीठाने प्रतिपादन केल्याप्रमाणे, कलम १२ ( २ ) ( क) मध्ये येणा - या २७ टक्क्यांइतक्या " असतील " या संज्ञेचा अन्वयार्थ , " असू शकतील " असा लावण्यात येईल आणि त्यात, एकत्रितपणे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास वर्ग यांच्या एकूण ५० टक्क्यांच्या बाह्यमर्यादेस अधीन राहून , इतर मागास वर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंत असू शकेल अशा अर्थाचा अंतर्भाव असेल.

६. उक्त न्यायनिर्णय लक्षात घेता, इतर मागास वर्गास स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण राहिलेले नाही . स्थानिक संस्थांमध्ये , इतर मागास वर्गांना प्रतिनिधित्व देण्याकरिता , शासनाने , दरम्यानचा उपाय म्हणून , ग्राम पंचायतींमध्ये, पंचायत समित्यांमध्ये व जिल्हा परिषदांमध्ये नागरिकांच्या मागास वर्गांच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी जागांच्या २७ टक्क्यांपर्यंत आरक्षणाची तरतूद करण्याचे , आणि एकूण आरक्षण , स्थानिक संस्थांमधील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद करण्याचे ठरविलेले आहे. म्हणून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १० ( २ ) (क) व कलम ३० ( ४ ) ( ब) यांमध्ये आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ याच्या कलम १२ ( २) ( क) , कलम ४२ (४) ( ब) , कलम ५८ ( १ ब) (क) व कलम ६७ ( ५) (ब) यांमध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

७. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; आणि म्हणून , हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे .

भगत सिंह कोश्यारी ,

मुंबई ,

दिनांक २३ सप्टेंबर २०२१ .

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेश कुमार,

शासनाचे अपर मुख्य सचिव .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.