Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन, असाधारण राजपत्र क्रमांक 79, दिनांकित 8 ऑक्टोबर 2021 पनवेल महानगरपालिका, जाहीर प्रगटन जा.क्र. पमपा/नरवि/रस्ते/26-21/प्र.क्र. 6/2033/2021

Published 08 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/ 46121

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ७ , अंक ५२ ]

शुक्रवार , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ५ , किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७ ९

प्राधिकृत प्रकाशन

पनवेल महानगरपालिका

जाहीर प्रगटन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २०५ , २०६ व २० ९ अन्वये

जा.क्र.पमपा/नरवि/रस्ते/ २६-२१/प्र.क्र. ०६/२०३३/२०२१

दिनांक ८ ऑक्टोबर २०२१

ज्याअर्थी, अंबरनाथ - कुळगांव -बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्राची विकास योजना शासनाचे नगरविकास विभाग अधिसूचना क्र. टी पी एस-१२०४ /९ ४१/ सीआर-१६३ /०४/नवि-१२ , दिनांक २५ जुलै २००५ अन्वये शासनाने मंजूर केली आहे आणि उक्त विकास योजना दिनांक १२ ऑगस्ट २००५ पासून अंमलांत आलेली आहे (यात या पुढे ज्याचा उल्लेख "उक्त एम एम आर डी ए विकास योजना " असा करण्यात आला आहे) ;

ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम ११३ ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासनाने नगरविकास , सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण विभागाची अधिसूचना क्रमांक आरपीबी . ११७१/ १८१२४/ ११३/आय डब्ल्यू, दिनांक २० मार्च १ ९ ७१ द्वारे , यात नमूद करण्यात आलेले क्षेत्र हे नवी मुंबई ह्या नवीन नगराचे क्षेत्र म्हणून घोषित केले आहे व सिडकोस नगरविकास, सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण विभागाची अधिसूचना क्रमांक आरपीबी. १८१२४/ II डब्ल्यू, दिनांक २० मार्च १ ९ ७१ अन्वये , उक्त अधिनियमांच्या कलम ११३ ( ३ अ) नुसार नवी मुंबई या नवीन नगर क्षेत्रासाठी (उक्त नवनगरक्षेत्र) नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , शासनाने उक्त नवनगर क्षेत्रासाठी सिडकोने सादर केलेल्या रचनाबद्ध आराखड्याच्या ( Structural Plan) स्वरूपात असलेल्या प्रारूप भाग दोन-७ ९ -१ (१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६, शके १ ९ ४३

विकास योजनेस (उक्त अंतिम विकास योजना) नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचना क्रमांक आरपीबी . ११७५/६३५/यूडी -५ , दिनांक १८ ऑगस्ट १ ९ ७ ९ सह अधिसूचना क्रमांक आरपीबी. ११७५/ ६३५/यूडी-५ , दिनांक १८ जानेवारी १ ९ ८० अन्वये मंजुरी दिलेली आहे आणि उक्त विकास योजना दिनांक १ मार्च १ ९ ८० पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त महानगरपालिका अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम ३ च्या पोट- कलम ( ४ ) नुसार महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक पनप २ ९ १४ /व्ही आय फी सं.क्र. ३०१/प्र.क्र. ३५४ /नवि -२३ , दिनांक २६ सप्टेंबर २०१६ अन्वये पनवेल नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र व २ ९ महसुली गावांच्या क्षेत्रासाठी पनवेल महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली असून ती दिनांक १ ऑक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली आहे ;

आणि ज्याअर्थी , पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये उक्त एम एम आर डी ए विकास योजनेतील ११ महसुली गावांचा समावेश करणेत आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अंतिम विकास योजना व उक्त मंजूर एम एम आर डी ए विकास योजना या एकमेकांना लागून आहेत आणि मंजूर विकास योजनेतील रस्ते उक्त मंजूर तत्कालीन एम एम आर डी ए विकास योजनेतील तळोजे मजकूर या महसुली गावाच्या हद्दीपर्यंत तयार करण्यात आलेले आहे :

आणि ज्याअर्थी, उक्त अंतिम विकास योजना व उक्त मंजूर एम एम आर डी ए विकास योजनामध्ये Missing Links असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक सोयीची व दळणवळण सुकर होण्यासाठी नवीन जोड रस्ते तयार करणे गरजेचे आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २०५ , २०६ व २० ९ अन्वये महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन रस्ते तयार करणे, रस्त्याची रूंदी निश्चित करणे व रस्त्यांची सुधारणा करणेचा अधिकार महानगरपालिकेला आहे ;

आणि ज्याअर्थी , वरील संदर्भ उक्त करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव क्र. १ ९ ० , दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ अन्वये आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांना प्राधिकृत केले आहे;

त्याअर्थी , मी , गणेश देशमुख , आयुक्त, पनेवल महानगरपालिका मला प्राप्त अधिकारांन्वये खालील परिशिष्ट ' अ' मध्ये विनिर्दीष्ट केलेल्या नवीन जोड रस्त्याचे आखणी व परिशिष्ट 'ब' मध्ये नकाशात दर्शविल्या प्रमाणे रस्त्याचे संरेखांकन जाहीर करीत आहे सदर परिशिष्ट ' अ' व परिशिष्ट ' ब' च्या प्रती नागरीकांच्या पाहणी करिता सहायक संचालक, नगररचना विभाग , पनवेल महानगरपालिका यांचे कार्यालयात कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत खुला ठेवण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही नागरीकास प्रस्तावित रस्त्याचे आखणी बाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास हे जाहीर प्रकटन महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांका पासून ३० दिवसाचे आत सहायक संचालक , नगररचना विभाग , ३ रा मजला, अग्निशमन इमारत , देवाळे तलाव, पनवेल महानगरपालिका, यांचे कार्यालयात कार्यालयीन दिवशी व कार्यालयात वेळेत सादर कराव्यात. महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांकापासून ३० दिवसाचे आत प्राप्त झालेल्या सूचना किंवा हरकती यांचाच विचार केला जाईल . मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६, शके १ ९ ४३

परिशिष्ट-अ

रस्त्याचे संक्षिप्त विवरण

मौजे तळोजा मजकूर या महसुली गावाच्या स. नं. १३१ पासून ते मौजे घोट या महसुली गावाच्या स. नं. ६६ पर्यंत १५.०० मी. रुंदीचा नवीन सार्वजनिक रस्ता आखणे व तयार करणे .

वरील रस्त्याचे संरेखांकनामुळे बाधित होणारे सर्व्हे नं. /गट नं.

सर्व्हे नं/गट नं.

महसुली गावाचे नाव

अनु. क्र.

१ मौजे तळोजा मजकूर १३१ (पैकी) , १२ ९ ( पैकी) , ७८ (पैकी) , ७ ९ (पैकी) , ८० (पैकी) , १०७ (पैकी) , १०६ ( पैकी) , १०८ (पैकी)

मौजे घोट

२

५२ (पैकी) , ५३ (पैकी) , ५४(पैकी) , ६६ (पैकी)

टीप : - वरील रस्त्याची प्रत्यक्ष आखणी करतेवेळी वरील बाधित जागेव्यतीरिक्त इतर जागा बाधित होत असल्यास सदरची जागा ही प्रस्तावित रस्त्याचा भाग समजण्यात येईल .

परिशिष्ट – ब

प्रस्तावित रस्त्याचे संरेखांकन दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या पाहणी करिता सहायक संचालक , नगररचना विभाग , पनवेल महानगरपालिका यांचे कार्यालयात खुला ठेवण्यात आलेला आहे.

गणेश देशमुख, पनवेल,

दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ .

आयुक्त, पनवेल महानगरपालिका .

भाग दोन-७९ -२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६, शके १ ९ ४३

PANVEL MUNICIPAL CORPORATION

Public Notice

Maharashtra Municipal Corporation Act , 1949 Section 205 , 206 and 209 No. PMC / TPD /ROADS /26-21/ S . No. 06/2033/2021

Dated the 8th October 2021 .

