RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १४१] बुधवार, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ [पृष्ठे ८, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३४१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्ोोग विभाग
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.
क्रमांक सीएसआर-०८१८/प्र. क्र. ८३/ १३-स.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) च्या कलम १६५ च्या पोट-कलम (१) व (२) याद्वारे प्रदान के लेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-ब, दिनांक ५ फे ब्रुवारी, २०२१ यामध्ये प्रसिद्ध के लेली शासकीय अधिसूचना, सहकार पणन व वस्र्तोद्योग विभाग, क्रमांक सीएसआर. ०८१८/प्र.क्र.८३/१३-स, दिनांक ५ फे ब्रुवारी, २०२१ अन्वये मागविलेले आक्षेप व सूचना विचारात घेतल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४, यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :—
१. या नियमांस, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (सुधारणा ) नियम, २०१९ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४; यामध्ये यापुढे ज्याचा निर्देश, "मुख्य नियम" असा के ला आहे याचा नियम २ मध्ये, खंड; १६ मधील, "संस्थांची निवडणूक" या शब्दानंतर, "आणि प्रकार "ई" संस्थांच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी याचा अर्थ निवडणूक घेण्याकरिता, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या नामिके मधून, तिच्या समितीने किंवा निबंधकाने नियुक्त के लेली व्यक्ती, असा आहे". हा मजकू र दाखल करण्यात येईल.
३. मुख्य नियमांच्या नियम ४ मध्ये,—
(क) खंड (तीन) मधील,"क" वर्गातील संस्था या शीर्षाखालील नोंद ४ मध्ये , "२०० किंवा २०० पेक्षा जास्त सभासद" या अंक व अक्षरी मजकु राऐवजी, "दोनशे पासहून जास्त सभासद" हा मजकू र दाखल करण्यात येईल.
(ख) खंड (चार) मधील, "ड" वर्गातील संस्था या शीर्षाखालील नोंद (१) वगळण्यात येईल.
(ग) खंड (चार) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल, म्हणजेच :—
" (पाच) "ई" वर्गातील संस्था.-
मागील वर्षाच्या ३१ मार्च रोजी दोनशे पास पेक्षा कमी किंवा तितके सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था.
भाग चार-ब-३४१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ ४. मुख्य नियमांच्या भाग-दहा नंतर, पुढील भाग समाविष्ट करण्यात येईल, म्हणजेच:-
"भाग -१०-१अ"
"ई" वर्ग प्रकाराच्या संस्थांच्या समितीच्या निवडणुकीच्या बाबतीतील तरतुदी
७६-ए. वर्ग "ई" प्रकाराच्या संस्थांच्या समितीची निवडणूक - या भागाच्या तरतुदी, नियम ४ च्या खंड (पाच) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या वर्ग "ई" प्रकाराच्या संस्थांच्या समितीच्या निवडणुकींबाबत लागू असतील.
७६-बी. निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजूर के लेल्या व विभागीय सह निबंधकाने ठेवलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामिके मधून विद्यमान समितीचा कार्यकाळ समाप्त होण्याच्या साठ दिवस अगोदर किंवा संस्थेच्या अशा सभासदांमधून जे सभासद निवडणूक लढविण्यास इच्छू क नाहीत, अशा संस्थांच्या व्यवस्थापन समितीकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल व तसे निबंधकास कळविण्यात येईल.
परंतु, अशा संस्थेच्या मावळत्या व्यवस्थापन समितीचा कोणताही, लेखापरीक्षक, कर्मचारी किंवा कोणताही सभासद यांची अशा समितीची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येणार नाही.
परंतु, आणखी असे की, अशाप्रकारे नियुक्त के लेला निवडणूक निर्णय अधिकारी, शासनाने वेळोवेळी अधिसूचित के लेल्या कोणत्याही जिल्हा गृहनिर्माण सहकारी महासंघातून किंवा कोणत्याही प्रशिक्षण संस्थेतून निवडणुकीशी संबंधित प्रशिक्षण घेईल.
परंतु, आणखी असे की, जर अशा संस्थेची समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास निष्फळ ठरली तर, निबंधक त्याच्याकडील नामतालिके मधून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करतील.
७६-सी. मतदार यादी तयार करणे :-
(१) ज्या वर्षी अशा संस्थेची निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, त्या वर्षातील निवडणुकीसाठी किमान साठ दिवस अगोदर अशा प्रत्येक संस्थेकडून एक तात्पुरती मतदार यादी तयार करण्यात येईल व ती प्रसिद्ध करण्यात येईल.
(२) तात्पुरत्या मतदार यादीमध्ये, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ च्या नमूना "आय" मध्ये अशा संस्थेने ठेवलेल्या सभासद नोंदवहीनुसार आणि नमूना "जे " मध्ये ठेवलेल्या सभासद सूचीनुसार तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास असलेल्या सर्व सभासदांचा समावेश असेल.
(३) ज्या प्रकरणी समिती अधिक्रमित के लेली आहे अशा प्रकरणी, अशा संस्थेचा सचिव किंवा निबंधकाने नियुक्त के लेला प्राधिकृ त अधिकारी, संस्थेच्या सूचना फलकावर मतदारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करील आणि अशा यादीची एक प्रत निबंधक कार्यालयास तिची प्रत सूपुर्द करील आणि ती पोचपावतीसह लेखी सूचनेसह किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सर्व सभासदांना देखील उपलब्ध करून देईल.
७६-डी. तात्पुरत्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावयाचा तपशील :-
तात्पुरत्या मतदार यादीत, सभासदांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असेल अशा इतर तपशीलासह मतदार म्हणून नोंदणी करण्यास हक्कदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची नमूना ई-३ मधील सभासदांच्या नोंदवहीत नोंदविल्याप्रमाणे आडनाव, नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय, लिंग (वर्णानुक्रमे) पयासह अंतभू र्त असेल.
७६- ई. तात्पुरत्या मतदार यादीबाबत दावे व आक्षेप आणि अंतिम मतदार यादी :-
(१) जेव्हा दावे व आक्षेप मागविण्यासाठी कोणतीही तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध के ली गेली असेल तेव्हा, यादीतील नाव, पत्ता किंवा इतर कोणताही तपशील याबाबतीतील कोणतीही वगळणूक किंवा त्रुटी असल्यास संबंधित संस्थेच्या कोणत्याही सहयोगी किंवा सह किंवा तात्पुरत्या सभासदास, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध के ल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत कामकाजाच्या वेळेत ती, संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या लेखी निदर्शनास आणून देता येईल.
(२) प्रत्येक दावा, आक्षेप किंवा दुरूस्ती ही, लेखी स्वरुपात दाखल करण्यात येईल आणि त्यात ज्यावर दावा आधारित आहे किंवा यथास्थिती, आक्षेप ज्या कारणावरून घेतला गेला आहे, ती कारणे नमूद करण्यात येतील.
(३) संस्थेचा निवडणूक निर्णय अधिकारी, याबाबत त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी के ल्यानंतर असे दावे, आक्षेप किंवा दुरूस्त्या विचारात घेईल आणि दावे किंवा आक्षेप प्राप्त झाल्याच्या अंतिम दिनांकापासून दहा दिवसांच्या आत, त्यावरील त्यांचामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ ३ निर्णय संबंधित व्यक्तींना लेखी देतील आणि नमूना ई-३(१) मध्ये दावे व आक्षेप प्राप्त झाल्याच्या शेवटच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या कालावधीत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करील. सर्व दावे आणि आक्षेपावर निर्णय दिल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निश्चित के लेली यादी ही अंतिम मतदार यादी असेल.
(४) अंतिम मतदार यादीच्या प्रती, त्या तयार के ल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीत संस्थेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येतील.
७६-एफ. मतदानाच्या हक्कासंबंधात लेखी संमती:-
(१) संस्थेचा कोणताही सभासद त्याचा मतदानाचा हक्क कोणत्याही सहयोगी किंवा सह सदस्याकडे, हस्तांतरित करण्यासंबंधीची संमती, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध के ल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी सादर करेल.
(२) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित के लेली कं पनी किंवा भागीदारी संस्था किंवा इतर कोणताही निगम निकाय किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा व्यक्तींचा कोणताही संघ किंवा कोणतीही कायदेशीर संस्था यांचेबाबतीत, कोणताही प्राधिकृ त संचालक किंवा व्यक्ती किंवा भागीदारी संस्थेने नियुक्त के ल्याप्रमाणे, भागीदारांपैकी कोणताही भागीदार, त्याचेवतीने निवडणुकीत मतदान करण्यासाठी यथोचितरीत्या प्राधिकृ त के लेल्या प्रतिनिधीचे नाव, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध के लेल्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवील. ७६-जी. विविध टप्प्यांचे कार्यक्रम जाहीर करून निवडणूक घेणे :-
(१) निवडणूक निर्णय अधिकारी, संस्थेची अंतिम मतदार यादी प्रदर्शित के ल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत, निवडणुकीचे विविध टप्पे तयार करतील व त्या टप्यांचा कार्यक्रम घोषित करतील, अशा प्रकारे तयार के लेले टप्पे पूढीलप्रमाणे असतील :-
(एक) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा दिनांक प्रत्येक टप्प्यासाठी दिनांक व वेळ यासह निवडणूक
कार्यक्रम जाहीर करण्याच्या वेळी घोषित करणे.
(दोन) नामनिर्देशन पत्रे भरण्याचा अंतिम दिनांक निवडणूक कार्यक्रम जाहीर के ल्याच्या दिनांकापासून ५
दिवस.
(तीन) प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची यादी
नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी निश्चित के लेल्या अंतिम प्रसिद्ध करण्याचा दिनांक
दिनांकापयत जसे प्राप्त होतील त्याप्रमाणे.
(चार) नामनिर्देशन पत्राची छाननी करण्याचा दिनांक नामनिर्देशपत्रे सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच्या नंतरचा
पुढील दिवस
(पाच) नामनिर्देशन पत्रांची छाननी के ल्यानंतर वैध
छाननी पूर्ण झाल्याच्या दिनांकानंतरचा पूढील
नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्याचा दिनांक
दिवस.
(सहा) ज्या दिनांकापयत उमेदवारी मागे घेता येईल तो
नामनिर्देशन पत्रांच्या छाननी नंतर वैध
दिनांक.
नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध के ल्याच्या
दिनांकापासून १५ दिवसांच्या आत.
(सात) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम सूची उमेदवारी मागे घेण्यासाठी निश्चित के लेल्या
प्रसिद्ध करण्याचा व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याचा शेवटच्या दिवसाच्या लगत नंतरचा दिवस.
दिनांक
(आठ) ज्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये मतदान घेण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम सूची येईल किंवा बिनविरोध निवडणूक घोषित करण्यात येईल प्रसिद्ध के ल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांपेक्षा आधी नसेल त्या बैठकीचा दिनांक व वेळ आणि ठिकाण
परंतु त्यापेक्षा दिवस नंतर नसेल.
(निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निश्चित करावयाची वेळ व
ठिकाण)
(नऊ) मतमोजणीचा दिनांक, वेळ व ठिकाण ज्या दिनांकास मतदान घेण्यात येईल त्या
दिनांकापासून तीन दिवसांपेक्षा नंतरचा नसेल.
भाग चार-ब-३४१-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ (निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निश्चित
करावयाची वेळ व ठिकाण).
(दहा) मतदानाचा निकाल घोषित करण्याचा दिनांक मतमोजणी नंतर लगेच.
(२) निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्याची पद्धती:-
(क) निवडणूक निर्णय अधिकारी, गृहनिर्माण संस्थेच्या सूचना फलकावर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करतील आणि तो कार्यक्रम सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा हातबटवाने किंवा नोंदणीकृ त डाके ने किंवा कु रीअरने आवश्यक असेल तर ज्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये निवडणूक घेण्यात येईल त्या बैठकीचा दिनांक, वेळ व स्थळ या बाबतीतील सूचनेसह, पाठविण्यात येईल.
(ख) सूचनापत्रांत पुढील माहिती अंतभू र्त असेल :-
१. निवडणुकीने भरावयाच्या रिक्त जागांची संख्या.
२. अधिनियम व उपविधि नुसार राखीव असलेल्या जागांची संख्या.
७६-एच. उमेदवारांचे नामनिर्देशन :-
(१) निवडणुकीसाठी उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र नमूना ई-५ मध्ये करण्यात येईल व सदरचा नमूना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून सभासदांना विनामूल्य पुरविण्यात येईल.
(२) ज्या सभासदांची नावे मतदारांच्या अंतिम यादीमध्ये अंतभू र्त असतील, अशा दोन सभासदांच्या स्वाक्षऱ्या प्रत्येक नामनिर्देशन पत्रावर असतील. या दोन सभासदांपैकी एका सभासदाची स्वाक्षरी उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राचा सूचक म्हणून तर दुसऱ्या सभासदाची स्वाक्षरी त्या उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राचा अनुमोदक म्हणून असेल.
(३) नामनिर्देशन पत्रामध्ये निवडणुकीसाठी उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवाराने स्वाक्षरी के लेले प्रतिज्ञापत्र सुध्दा दाखल करावयाचे आहे. कलम ७३-ब नुसार राखीव जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जात प्रमाणपत्राची प्रत देखील जोडण्यात येईल.
(४) ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला नामनिर्देशनपत्र प्राप्त होतील तो निवडणूक निर्णय अधिकारी, नामनिर्देशनपत्रांवर त्यांचे अनुक्रमांक देईल आणि ज्या वेळेस व दिनांकास त्यांना असे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असेल तो दिनांक व वेळ प्रमाणित करेल आणि नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याची लेखी पोचपावती तात्काळ देईल.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, नामनिर्देशन पत्रे प्राप्त करण्यासाठी निश्चित के लेली वेळ समाप्त झाल्यावर, त्यास प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची सूची तयार करील आणि नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी निश्चित के लेल्या अंतिम दिनांकापयत ती जसजशी प्राप्त होतील त्यानुसार ती जाहीर करेल.
(६) कोणतीही व्यक्ती उमेदवार म्हणून नामनिर्देशित के ली जाणार नाही जर,-
(एक) त्या व्यक्तीचे नाव, अंतिम मतदार यादीमध्ये अंतभू र्त नसेल; किंवा
(दोन) ती व्यक्ती अधिनियम, नियम किंवा उपविधितील तरतुदीन्वये समितीचा सभासद म्हणून अनर्ह ठरविण्यात आली असेल तर, अशी व्यक्ती निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित के ली जाणार नाही.
७६-आय. निवडणूक निशाण्या :-
१. निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने, (एससीईए ने) ज्या निशाण्या विनिर्दिष्ट के ल्या आहे त्या निवडणूक निशाण्यांमधून निवडणुकीच्या वेळी उमेदवारांकडून ज्या निशाण्या निवडण्यात येतील अशा निवडणूक निशाण्या विनिर्दिष्ट करील. परंतू ज्या निशाण्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाशी संबंधित असतील अशा कोणत्याही निवडणूक निशाण्यांचे वाटप करणार नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ ५७६ जे. अनामत रक्कम :-
उमेदवार, त्याने याखाली विनिर्दिष्ट के लेले नामनिर्देशन शुल्क निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा के ल्याखेरीज किंवा जमा करण्याची व्यवस्था के ल्याखेरीज त्या उमेदवारास संबंधित मतदार संघामधून निवडणुकीसाठी यथोचितरित्या नामनिर्देशित के ला गेला असल्याचे समजण्यात येणार नाही.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गाव्यतिरिक्त अन्य उमेदवारासाठी अनामत रु. ५००
रक्कम -
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम - रु. २००
७६- के . नामनिर्देशन पत्राची छाननी करणे :-
१. निवडणूक निर्णय अधिकारी नियत वेळी नामनिर्देशन पत्राची छाननी करील आणि नामनिर्देशन पत्रांची तपासणी करेल आणि कोणत्याही नामनिर्देशन पत्राच्या बाबतीत कोणत्याही उमेदवाराकडून किंवा त्याच्या सूचकाकडून किंवा अनुमोदकाकडून ज्या कोणत्याही हरकती घेण्यात आल्या असतील त्या सर्व हरकतींवर निर्णय घेईल आणि एकतर घेण्यात आलेल्या हरकतींवरून किंवा त्याच्या स्वत:च्या प्रस्तावावरून, त्यास आवश्यक वाटेल अशी संक्षिप्त चौकशी के ल्यानंतर एकतर नामनिर्देशन पत्राचा स्वीकार करील किंवा कोणतेही नामनिर्देशन पत्र नाकारील.
२. निवडणूक निर्णय अधिकारी, वर्णलेखन वा लेखनदोष, मतदार यादी क्रमांक यासारख्या महवाच्या स्वरूपाचा नसलेला कोणताही दोष असल्याच्या कारणांवरून कोणतेही नामनिर्देशन पत्र नाकारणार नाही.
३. निवडणूक निर्णय अधिकारी, लेखी कारणे नोंद करून पुढील पैकी कोणत्याही कारणांवरून नामनिर्देशन पत्र नाकारील, म्हणजेच :-
(अ) जर नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी के ली नसेल किंवा नामनिर्देशन पत्र भरले नसेल तर; किंवा (ब) जर संस्थेच्या अधिनियम, नियम किंवा उपविधि यान्वये उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरला असेल तर,
७६-एल. नामनिर्देशन मागे घेणे :-
कोणत्याही उमेदवारास त्याने नामनिर्देशन पत्र सादर के ल्यानंतर कोणत्याही वेळी परंतु अशी उमेदवारी मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रमात विनिर्दिष्ट के लेल्या वेळेच्या आत, त्याने स्वाक्षरी के लेल्या आणि नमूना ई-६ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सुपूर्द के लेल्या लेखी सूचना देऊन त्याची उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी, ज्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे अशा उमेदवारांची एक सूची तयार करेल. उमेदवारी मागे घेण्याची एकदा दिलेली सूचना संबंधित उमेदवारास बदलता येणार नाही.
७६-एम. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करणे :-
(१) निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी नमुना ई-७ मध्ये तयार करेल आणि ती संस्थेच्या कार्यालयातील सूचना फलकावर जाहीर करेल.
(२) उक्त यादीत, मतदारांची यादी ज्या भाषेत व रितीने तयार करण्यात आलेली असेल त्या भाषेतील वर्णानुक्रमानुसार व त्या रितीने उमेदवारांच्या नावांतील निर्देशांसह त्यांची नावे, आडनावे आणि अन्य उमेदवारांची योग्य नावे तसेच नामनिर्देशन पत्रामध्ये दिल्याप्रमाणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पत्ते अंतभू र्त असतील.
(३) मतदान घेणे आवश्यक असेल त्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये व्यक्त के लेल्या निशाण्यांच्या पसंतीवर विचार करेल, आणि,—
(अ) निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास शक्यतो व्यवहार्य असेपयत, त्याच्या पसंतीनुरूप वेगवेगळ्या निशाण्यांचे वाटप करील ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३(ब) जर निवडणूक लढविणाऱ्या एकापेक्षा अधिक उमेदवारांनी एकाच निशाणीसाठी आपली पसंती दर्शविली असेल तर, "प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य" या तवावर निशाणी वाटप करण्यात येईल आणि असे नियतवाटप अंतिम असेल ; आणि
(क) जर निवडून द्यावयाच्या एकू ण जागांच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक उमेदवारांनी एकत्र येऊन त्यांचा वेगळा गट तयार के ला असेल आणि अशा सर्व संबंधित उमेदवारांनी सह्या के लेल्या सामूहिक लेखी अर्जाद्वारे एकाच निशाणीची मागणी के ली असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी त्या सर्व उमेदवारांना एकच सामायिक निशाणी वाटप करू शके ल. (४) प्रत्येक उमेदवारास त्याला वाटप के लेल्या निशाणीबाबत तात्काळ कळविण्यात येईल आणि राज्य सहकार प्राधिकरणाने दिलेल्या त्या निशाणीचा नमूना निवडणूक अधिकाऱ्याकडून त्या उमेदवारास पुरविण्यात येईल.
७६- एन. मतदान :-
(१) जर, ज्या मतदार संघासाठी निवडणूक घ्यावयाची आहे अशा कोणत्याही मतदार संघासाठी ज्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध असल्याचे घोषित करण्यात आले आहे, अशा उमेदवारांची एकू ण संख्या ही, त्या मतदार संघासाठी निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसेल तर, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक घेण्याच्या प्रयोजनार्थ बोलविलेल्या सर्वसाधारण सभेत, ते उमेदवार, व्यवस्थापकीय समितीसाठी यथोचितरित्या निवडून आले असल्याचे घोषित करेल.
(२) ज्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत त्या उमेदवारांची संख्या, कोणत्याही मतदार संघासाठी निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक असेल तर, निवडणूक निर्णय अधिकारी, या प्रयोजनार्थ निश्चित के लेल्या दिनांकास व वेळेत आवश्यक असलेले मतदान घेण्याची व्यवस्था करेल.
(३) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला, मतदान घेण्यासाठी आवश्यक वाटेल तेवा मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येईल.
(४) ज्या ठिकाणी निवडणुका घ्यावयाच्या आहेत त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीद्वारे निवडणुकीचा प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, मतदानास प्रारंभ करण्याच्या लगतपूर्वी त्यावेळी तेथे उपस्थित असतील अशा व्यक्तींना रिकामी मतपेटी दाखवेल आणि त्यानंतर अशाप्रकारे ती मतपेटी कु लूपबंद करेल आणि मोहर (सील) तोडल्याखेरीज ती उघडली जाऊ शकणार नाही अशारितीने निवडणूक निर्णय अधिकारी त्यावर स्वत:ची मोहोर उमटवेल. उमेदवाराला देखील, त्याची तशी इच्छा असल्यास, त्याची स्वत:ची मोहोर उमटवता येईल.
(६) मतदानाचा हक्क बजावू इच्छिणाऱ्या प्रत्येक सभासदाला, सोयीनुसार मुद्रित के लेली, टंकलिखीत के लेली किंवा नक्कल के लेली वर्णक्रमाने मांडणी के लेली, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अंतभू र्त असलेली मतपत्रिका पुरविण्यात येईल. मतपत्रिके वर संस्थेची मोहोर देखील उमटविलेली असेल, आणि मतपत्रिके च्या मागील बाजूस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अद्याक्षरे देखील असेल आणि मतदार ज्यास मतदान करू इच्छित असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे किंवा नावांपुढे " X" हे चिन्ह उमटवण्याकरिता मतदारासाठी आणखी एक स्तंभ असेल.
(७) सभासद, त्यास मतपत्रिका प्राप्त झाल्यावर लगेच,—
(एक) मतदान कक्षांपैकी कोणत्याही एक मतदान कक्षात जाईल ;
(दोन) त्यानंतर, तो ज्या उमेदवारास मतदान करू इच्छित असेल त्या उमेदवाराच्या मतपत्रिके वरील चिन्हावर किंवा जवळ, त्या प्रयोजनासाठी पुरविलेल्या साधनाने चिन्हांकन करेल, तसेच प्रत्येक मतदार, जेवा जागा भरावयाच्या आहेत तेवढी मते देण्यास हक्कदार असेल.
(तीन) त्याची मतपत्रिका झाकली जाईल अशारितीने मतपत्रिके ची घडी करेल.
(चार) घडी के लेली मतपत्रिका मतपेटी मध्ये टाके ल.
(पाच) मतदान कें द्राबाहेर जाईल. आणिमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ ७ (सहा) एखादा मतदार मतदान कक्षात असताना इतर कोणत्याही मतदारास मतदान कक्षात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येईल.
(८) ज्याचे नाव अंतिम मतदार यादीत नोंदविण्यात आले असेल आणि जो मतदान करण्यास पात्र असेल अशा कोणत्याही सभासदाच्या ओळखीबाबत कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतल्यास निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत संक्षिप्त चौकशी करेल आणि ओळखीबाबत घेतलेल्या आक्षेपावर निर्णय घेईल.
(९) मतदान समाप्त होण्यापूर्वी मतदान परिसरात उपस्थित असणाऱ्या सर्व मतदारांना मतपत्रिका देण्यात येतील व त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल.
