Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ असाधारण १६६, शुक्रवार, ऑक्टोबर १, २०२१, गृह विभाग, अधिसूचना,फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३. क्रमांक पीआरओ.०९२१/प्र.क्र.२८३/विशा-२

Published 01 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

शुक्रवार , ऑक्टोबर १ , २०२१/ आश्विन ९, शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ९० (२ ) ]

[पृष्ठे ५, किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक १६५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर, २०२१

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक सेप्रनि-२४१४ /प्र.क.७८ /उद्योग-३ .- भारताचे संविधान यांच्या अनुच्छेद ३० ९ च्या पंरतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम , आदेश व संलेख यांचे अधिक्रमण करुन , महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे , महाराष्ट्र शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग निरिक्षक, गट-क या पदाच्या सेवाप्रवेश नियमांचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहे :-

१. या नियमांना, उद्योग संचालनालयातील उद्योग निरिक्षक, गट- क सेवाप्रवेश नियम , २०२१ असे म्हणावे.

२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -

(क) " आयोग" याचा अर्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोग , असा आहे;

(ख ) "पदवी" याचा अर्थ सांविधिक विद्यापीठाची पदवी, असा आहे ;

(ग) "संचालनालय" याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेले उद्योग संचालनालय , असा आहे ;

(घ) "शासन" याचा अर्थ महाराष्ट्र शासन, असा आहे.

३. संचालनालयातील उद्योग निरिक्षक, गट-क या पदावरील नियुक्ती एकतर : -

(क) संचालनालयातील टिप्पणी सहाय्यक अथवा वरीष्ठ लिपिक (सांख्यिकी) हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या तसेच उद्योग निरिक्षक, गट-क पदाकरिता विकल्प दिलेल्या आणि ज्यांनी पर्यवेक्षी पदांवरील पदोन्नतीकरिता संचालनालयाकडून घेण्यात येणारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण

(१)

भाग चार-अ- १६५-१ .

२

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १ , २०२१/ आश्विन ९ , शके १ ९ ४३

केली आहे किंवा ज्यांना उक्त विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट मिळाली असेल , अशा व्यक्तींमधून सेवाज्येष्ठतेच्या आधारे , पात्र व्यक्तीला पदोन्नती देऊन करण्यात येईल; किंवा

(ख ) आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे , –

(एक) खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या व अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या आणि मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या; आणि

(दोन) ज्यांनी खालीलपैकी अर्हता धारण केली आहे : -

( 1) सांविधिक विद्यापीठाची , अभियांत्रिकीमधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(ii) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

४. नियम ३ येथे नमूद पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने करावयाची नियुक्ती ही २५:७५ या प्रमाणात करण्यात येईल;

परंतू, जर नमूद पदावर विहित अर्हता प्राप्त व्यक्ती पदोन्नतीने नियुक्तीकरिता उपलब्ध नसल्यास, आयोगाशी विचारविनिमय करुन पदोन्नती व नामनिर्देशन याद्वारे करावयाच्या नियुक्तीकरिता विहित करण्यात आलेले प्रमाण शिथिल करुन ते पद नामनिर्देशनाद्वारे भरता येईल .

५. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने यासंबंधात तयार करण्यात आलेल्या नियमानुसार सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील .

६. हिंदी- मराठी भाषा परीक्षा: -

(क) नियम ३ येथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने , पदोन्नतीपूर्वी हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील. अन्यथा वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही .

(ख) नियम ३ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार , हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील तर, हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील , अन्यथा सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही .

७. संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र:-

(क) नियम ३ येथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने , पदोन्नतीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील. अन्यथा वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही.

(ख ) नियम ३ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार , नियुक्तीपुर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास, याबाबतच्या नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ , ऑक्टोबर १ , २०२१/ आश्विन ९ , शके १ ९ ४३

८. (क) नियम ३ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने नियुक्तीच्या वेळी , महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम , २००५ मधील तरतुदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमांनुसार लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील.

(ख) लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर करताना त्यामध्ये दोन पेक्षा अधिक अपत्ये नियुक्तीच्या वेळेस हयात असल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील.

(ग) शासकीय सेवेत नियुक्तीनंतर संबंधित उमेदवारास भविष्यात दोन पेक्षा अधिक हयात मुले असल्याचे सिध्द झाल्यास तो उमेदवार संबंधित पदासाठी अनर्ह ठरेल.

९. सदर पदावर नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

रविंद्र गुरव ,

शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ - १६५-२ .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०२१/ आश्विन ९, शके १ ९ ४३

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 .

Dated the 1st October , 2021 .

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA .

No. SRR- 2414/C.R.78 /Ind - 3 . In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules , orders or instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of the Industries Inspector, Group-C in the Directorate of Industries under the Industries , Energy and Labour Department of the Government of Maharashtra , namely :-

1. These rules may be called the Industries Inspector , Group -C in the Directorate of Industries (Recruitment) Rules , 2021 .

2. In these rules , unless the context requires otherwise , -

(a) " Commission " means the Maharashtra Public Service Commission ;

(b) "Degree" means a degree of a statutory University ;

(c) "Directorate " means the Directorate of Industries under the Industries , Energy and Labour Department of the Government of Maharashtra ;

(d) "Government " means the Government of Maharashtra .

3. Appointment to the post of Industries Inspector, Group-C in the Directorate shall be made either,-

(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness , from amongst the persons holding the post of Noting Assistant or Senior Clerk (Statistics ) in the Directorate having not less than three years regular service on that post and have opted for the post of Industry Inspector, Group- C and have passed the Departmental Examination for promotion to supervisory posts in the Directorate conducted by the Directorate or have been exempted from passing the said Examination ; or

(b) by nomination on the basis of result of a competitive examination held by the Commission from amongst the candidates who , -

(i) are not less than nineteen years of age and are not more than thirty- eight years of age in case of the candidates not belonging to reserved categories and not more than forty three years in case of the candidates belonging to the reserved categories ; and (ii) possess diploma in Engineering ( other than in Civil Engineering , Architecture , Town Planning or any other subject linked with Civil Engineering group of subjects) or Technology; or

(iii) possess a Degree in Science .

4. Appointment to the post mentioned in rule 3 shall be made by promotion and nomination, in the ratio of 25:75 , respectively:

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १ , २०२१ / आश्विन ९ , शके १ ९ ४३

Provided that , if suitable candidates possessing the prescribed qualifications for the appointment by promotion are not available , the post may be filled by nomination by relaxing the ratio prescribed for appointment by promotion in consultation with the Commission .

5. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be required to pass the Post Recruitment Training Examination according to the rules made in that behalf unless he has been exempted from passing that examination .

6. ( 1) A person appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government , from time to time , unless he has already passed or has been exempted from passing those examinations before getting promoted to the next promotional post .

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government , from time to time , within prescribed time limit after appointment unless he has already passed or has been exempted from passing those examinations . He shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he passes those examinations .

7. (1) A person appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess a certificate in knowledge of Computer Operations prescribed by the Government , from time to time , unless he has been exempted therefrom before getting promoted to the next promotional post .

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a certificate in knowledge of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within prescribed time limit after appointment , unless he has been exempted from possessing such certificate in knowledge of Computer Operations , otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he possess such certificate .

8. ( 1) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services ( Small Family Declaration) Rules , 2005 or any other rules , orders or any instruments issued in this behalf, by the Government, from time to time , otherwise he shall not be eligible for appointment to the post .

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small Family, shall be disqualified for the appointment in Government Service .

(3) After appointment of a person in the Government service , if it is proved that he has more than two children , then he shall be disqualified for the said post in Government service .

9. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

RAVINDRA GURAV, Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.