Whereas the Ambarnath - Kulgaon - Badlapur and surrounding Notified area Development Plan has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS - 1204/ 941/ CR - 1630/UD -12 , dated the 25th July 2005 and it has came into force with effect from 12th August 2005 (hereinafter referred as the " said MMRDA Development plan ") ;

And Whereas , the Goverment , in exercise of the powers conferred by section 113 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (hereinafter referred to as " said Act ") has designated site for New Town of Navi Mumbai ( hereinafter referred to as " Said New Town ") vide Urban Development and Public Health Department's (UD and PH) Notification No. RPB . 1171 /18124/I.W . , dated the 20th March 1971 and CIDCO has been appointed as New Town Department Authority (NTDA) for the said New Town under section 113 (3A) of the said Act vide Urban Development and Public Health Department's Notification No. RPB . 117/ 18124/ II.W . , dated the 20th March 1971 ;

And whereas , the Government in exercise of the Powers conferred by section 31 ( 1) of the said Act vide UD and PHD's Notification No. RPB . 1175/ 635/UD - 5 , dated the 18th January 1980 has been sanctioned the Draft Development Plan (hereinafter referred to as said Final Development Plan) in the form of structural plan submitted by CIDCO for the said New Town area and the said Final Development Plan came into force with effect from 1st March 1980 ;

And whereas , the Government in exercise of the power conferred by section 3 of the Maharashtra Municipal Corporation Act , 1949 (hereinafter referred to as the " said MMC Act ") vide the Urban Development Department Notification No. PNP . 2014 /VIP , No. 301/ CR . 354/UD/ 23 dated the 26th September 2016 constituted the Panvel Municipal Corporation for the areas of whole area of Panvel Municipal Council and 29 revenue villages specified therein , which came into force with effect from 1st October 2016 ;

And whereas , the said MMRDA Development Plan's 11 revenue villages has been included in the Panvel Municipal Corporation Area ;

And whereas , the said Final Development Plan and said MMRDA Developed Plan are adjecent to each other and the roads already developed in the said Sanctioned Development plan are up to the boundary limit of Taloje Majkur revenue village in said earstwhile MMRDA Development Plan ;

And whereas , there are Missing links in the said Final Development Plan and the said MMRDA Development Plan it has become expedient to connect the Missing Links by preparing new roads so as to enable the traffic smoothly and to make the conveniently traffic within the Panvel Municipal Corporation ;

And whereas , as per the provisions of the said MMC Act , sections 205 , 206 , and 209 empowers the Municipal Corporation to prepare the new roads , to decide the width of the roads and to improve the roads within the Municipal Corporation Area ;

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६, शके १ ९ ४३

And whereas , the Panvel Municipal Corporation vide General Body Resolution No. 190 dated 5th September 2019 delegated the powers under section 205, 206 and 209 of the said MMC Act to Commissioner , Panvel Municipal Corporation .

Therefore , as per the powers delegated by Panvel Municipal Corporation to the Commissioner , Panvel Municipal Corporation and in exercise of the powers , I, Ganesh Deshmukh Commissioner, Panvel Municipal Corporation here by declares the Missing Links as mentioned in the Schedule 'A ' and a plan appended hereto Schedule 'B ' showing the alignment of the Missing Links is kept open for the inspection of the public on all working days and in working hours in the office of the Assistant Director of Town Planning , Panvel Municipal Corporation.

Any citizen , who want to submit any objection and/or suggestion about the proposed alignment of the road , he/ she may submit in writing to the Assistant Director of Town Planning , Panvel Municipal Corporation , Town Planning Department , 3rd floor , Fire Brigade Building , near Devale Talav , Panvel within 30 days from the publication of this notice in Maharashtra Government Gazette . It shall be noted that , suggestion or objection if any , received by Panvel Municipal Corporation in writing within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette would only be considered by the Municipal Commissioner , Panvel Municipal Corporation . The suggestion/ objection received after 30 days would not be considered.

Schedule ' A'

Description of Road

Layout and make a new public street/road from S. No. 131 of Mouje Taloja Majkur revenue village to S. No. 66 of Mouje Ghot revenue village .

Details of S.No. of lands affected by the proposed alignment of the new road is as below Sr. No.

Name of Revenue village and Survey No.

1 Mouje Taloja Majkur : - 131 (p) , 129 (p ) , 78 (p) , 79(p ) , 80 (p) , 107(p) , 106 (p) , 108(p) 2 Mouje Ghot : - 52 (p) , 53 (p) , 54 ( p) , 66 (p)

Note: Other than above listed survey number , if any other survey number existed while laying out the road then it will also be the part of the above proposed road.

Schedule 'B '

Plan showing proposed alignment of both roads is kept open for Inspection in the office of the Assistant Director of Town Planning , Panvel Municipal Corporation.

GANESH DESHMUKH ,

Panvel , Dated the 8th October 2021 .

Commissioner , Panvel Municipal Corporation .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.