RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक - ९ ]
शुक्रवार , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६ , शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा पुणे
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ व सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९७ नुसारच्या (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम , २०१८ अन्वये कलम १९ चे पोट- कलम (१ ) अन्वये घोषणापत्र.
घोषणापत्र
क्रमांक भूसंपादन/एसआर -०२/२०२१.-- ज्याअर्थी , समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी , पुणे यांनी भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना क्रमांक भूसंपादन/ एसआर -०२/२०२० पुणे, दिनांक १३ ऑक्टोबर २०२० अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग- एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे ; आणि याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची - एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची , अनुसूची -दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , पुणे यांनी कलम १५ च्या पोट- कलम (२) अन्वये दिलेला अहवाल , कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर , उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ चे पोट- कलम (१) च्या तरतुदींन्वये , यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या उक्त जमिनीची अनुसूची दोनमध्ये नमूद उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची- तीनमध्ये वर्णन केलेप्रमाणे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाही म्हणून बाधित पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये वर्णन केलेला नाही ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये , समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी , मावळ- मुळशी उपविभाग , पुणे, जिल्हा पुणे, पत्ता-पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी , स . नं. २३ , बावधन बु. , तालुका मुळशी , जिल्हा पुणे -४११ ०२१ यांस पदनिर्देशित करीत आहे.
(१)
एच-२५२ , भाग एक-असा. ( पु.वि.पु. )- ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ८ ऑक्टोबर २०२१ / आश्विन १६, शके १९ ४३
अनुसूची- एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन जिल्हा पुणे, तालुका मुळशी , गाव वाकड
अ. क्र. भूमापन किंवा गट मोजणीनुसार संपादन क्षेत्र
क्रमांक
पूर्व १
२
४
स. नं.
३ (चौ. मी.)
०१.००
१
१६० पैकी १५ ९/८/१ पैकी, १५९/८/२ पैकी
१६०.००
१६०/७ पैकी
२
१६३ १६०/६ पैकी
३
१७९.००
१६३ ४
१६३ १६०/५ पैकी
३०६.००
६४६.००
एकूण
चतुःसीमा
पश्चिम
दक्षिण
उत्तर
६
७ ५
स. नं.
स. नं .
स. नं .
पाणंद
१६४ १५९/७
पाणंद
१६४ १५९/८
पाणंद
१६४ १५९/८
पाणंद
१६४ १५९/८
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : हिंजवडी ते शिवाजीनगर , पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाकरिता.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला होणारे लाभ : हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा पुणे, तालुका मुळशी , गाव वाकड
अनुक्रमांक
क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
उक्त सार्वजनिक प्रयोजनामुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नाहीत . सबब, पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन निरंक असे.
अनुसूची - चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश )
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश वर्णन निरंक असे.
टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी , मावळ - मुळशी उपविभाग , पुणे , या कार्यालयाचा पत्ता : पत्ता-पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी , स. नं . २३ , बावधन बु . , तालुका मुळशी, जिल्हा पुणे-४११ ०२१ येथे निरीक्षण करता येईल.
पुणे, ६ ऑक्टोबर २०२१ .
डॉ. राजेश देशमुख,
(भा.प्र.से.) ,
जिल्हाधिकारी , पुणे.
DINESH ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .