RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
बुधवार , ऑक्टोबर ६ , २०२१/आश्विन १४ , शके १ ९ ४३
वर्ष ७, अंक १४]
[पृष्ठे ३ , किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे
१-३ सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८. - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४००० ३२ , दिनांक ६ ऑक्टोबर २०२१.
MAHARASHTRA ORDINANCE No. VIII OF 2021 .
AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT , 2016 .
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ .
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी , राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
भाग चार - २५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , ऑक्टोबर ६ , २०२१/ आश्विन १४ , शके १९ ४३
महा. ६ . आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता , महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र सार्वजनिक २०१७ चा विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत: -
१. ( १ ) या अध्यादेशास , महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ ( सुधारणा) अध्यादेश , २०२१ , असे म्हणावे .
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२ ) तो, तात्काळ अंमलात येईल .
२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ याच्या कलम १० ९ मधील ,-
२०१७ चा महा. ६ .
(१ ) पोट- कलम ( ३ ) मध्ये , खंड ( घ) मधील तिसऱ्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात सन २०१७ चा अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १० ९ ची सुधारणा. येईल : -
" परंतु आणखी असे की , उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी अर्ज करण्याचा , अधिष्ठाता मंडळाकडून अर्जाची छाननी करणे व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्याचा आणि राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक २०२१ -२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी , वाढविण्याच्या दृष्टीने , खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम ( ३ ) च्या खंड (क) , (ग) व (घ) मध्ये विनिर्दिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ ( ३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येतीलः -
खंड
विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (३)
(१)
(२)
(क)
३१ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी.
ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी.
ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला
(ग)
३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी .
प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या
३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी .
(घ) लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी २८ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी. ";
रोजी किंवा त्यापूर्वी .
(२ ) पोट- कलम (४ ) मध्ये, खंड ( क) मधील विद्यमान परंतुकाऐवजी , पुढील परंतुक दाखल करण्यात येईलः-
" परंतु , २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून , नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याकरिता परवानगी मागणाऱ्या व्यवस्थापनास , ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कुलसचिवाकडे अर्ज करता येईल. ".
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , ऑक्टोबर ६ , २०२१/ आश्विन १४ , शके १९ ४३
निवेदन
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ ( २०१७ चा महा . ६ ) याच्या कलम १० ९ मध्ये, नवीन महाविद्यालय किंवा नवीन पाठ्यक्रम , विषय, विद्याशाखा , तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याकरिता परवानगी देण्याच्या कार्यपद्धतीची तरतूद आहे . उक्त कलम १० ९ च्या पोट- कलम ( ३ ) च्या खंड ( क) मध्ये अशी तरतूद आहे की, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागणारे व्यवस्थापन, ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी कुलसचिवाकडे विहित नमुन्यात अर्ज करील . उक्त पोट- कलम ( ३ ) च्या खंड ( ग ) मध्ये अशी तरतूद आहे की, विहित केलेल्या कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अर्जाची , अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज , ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील . त्याच्या खंड ( घ) मध्ये अशी तरतूद आहे की, राज्य शासनास , विद्यापीठाच्या शिफारशीनंतर , लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी इरादा पत्र देता येईल. त्याचप्रमाणे , कलम १० ९ च्या पोट- कलम ( ४ ) च्या खंड ( क) मध्ये अशी तरतूद आहे की , नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, ज्या वर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी कुलसचिवाकडे अर्ज करील.
२. कोविड-१ ९ वैश्विक साथरोगाच्या फैलावामुळे , नवीन महाविद्यालय किंवा नवीन पाठ्यक्रम, विषय , विद्याशाखा , अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची कार्यपद्धती, विहित कालावधीत पार पाडता येऊ शकली नाही आणि याकरिता , संबंधित शैक्षणिक वर्षासाठी , नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे इष्ट आहे असे वाटते . या प्रयोजनासाठी ,-
(क) उच्च शिक्षण विषयक नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी अर्ज करण्याचा दिनांक ;
(ख) अधिष्ठाता मंडळाने अर्जाची छाननी करण्याचा आणि व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने तो राज्य शासनाकडे पाठविण्याचा दिनांक ;
(ग) राज्य शासनाने इरादा पत्र देण्याचा दिनांक ; आणि
(घ) नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय, विद्याशाखा , अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाइट केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्याचा दिनांक ,
वाटते. यांचे नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणेकरिता , उक्त कलम १० ९ मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट ३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी , महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ ( २०१७ चा महा . ६ ) यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे , आणि, म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
भगत सिंह कोश्यारी,
मुंबई,
दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ .
महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
विकास चंद्र रस्तोगी,
शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .