RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
शुक्रवार , ऑक्टोबर १ , २०२१ / आश्विन ९ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक १३ ]
[पृष्ठे ३ , किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५. - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५
१-३ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश .
नगरविकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ऑक्टोबर २०२१ .
MAHARASHTRA ORDINANCE No. V OF 2021 .
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ .
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ यामध्ये आणखी
सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
(१)
भाग चार- २२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , ऑक्टोबर १ , २०२१ / आश्विन ९ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक १ ९ ६५ चा नगरी अधिनियम , १ ९ ६५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही महा. ४० .
करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत : -
संक्षिप्त नाव व १. ( १ ) या अध्यादेशास, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा ) अध्यादेश, प्रारंभ.
२०२१ , असे म्हणावे .
( २ ) तो, तात्काळ अंमलात येईल.
सन १ ९ ६५ चा
२. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ याच्या कलम १० मधील १ ९ ६५ चा
महा . ४० .
महाराष्ट्र पोट- कलम ( २ ) मधील परंतुकाऐवजी , पुढील परंतुक दाखल करण्यात येईल : -
अधिनियम क्रमांक
४० याच्या कलम
परंतु, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा ) अध्यादेश , २०२१ याच्या २०२१ चा "
१० ची सुधारणा . प्रारंभानंतर , नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत , प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर दोन महा .
अध्या. ५ .
परिषद सदस्य , परंतु तीन पेक्षा अधिक नाहीत इतके परिषद सदस्य निवडून देण्यात येतील, आणि कलम १४ च्या पोट - कलम ( २ ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी , प्रत्येक मतदाराला , त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या परिषद सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल. " .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , ऑक्टोबर १ , २०२१ / आश्विन ९, शके १ ९ ४३
निवेदन
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) याच्या विद्यमान तरतुदींनुसार , नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातून फक्त एक परिषद सदस्य निवडून देण्यात येतो . राज्यातील नगरपरिषदांच्या क्षेत्रातील कोविड-१ ९ साथरोगामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक संकटाला तोंड देत असताना, नागरी संस्थांमध्ये बहु सदस्यीय प्रभाग पद्धती असणे आवश्यक आहे असे वाटते. अशा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि नगरपरिषदांचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने , राज्य शासनास उक्त अधिनियमाच्या तरतुदींमध्ये यथोचितरित्या सुधारणा करणे इष्ट वाटते .
२. नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातून दोन परिषद सदस्य , मात्र तीन पेक्षा अधिक नाहीत इतके परिषद सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या प्रयोजनाकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १० मध्ये यथोचितरित्या सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ (१९ ६५ चा महा . ४० ) यात आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे , आणि म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
भगत सिंह कोश्यारी ,
मुंबई,
दिनांक ३० सप्टेंबर २०२१ .
महाराष्ट्राचे राज्यपाल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महेश पाठक ,
शासनाचे प्रधान सचिव.
AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY
RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .