Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असाधारण राजपत्र क्र. 323, दिनांकित 1 नोव्हेंबर 2021 महसूल व वन विभाग, आदेश क्रमांक मुद्रांक-2021/अनौ-25/प्र.क्र. 295/म-1(धोरण)

Published 01 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

सोमवार , नोव्हेंबर १ , २०२१ / कार्तिक १० , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक १३४ )]

[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३२३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .

महसूल व वन विभाग

मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ नोव्हेंबर २०२१.

आदेश

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.

क्रमांक मुद्रांक -२०२१/ अनौ. - २५/प्र.क्र.२ ९ ५/म-१ ( धोरण) .-ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासन निर्णय, उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक साप्रोयो-२०२१/प्र.क्र.८२ /उद्योग -८ , दिनांक २१ मे २०२१ यान्वये , यासोबत जोडलेल्या अनुसूचीनुसार, जमीन संपादन करण्यासाठी आणि मुदती कर्जाच्या प्रयोजनांसाठी इतर गोष्टींबरोबरच पात्र घटकांचे (युनिटांचे) मुद्रांक शुल्क संपूर्ण माफ करण्याच्या स्वरुपात प्रोत्साहके देण्यासाठी " ऑक्सिजन स्वावलंबन अभियान " (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अभियान " असा केला आहे) योजनेअंतर्गत "साठवण व सिलेंडर भरणा सुविधा (एलएमओ) यासहित " "द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन" करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी / प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रोत्साहके देण्याची घोषणा केली आहे ;

त्याअर्थी , आता, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम ( १ ९ ५८ चा ६० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश , "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ९ च्या खंड ( अ) व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन , याव्दारे, जन हितार्थ तसे करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्यामुळे, उक्त अभियानात विनिर्दिष्ट केलेल्या घटकांच्या किंवा प्रकल्पांच्या पात्र प्रवर्गाच्या बाबतीत ( यात यापुढे ज्याचा निर्देश , "पात्र घटक " असा केला आहे ) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या संलेखांवर, उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची - एक च्या विविध अनुच्छेदाखाली , आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क, दिनांक १ एप्रिल २०२१ , रोजी सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या ( दोन्ही दिवस धरून) कालावधीसाठी किंवा हे अभियान सुरू असेपर्यंत , त्यांच्या संबंधित गुंतवणूक कालावधीसाठी, पुढील शर्तीना अधीन राहून , यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेत माफ करीत आहे: -

शर्ती :-

( १ ) उक्त अभियानात विनिर्दिष्ट केलेल्या अंमलबजावणी अभिकरणाने किंवा याबाबतीत उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने प्राधिकृत केलेल्या अन्य कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याने, मुद्रांक शुल्क माफी प्रमाणपत्र देऊन , उक्त अभियानाखालील कोणत्याही प्रकल्पाची किंवा उद्योगाची किंवा घटकाची पात्रता, प्रमाणित केली पाहिजे.

( २ ) अंमलबजावणी अभिकरणाने, मुद्रांक शुल्क माफी प्रमाणपत्रामध्ये कोणत्याही पात्र घटकाचा गुंतवणूक कालावधी विनिर्दिष्ट केला पाहिजे .

भाग चार-ब-३२३-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, नोव्हेंबर १ , २०२१ /कार्तिक १० , शके १ ९ ४३

( ३ ) या आदेशाखालील मुद्रांक शुल्क माफीचा लाभ , सर्व पात्र नवीन घटकांना तसेच त्यांच्या गुंतवणूक कालावधी मध्ये विस्तारीकरण करणाऱ्या घटकांना लागू आहे .

( ४ ) या आदेशाखालील मुद्रांक शुल्क माफीचा लाभ , या आदेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सर्व पात्र घटकांना लागू आहे.

( ५ ) ज्या घटकांनी , या आदेशाखालील मुद्रांक शुल्क माफीचा लाभ घेतला आहे असे पात्र घटक, इतर कोणत्याही आदेशानुसार किंवा धोरणानुसार त्याच व्यवहाराकरिता मुद्रांक शुल्क माफीकरिता हक्कदार असणार नाही.

(६) महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये या आदेशाच्या प्रसिध्दीच्या दिनांकापुर्वी, कोणत्याही पात्र घटकाकडून आधीच मुद्रांक शुल्क प्रदान करण्यात आले आहे त्या घटकांना, कोणताही परतावा दिला जाणार नाही.

( ७ ) जो पात्र घटक, या आदेशान्वये ज्या करिता मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे अशा , यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या संलेखाचा पक्षकार आहे आणि जो उक्त अभियानाचे प्रयोजन किंवा उद्दिष्टे पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे किंवा ज्या घटकाने या आदेशामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही शर्तीचा भंग केला आहे असा कोणताही पात्र घटक, तो जणू काही सुरुवातीपासून मुद्रांक शुल्कामध्ये माफी दिलेली नव्हती असे समजून , संपूर्ण मुद्रांक शुल्क व शास्ती, कोणत्याही असल्यास , प्रदान करण्यास पात्र असेल .

(८ ) उक्त अभियानामध्ये विनिर्दिष्ट केलेले अंमलबजावणी अभिकरण, ज्या घटाकांनी, या आदेशाअन्वये मुद्रांक शुल्क माफीचा लाभ घेतलेला आहे , परंतु उक्त अभियानाचे प्रयोजन किंवा उद्दिष्टे पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे किंवा या आदेशामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे कोणत्याही शर्तीचा भंग केला आहे, त्या घटकांची नावे व तपशील, नियमितपणे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य , पुणे यांना कळविली पाहिजे.

स्पष्टीकरण. -

( १ ) या आदेशाव्दारे तरतूद केलेला मुद्रांक शुल्क माफीचा लाभ , उक्त अधिनियमान्वये पात्र घटक व नंतरचा घटक यांच्यामध्ये निष्पादित केलेल्या भाडेपट्ट्याव्दारे किंवा अभिहस्तांतरणाव्दारे किंवा भाडेपट्टा हक्काच्या अभिहस्तांकनाव्दारे किंवा विक्री प्रमाणपत्राव्दारे संपादन केलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाच्या संलेखाला किंवा दस्तऐवजाला/ दस्तऐवजांना लागू असणार नाही.

( २ ) उक्त अधिनियमाखालील पात्र घटक व नंतरचा किंवा पुढील घटक यामधील पुढील संव्यवहार , या आदेशाखालील मुद्रांक शुल्क माफीकरिता पात्र असणार नाही. एका घटकाने दुसऱ्या घटकाशी केलेला संव्यवहार, या आदेशाखालील मुद्रांक शुल्क माफीकरिता पात्र असणार नाही.

अनुसूची

अ.क्र.

घटकांचा प्रकार

(२)

उक्त अधिनियमाच्या अनुसूची एकच्या अनुच्छेदांखालील संलेखाचा प्रकार (४)

(१)

माफीची मर्यादा (३)

१.

१०० %

राज्याच्या सर्व भागात स्थापन होणाऱ्या एम एस एम ई, (सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील) मोठे व विशाल प्रकल्प प्रवर्गातील साठवण व सिलेंडर भरणा सुविधेसह द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती करणारे सर्व पात्र नवीन किंवा विस्तारित घटक.

अभिहस्तांतरणपत्र ( अनुच्छेद -२५ ) , भाडेपट्टा ( अनुच्छेद-३६ ) , अभिहस्तांकनाव्दारे भाडेपट्ट्याचे हस्तांतरण ( अनुच्छेद -६० ) , विक्री प्रमाणपत्र (अनुच्छेद -१६ ) , मुदती कर्ज, हक्क विलेख - निक्षेप संबंधी करारनामा ( अनुच्छेद -६ ) , गहाणखत (अनुच्छेद-४० ), गहाण मालमत्तेवर अधिक प्रभार (अनुच्छेद-३३).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीधर डुबे -पाटील, शासनाचे सहसचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, नोव्हेंबर १, २०२१/ कार्तिक १० , शके १ ९ ४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 1st November 2021

Order

MAHARASHTRA STAMP АСТ .

No. Mudrank- 2021/U.O.R . No.25/C.R. 295/M - 1 ( Policy) .-Whereas , the Government of Maharashtra has vide Government Resolution , Industries , Energy and Labour Department , No. Saproyo 2021 /C.R.82/IND - 8 , dated the 21st May 2021 , declared the Special Incentives for setting up new/ expansion projects for " Liquid Medical Oxygen Manufacturing along with Storage and Cylinder filing facility ( LMO ) " under the Scheme "Mission Oxygen Swavalamban " ( hereinafter referred to as " the said Mission " ) to provide inter alia fiscal incentives in the form of full waiver of stamp duty for the eligible units for acquiring land and for term loan purposes , as per Schedule appended hereto ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act ( LX of 1958 ) ( hereinafter referred to as ' the said Act' ) , the Government of Maharashtra , being satisfied that it is necessary to do so in the public interest , hereby remits the stamp duty to the extent as specified in column (3) of the Schedule appended hereto , chargeable under the various Articles of the Schedule- I appended to the said Act , on the instruments specified in column (4) of the Schedule appended hereto , in respect of the eligible category of units or projects specified in the said Mission ( hereinafter referred to as " the eligible unit " ) , for the period starting from the 1st April 2021 and ending on the 31st March 2023 ( inclusive of both days ) or for the currency of Mission , for their respective investment period subject to the following conditions , namely :-

Conditions-

(1) The implementing Agency as specified in the said Mission or any other Competent Authority , authorized by the Industries , Energy and Labour Department in this behalf , must certify the eligibility of any project or industry or unit under the said Mission , by providing stamp duty remission certificate .

(2 ) The implementing Agency must specify the investment period of any eligible unit in the stamp duty remission certificate .

(3) The benefit of stamp duty remission under this Order is applicable to all eligible new units as well as units undertaking expansion during their investment period .

(4) The benefit of stamp duty remission under this Order is applicable to all the eligible units as specified in the Schedule appended to this Order.

(5) The eligible unit which has availed of the remission of stamp duty under this Order shall not be entitled for remission of stamp duty for the same transaction as per any other order or policy.

(6) No refund shall be granted where the stamp duty has already been paid by any eligible unit , prior to the date of publication of this Order in the Maharashtra Government Gazette .

( 7) Any eligible unit who is party to the instrument as specified in column (4) of the Schedule appended hereto , for which the remission of the stamp duty is granted under this Order , and who fails to fulfil the purpose or objectives of the said Mission or commits breach of any of the conditions as specified in this Order , shall be liable to pay the whole stamp duty and penalty , if any , as if there was no remission in the stamp duty from the beginning .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, नोव्हेंबर १ , २०२१/ कार्तिक १० , शके १ ९ ४३

(8) The implementing Agency as specified in the said Mission must convey to the Inspector General of Registration and Controller Stamps , Maharashtra State , Pune on regular basis , the names and details of the units which have availed of remission of the stamp duty under this Order but failed to fulfil the purpose or objectives of the said Mission or committed breach of any of the conditions as specified in this Order .

Explanation.-

( 1) The benefit of stamp duty remission provided by this Order shall not apply to the instrument or document/ s of transfer of acquired land by way of lease or conveyance or assignment of lease rights or sale certificate executed between the eligible unit and the subsequent unit under the said Mission .

(2) Further transaction between the eligible unit and the subsequent or the next unit under the said Mission shall not be eligible for the remission of the stamp duty under this Order . Thus unit to unit transaction shall not be eligible for stamp duty remission under this Order.

Schedule

Type of Units

The type of Instruments under Articles of the Schedule I of the said Act .

Sr. No.

(2)

Extent of

Remission

(3)

(1)

(4)

1.

100%

All Eligible New or Expansion Units of Liquid Medical Oxygen Manufacturing along with Storage and Cylinder Filing Facility ( LMO) in MSME , Large and Mega Project category set up in all areas of the State .

Conveyance (Article - 25 ) , Lease ( Article- 36) , Transfer of Lease by Assignment (Article - 60 ) , Certificate of Sale ( Article- 16 ) , Term Loan Agreement relating to Deposit of Title Deed ( Article - 6 ) Mortgage Deed (Article - 40 ) , Further charge on Mortgaged Property (Article - 33 ) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SHRIDHAR DUBE PATIL , Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS, 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.