Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन, असाधारण राजपत्र क्रमांक 82, दिनांकित 29 ऑक्टोबर 2021 पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा अधिसूचना क्रमांक बांध/1737/सन 2021

Published 29 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी २८, २०२० / माघ ८, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ७, अंक ५५] शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१/कर्ातिक ७, शके १९४३ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये

अधिसूचना

क्रमांक बांध/१७३७/सन २०२१

पाचोरा शहराची दुसरी सुधारीत + वाढीव हद्दीची विकास योजना महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, निर्णय क्रमांक टिपीएस-३५१०/ २७७२/प्र.क्र.१८६/२०११/नवि-९, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये भागश: तसेच निर्णय क्रमांक टिपीएस-३५१२/३०१(न)/प्र.क्र.३२(ब)/२०१३/ नवि-९, दिनांक २० फेब्रुवारी २०१५ अंतीम मान्यता मिळाली असून सदर भागश: मंजुर विकास योजना दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.

नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र. १९५ दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे :—

पाचोरा शहराच्या दुसरी सुधारीत + वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सव्र्हे नंबर २२५/१, सव्र्हे नंबर २२७ आणि सव्र्हे नंबर २२८ एकूण ४.१४ हेक्टर खाजगी मालकीच्या जमिनीपैकी ०.७८ हेक्टर जमिनीवर आरक्षण क्र. २० [मंजूर डि.पी.रिपोर्ट बुकाप्रमाणे सव्र्हे नंबर २२५ पैकी, २२४ पैकी (गट नं.१६४ पैकी, १६५ पैकी, २० पैकी)] नुसार " कलचरल सेंटर अॅण्ड लायब्ररी " वापरासाठीचे प्रस्तावित आरक्षण वगळून सदर जमिनीचा वापर रहिवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.

नगरपरिषदेने प्रस्तावित केलेला बदल दर्शविणारा नकाशा म.अध्यक्षांचे सही, शिक्क्यानिशी व दिनांक सहीत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवणेत आला आहे. त्याबाबत कोणास सूचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र तसेच स्थानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्न स्वाक्षरीकार यांचेकडे लेखी पाठवाव्यात. वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापुर्वी नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.

संजय नाथालाल गोहिल, श्रीमती शोभा भगवान बाविस्कर,

पाचोरा, अध्यक्ष, दिनांक २८ ऑक्टोबर २०२१.

पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.

मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.

भाग दोन---८२---१ (१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.