RNI No. MAHBIL/2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक ५६] सोमवार, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ८६
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
अधिसूचना
क्रमांक ठामपा/शविवि/क्लस्टरसेल/अधिसूचना/२१२
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केला आहे.) शासन निर्णय क्र. टिपीएस-१२९७/१३१९/सीआर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ अन्वये मंजूर केली असून, ती दि. २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आहे. तसेच सुधारीत विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्राची (Excluded portion) विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस-१२०१/२७४/सीआर-२८/२००१/नवि-१२, दि. ३ एप्रिल, २००३ अन्वये शासनाने उक्त अधिनियमानुसार मंजूर केली असून ती दि. १४ मे २००३ पासून अंमलात आहे. (यापुढे "उक्त मंजूर विकास योजना" असा उल्लेख केला आहे.);
आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिका प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीत काही बदल करून शासनाने निर्णय क्र.टिपीएस-१२९४/१२५९/ सीआर-२२२/९४/नवि-१२, दि. २८ एप्रिल १९९५ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३१(१) अन्वये विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली होती व सदर नियमावली दिनांक १ जून, १९९५ पासून अंमलात आली होती;
आणि ज्याअर्थी, तत्कालीन मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये ४४ नागरी पुनरुत्थान आराखडे (यु.आर.पी.) दिनांक ५ मे २०१८ रोजीच्या शासन राजपत्रामध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत;
आणि ज्याअर्थी, शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३७ (१कक) (ग) व कलम २०(४)/नवि १३, दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली, मंजूर केली आहे आणि उक्त विकास नियंत्रण नियमावली दिनांक ३ डिसेंबर २०२० पासून अंमलात आली असून सदर नियमावली ठाणे महानगरपालिकेस लागू आहे. (यापुढे " उक्त नियमावली " असा उल्लेख केला आहे);
आणि ज्याअर्थी, मा. सर्वसाधारण सभेने ठराव क्र. १७४ दिनांक २० नोव्हेंबर २०२० अन्वये स्वातंयवीर सावरकरनगर (करवालोनगर), पाटीलवाडी व महात्मा फुले नगर इ. मधील क्षेत्र समूह विकास आराखडयात समाविष्ट करण्यास सूचीत केलेले आहे;
(१)
भाग दोन-----८६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त क्षेत्र हे पूर्वी अधिसूचीत केलेल्या यु.आर.पी. क्र. १२ किसननगरच्या हद्दीलगत असल्याने सदरचे क्षेत्र व इतर अन्य क्षेत्रासह यु.आर.पी. क्र. १२ किसननगरमध्ये समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे (यापुढे प्रस्तावाधिन क्षेत्र असा उल्लेख केला आहे);
आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीतील विनियम क्र. १४.८.१(ii) (b) च्या तरतुदीनुसार नागरी पुनरुत्थान आराखडा तयार करणेचे, अधिसूचित करण्याचे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सुधारीत करण्याचे अधिकार आयुक्त यांना असल्याचे नमूद आहे. तथापि, उक्त विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम क्र. १४.८.१ (i) च्या परिच्छेद २ नुसार नागरी पुनरुत्थान योजनेच्या हद्दी रस्ता, नाला किंवा रेल्वे लाईन अशा भौतिक हद्दींनी वेढलेल्या नसल्यास , उच्चाधिकार समितीशी सल्लामसलत करून, समुहाच्या हद्दी मा. महापालिका आयुक्त निश्चित करू शकतात; आणि ज्याअर्थी, वर नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करावयाचे प्रस्तावाधिन क्षेत्र भौतिक हद्दींनी वेढलेले नसल्याने सल्लामसलतीकरिता उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी ठेवण्यात आले व उक्त बैठकीमध्ये सदरहू क्षेत्र यापूर्वीच्या अधिसूचित आराखडयामध्ये समाविष्ट करण्यास उच्चाधिकार समितीने शिफारस केली आहे;
आणि त्याअर्थी, उक्त नियमावलीमधील विनियम क्र. १४.८.१ (ii) (बी) अन्वये मला प्रदान अधिकारान्वये, ठाणे शहराच्या हद्दीतील यु.आर.पी. क्र. १२ किसननगरच्या यापूर्वीच्या अधिसुचित हद्दीमध्ये बदल करुन सुधारीत हद्दीचा आराखडा यु.आर.पी. क्र. १२ किसननगर (सुधारीत क्षेत्र अंदाज १४०.८१ हेक्टर) म्हणून अधिसुचित करीत आहे :-----
सदर अधिसुचित आराखडयाची हद्द दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ खालील ठिकाणी, पुढील तीस दिवसांकरिता ठेवण्यात येत आहे.
(१) उपसंचालक, नगररचना, क्लस्टर सेल, यांचे कार्यालय, माजीवाडा, ठाणे. (२) शहर विकास विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका, ठाणे. (३) वागळे प्रभाग समिती कार्यालय, ही अधिसूचना व अधिसूचीत नकाशा www.tmctp.thanecity.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
ठाणे, दिनांक २८ ऑक्टोबर २०२१.
डॉ. विपिन शर्मा, भा.प्र.से. आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३ ३THANE MUNICIPAL CORPORATION, THANE
TOWN DEVELOPMENT DEPARTMENT
NOTIFICATION
No.TMC/TDO/Cluster Cell/Notification/212
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
Whereas, the Revised Development Plan of the Thane City has been sanctioned by the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No.TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999, which has come into force with effect from 22nd November 1999, and the Excluded Part (EP) of the said Development Plan has been sanctioned under the said Act vide Government Notification No.TPS/ 1201/274/CR-28/2001/UD-12, dated 3rd April 2003 which has come into force with effect from the 14th May 2003; (hereinafter referred to as "the said sanctioned Development Plan") And whereas, the Development Control Regulations of Thane Municipal Corporation has been sanctioned by the Government after making some modifications in draft Development Control Regulations of Thane City vide Urban Development Department, vide Notification No. TPS 1294/ 1259/CR-222/94/UD-12, date 28th April 1995 under section 31(1) of the said act which had came into force with effect from the 1st June 1995;
And whereas, according to provisions of erstwhile sanctioned Development Control Regulations. 44 Urban Renewal Plans are notified in Government Gazette dated 5th May 2018 within the limits of Thane Municipal Corporation;
And whereas, State Government has sanctioned Unified Development Control and Promotion Regulations vide resolution No. TPS-1818/CR236/18/DP&RP/ sec.37(1AA)(C) & sec. 20(4)/UD-13, dated 2nd December 2020 (hereinafter referred to as "the said Regulations") and the said Regulation are in force from dated 3rd December 2020 and are applicable to Thane Municipal Corporation;
And whereas, General body has passed a resolution No. 174 dated 20th November 2020 to include area of Swatantra Veer Sawarkarnagar (Karwalonagar), Patilwadi and Mahatma Phule Nagar etc. in URP;
And whereas, since the said area is adjacent to boundaries of earlier notified URP No. 12 Kisan Nagar, this area along with other area is proposed to be included in URP No. 12 Kisan Nagar. (hereinafter referred as 'the area under proposal');
And whereas, as mentioned in the Regulation No. 14.8.1(ii) (b) of the said Regulations, that Commissioner can prepare and notify Urban Renewal Plan and revise the same, as and when required. But, as mentioned in the para -2 of Regulation No. 14.8.1(i) of the said Regulations, if URS is not bounded by physical boundaries such as roads, nallahs and railway lines, then the boundary of the cluster can be decided / finalized by Municipal Commissioner, in consultation with High Power Committee (HPC).
And whereas, since the said area under proposal to be notified is not bounded by physical boundaries, it is kept before High Power Committee meeting on 22nd October 2021 and High Power Committee has recommended to include the said area in earlier notified plan;
Now therefore, as per powers conferred to me vide Regulation No. 14.8.1 (ii) (b) of the said Regulations, the notified boundaries of URP No. 12 Kisan Nagar are changed and revised boundary of URP No. 12 Kisan Nagar (Revised area approx. 140.81 hect.) is hereby notified.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३The plans showing boundaries of revised Urban Renewal Plan area is kept for inspection by general public at following places for next thirty days :—
1. Office of the Deputy Director of Town Planning, Cluster Cell, Majiwada, Thane 2. Town Development Department, 4th Floor, Thane Municipal Corporation, Thane 3. Wagale ward office.
This notification and notified plan is also available on website www.tmctp.thanecity. gov.in Thane,
DR. VIPIN SHARMA, I.A.S. dated 28th October 2021.
Commissioner,
Thane Municipal Corporation, Thane.