RNI No. MAHBIL/ 2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - मध्य उप- विभाग मंगळवार , नोव्हेंबर ९ , २०२१/ कार्तिक १८ , शके १ ९ ४३
[ पृष्ठ १, किंमत: रुपये २६.०० वर्ष ७ , अंक ४६]
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासकीय भवन , मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ नोव्हेंबर २०२१
माहे डिसेंबर , २०२१ ते जानेवारी , २०२२ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती , जिल्हापरिषदा व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक/पोट - निवडणुकांसाठी दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी गाह्य धरण्याबाबत .
आदेश
क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०२१/प्र.क्र . १/का. ८. मुंबई महानगरपालिका अधिनियम , १८८८ ( १८८८ चा मुंबई ३ ) च्या कलम १ ९ ( १ ) (ब) , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ ( १९ ४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५ ९ ) मधील कलम ७ ( अ) , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१९ ६५ चा महा . ४० ) च्या कलम ११ , महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ (१९ ६२ चा महा. ५ ) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम , १ ९ ५८ (१ ९ ५ ९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ ) चे कलम १२ चे पोट- कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , दिनांक १ नोव्हेंबर २०२१ या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी , माहे डिसेंबर , २०२१ ते जानेवारी , २०२२ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका , नगरपरिषदा / नगरपंचायती , जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक / पोट निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
किरण कुरुंदकर , सचिव, राज्यनिवडणूक आयोग , महाराष्ट्र.
भाग एक- अ (म.उ.वि.)-७२-१
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .