Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 200 (9-11-2021), गृह विभाग (परिवहन), क्रमांक एमव्हीआर-1121/प्र.क्र. 135/परि-2.

Published 09 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

मंगळवार , नोव्हेंबर ९ , २०२१/ कार्तिक १८ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १०३ ]

[पृष्ठ १, किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक २००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

गृह विभाग (परिवहन)

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ .

अधिसूचना

क्रमांक एमव्हीआर -११२१ / प्र.क्र . १३५ /परि -२ . ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांकरिता बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे .

ज्याअर्थी, नागरिकांची गैरसोय होऊ नये यास्तव , प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे , असे शासनास वाटते .

त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम , १ ९ ८८ ( १ ९ ८८ चा ५ ९ ) चे कलम ६६ चे उप- कलम ( ३ ) चा खंड (एन ) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे सर्व खाजगी प्रवासी बसेस , स्कूल बसेस , कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संप/ आंदोलन ज्यावेळी मागे घेतले जाईल त्यावेळी सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

राजेंद्र होळकर, शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार- ब- २००-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.