Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. No. 38 (6th Oct. 2021) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक यूडब्ल्यूए. 2020/प्र.क्र. 11/काम-५

Published 06 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31747

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -ल

बुधवार , ऑक्टोबर ६ , २०२१ /आश्विन १४ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ३० ]

[पृष्ठे ३ , किंमत: रुपये १६.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक , चार- अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे .

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ ऑक्टोबर २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार ( नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम, १ ९ ६ ९.

क्रमांक यूडब्ल्यूए . २०२० / प्र.क्र. ११ / काम-५ . ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून अनुसूचीत उद्योगातील जसे की, माल भरणे , तो उतरविणे , रचणे , त्याची ने-आण करणे , त्याचे वजन व मापन करणे , फायलिंग , शिवणे , पृथक्करण करणे , स्वच्छ करणे किंवा अशा कामाच्या पूर्वतयारीची किंवा आनुषंगिक कामे धरून अशा प्रकारच्या इतर कामासंबंधातील किराणा बाजार किंवा दुकाने यांतील नोकरी ( यापुढे याचा निदेश " उक्त अनुसूचीत " नोकरी असा करण्यात आला आहे. ) यासाठीचे किराणा बाजार व दुकाने मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळावर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे , महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपर्यंत , पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी श्री . बाळासाहेब वसंत वाघ , कामगार उप आयुक्त यांची उक्त मंडळावर नियुक्ती करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे ;

(१)

भाग एक-ल-३८-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, ऑक्टोबर ६ , २०२१ /आश्विन १४ , शके १९ ४३

आता त्याअर्थी , महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १ ९ ६ ९ चे कलम ६ (अ) चे पोट-कलम (१ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपर्यंत , श्री . बाळासाहेब वसंत वाघ , कामगार उप आयुक्त यांची पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

दा. सो. खताळ, शासनाचे उप सचिव .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर ६ , २०२१/ आश्विन १४ , शके १९ ४३

Inpursuance of Clause ( 3) Articles 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. UWA . 2020/C.R.11/LAB- 5 , dated 6th October 2021 is hereby published under the authority of the Governor .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

D. S. KHATAL , Deputy Secretary ( Labour ) to Government .

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 6th October 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI , HAMAL AND OTHER MANUAL WORKERS ( REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) Аст , 1969 .

No. UWA . 2020/C.R.11/LAB- 5.-Whereas , it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute a Grocery Market and Shops Board for the scheduled employment viz . " Employment in Grocery Markets or Shops , in connection with loading , unloading , stacking , carrying , weighing , measuring , filling , stitching , sorting , cleaning or such other work including work preparatory or incidental to such operations " ( hereinafter referred to as " the said scheduled employment") in accordance with the provisions of section 6 of the said Act as it will take some more time to nominate members on the said Board ;

And whereas , the Government of Maharashtra has decided to appoint Shri Balasaheb Vasant Wagh , Deputy Commissioner of Labour to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Board by or under the said Act until the said Board is duly reconstituted under section 6 for the said scheduled employment ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of section 6A of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare) Act , 1969 ( Mah . XXX of 1969 ) , the Government of Maharashtra hereby appoints Shri . Balasaheb Vasant Wagh , Deputy Commissioner of Labour to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Board by or under the said Act until the said Board is duly reconstituted under section 6 of the said Act for the said scheduled employment .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

D. S. KHATAL ,

Deputy Secretary ( Labour) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.