RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार, सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ४५ ]
[ पृष्ठे ७ , किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी कार्यालय , पालघर यांजकडून
प्राथमिक अधिसूचना
क्रमांक भूसंपादन / हायस्पीड रेल / अधिसूचना / कावि -३७२ / २०२१.- ज्याअर्थी , भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) याच्या कलम ३ च्या खंड ( इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११ / २०१४ /प्र.क्र.७७ / अ-२ , दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे . ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ए ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सक्षम प्राधिकारीस यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन ( यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे. ) सार्वजनिक प्रयोजनासाठी ( यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( १ ) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की , उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे , या सोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी , सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे ;
आणि ज्याअर्थी , कलम ४३ च्या पोट - कलम ( १ ) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे .
त्याअर्थी आता , असे घोषित करण्यात येत आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ४ अ नुसार कोणतीही व्यक्ती , ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :
(१)
भाग एक ( को.वि.पु. )- ५७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३, २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३ परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर , सक्षम प्राधिकारीस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उपरोक्त मालकास तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :
परंत, आणखी असे की , जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची सक्षम प्राधिकारीकडून भरपाई दिली जाणार नाही .
तसेच , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट - कलम ( ५ ) अनुसार सक्षम प्राधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ ( यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे. ) यांच्या नियम १० च्या उपनियम ( ३ ) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे .
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड ( छ ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी यांनी उक्त अधिनियमाखालील , जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी वसई, डहाणू व तलासरी तालुक्याकरिता उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) पालघर, जिल्हा पालघर यांस पदनिर्देशित केले आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३
अनुसूची- एक
जमिनीचे वर्णन
गावाचे नाव - वरवाडा, तालुका तलासरी , जिल्हा - पालघर
अ.क्र .
अंदाजित क्षेत्र ( हे . आर) मध्ये
भूमापन किंवा गट क्रमांक
२
३
१
१
०.५२.१९
१८४/२ पैकी
२
०.३३.६७
१३४
१३६
०.०४.३९
३
४
१८३/१ पैकी
१.४१.६३
५
०.३२.९४
१८३ / ३ /ब
६
२२६
०.४८.०३
७
२१६
०.००.३६
८
०.३१.००
१०५/१
९
०.०४.३५
१०५/२
१०
०.०१.३४
१०५/३
११
१७७/७
०.२४.०३
१२
१७७/९
०.१३.८५
१३
०.८६.९७
१७७/१०
१४
१०६/१
०.२३.३२
४.९ ८.०७
एकूण
भाग एक (को.वि.पु. )-५७-१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३, २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३
अनुसूची २
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण
प्रकल्पाचे नाव मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प गाव - वरवाडा, ता. तलासरी, जि. पालघर
मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प
प्रकल्पाचे वर्णन
रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांनी भारतीय रेल्वे योजना , २०२० तयार केली आहे आणि त्या योजनेचा दस्तऐवज डिसेंबर , २०० ९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे . सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने कार्यान्वीत करावयाचा आहे . प्रकल्पाची एकूण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून त्यापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वे मार्ग महाराष्ट्र राज्यामधून (बोगद्यातून २७ कि.मी. व १२८.६४२ उन्नत मार्ग ) जातो . महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्थानके ( बांद्रा कुर्ला संकुल, ठाणे , विरार व बोईसर ) नियोजित केले आहेत . रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२० कि.मी. इतका असेल .
मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे , त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील .
समाजाला मिळणारे लाभ
तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास , भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास , मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत .
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३ ५
अनुसूची तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
(१ ) प्रकल्पाचे बांधकाम
(२ ) प्रकल्पाचे परिचालन
(३ ) प्रकल्पाच्या देखभालीखाली
या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३, २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३
अनुसूची- चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश ) शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई ३२ यांनी त्यांचे अधिसूचना क्र . संकिर्ण -०१ / २०१५ प्र.क्र. ३ / अ-२ , दिनांक १३ मार्च २०१५ द्वारे भूमीसंपादन , पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ ( २०१३ चा ३० ) यामध्ये कलम १० क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे , उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र. १२ ९ दिनांक ३० मे २०१ ९ नुसार जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणे प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २३ , २०२१ / आश्विन १ , शके १ ९ ४३
अनुसूची-पाच
अ
उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) पालघर
प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम.
प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता
ब
मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर , कोळगाव, ता. पालघर, जि. पालघर
क ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार -ब, वर्ष ५ , अंक ९ २ ( २ ) गुरुवार, जुलै ११ , २०१ ९ / आषाढ २० , शके १ ९ ४१ , महसूल व वन विभाग, अधिसूचना दिनांक ० ९ जुलै २०१ ९ अन्वये उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) , जिल्हाधिकारी कार्यालय , पालघर यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे .
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कलम ११ चे उप कलम ( १ ) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे . प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी तथा उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) , पालघर यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल .
पालघर,
दिनांक २२ सप्टेंबर २०२१ .
संदीप पवार , सक्षम प्राधिकारी मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प तथा उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) , पालघर
CHARNI ROAD ,
PUBLICATIONS , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .