Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार असा. क्र. 21 (30-09-2021) नगर विकास विभाग, सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश

Published 30 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35530

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

गुरुवार , सप्टेंबर ३० , २०२१/ आश्विन ८ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १२]

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २१ प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे

१-३ सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४. - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश ..

नगर विकास विभाग

मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० सप्टेंबर २०२१ .

MAHARASHTRA ORDINANCE No. IV OF 2021 .

AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT .

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४ .

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

(१)

भाग चार- २१-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , सप्टेंबर ३०, २०२१/ आश्विन ८ , शके १ ९ ४३

आणि ज्याअर्थी , यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी १ ९ ४ ९ चा सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती ५ ९ .

अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत : -

संक्षिप्त नाव व १. (१ ) या अध्यादेशास , महाराष्ट्र महानगरपालिका ( सुधारणा ) अध्यादेश , २०२१ , असे म्हणावे .

प्रारंभ.

(२ ) तो, तात्काळ अंमलात येईल .

२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्या कलम ५ मध्ये , पोट- कलम ( ३ ) मधील पहिल्या परंतुकाऐवजी , १ ९ ४ ९ चा ५९.

पुढील परंतुक दाखल करण्यात येईल : -

सन १ ९ ४ ९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.

" परंतु , महाराष्ट्र महानगरपालिका ( सुधारणा) अध्यादेश , २०२१ याच्या प्रारंभानंतर , महानगरपालिकांच्या २०२१ चा

अध्या . ४ सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य , परंतु महा. दोनपेक्षा कमी नाहीत व चारपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील , आणि या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, प्रत्येक मतदाराला, त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल : " .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ३० , २०२१ / आश्विन ८ , शके १ ९ ४३

निवेदन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( १ ९ ४ ९ चा ५ ९ ) याच्या विद्यमान तरतुदींनुसार, महानगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागातून फक्त एक पालिका सदस्य निवडून देण्यात येतो . राज्यातील महानगरपालिकांच्या क्षेत्रातील कोविड-१ ९ साथरोगामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक संकटाला तोंड देत असताना , महानगरपालिकांमध्ये बहु- सदस्यीय प्रभाग पद्धती असणे आवश्यक आहे असे वाटते. अशा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि महानगरपालिकांचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने , राज्य शासनास उक्त अधिनियमाच्या तरतुदींमध्ये यथोचितरित्या सुधारणा करणे इष्ट वाटते.

२. महानगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु दोन पालिका सदस्यांपेक्षा कमी नाहीत व चार पालिका सदस्यांपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे . त्या प्रयोजनाकरिता , उक्त अधिनियमाच्या कलम ५ मध्ये यथोचितरित्या सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( १ ९ ४ ९ चा ५ ९ ) यात आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून , हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

भगत सिंह कोश्यारी,

मुंबई,

महाराष्ट्राचे राज्यपाल .

दिनांक ३० सप्टेंबर २०२१ .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

महेश पाठक,

शासनाचे प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.