(१०) जर मतदानाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणताही दंगा किंवा दंगल या कारणामुळे मतदान करण्याच्या कार्यवाहीत, आडकाठी किंवा अडथळा येत असेल तर, किंवा जर कोणत्याही पुरेशा कारणामुळे अशा या निवडणुकीमध्ये मतदान घेणे शक्य होत नसेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला, अशा कार्यवाहीसाठी त्याची कारणे नोंदवून मतदान स्थगित करण्याचा अधिकार असेल.
(११) जेव्हा खंड (१०) अन्वये मतदान थांबविले असेल तेव्हा किंवा मतदान पेा नष्ट झाल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या कारणावरुन किंवा कोणत्याही अन्य पुरेशा कारणावरून मत मोजणी करणे शक्य नसेल तेव्हा अशा बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी, संस्थेच्या इतिवृत्त पुस्तकात अशा कारवाईची कारणे नोंदवून मतदान पुढे ढकलेल आणि यासंबंधीची सूचना संस्थेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करेल व त्याबाबतची माहिती निबंधकास देईल.
७६- ओ. मतमोजणी करणे व निकाल जाहीर करणे :-
(१) निवडणूक निर्णय अधिकारी, जाहीर के लेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरू करील. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेली वैध मतांची संख्या, अवैध मतांची संख्या यांची मोजणी करील आणि यशस्वी उमेदवारांची नावे घोषित करेल.
(२) जेव्हा एकतर राखीव किंवा बिगर राखीव जागांसाठी कोणत्याही उमेदवारांस समान मते पडली असल्याचे आढळून आले असेल तेव्हा, निवडून आल्याचे घोषित करावयाच्या कोणत्याही उमेदवाराला जास्तीचे एक मत देण्यात येईल, ज्या व्यक्तीस किंवा व्यक्तींना असे अतिरिक्त मत देण्यात आले असल्याचे मानण्यात येईल त्या व्यक्तीचे निर्धारण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या व उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत, निवडणूक निर्णय अधिकारी निर्धारित करील अशारीतीने चिठ्ठ्या टाकू न संबंधित उमेदवारास विजयी घोषित करण्यात येईल.
(३) निवडणूक निर्णय अधिकारी, ज्या उमेदवाराला सर्वाधिक वैध मते पडलेली असतील तो उमेदवार निवडून आला असल्याचे घोषित करेल आणि नमूना ई-१७ मध्ये निवडणुकीचा निकाल प्रमाणित करील आणि निकाल घोषित के ल्यापासून दोन दिवसांच्या आत तो निर्णय निबंधकास सादर करील. तसेच तो निकाल संस्थेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करेल.
त्यानंतर निबंधक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून त्यांना नमूना ई-१७ प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत समिती घटित करील.
७६-पी. निवडणूकांशी संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची अभिरक्षा :-
निवडणुकीशी संबंधित सर्व अभिलेख, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याद्वारे पेटीत यथोचितरित्या कु लूपबंद के लेल्या, मोहोरबंद के लेल्या स्थितीत संस्थेच्या सचिवाकडे किंवा प्राधिकृ त के लेल्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि असा अभिलेख निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्यांपयत काळजीपूर्वक जतन करून ठेवण्यात येईल आणि त्यानंतर तो नष्ट के ला जाईल. तथापि, जर निवडणुकीचा निकाल विवादित असेल तर, निवडणुकीशी संबंधित अभिलेख संबंधित विवादाचा अंतिम निर्णय होईपयत जतन करून ठेवण्यात येईल.
७६- क्यु. निवडणूक निर्णय अधिकारी, पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निवडून आलेल्या समितीच्या सदस्यांची नियत के लेल्या दिनांकास बैठक बोलावतील आणि त्यासाठी निश्चित के लेल्या दिनांकापूर्वी किमान सात दिवस अगोदर लेखी पोच घेऊन त्याबाबतची सूचना प्रत्येक सदस्यास देण्यात येईल. अशा सूचनेमध्ये,-
(एक) निवडावयाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या; आणि८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १७, २०२१/कर्ातिक २६, शके १९४३ (दोन) बैठकीचा दिनांक, ठिकाण व वेळ, अंतभू र्त असलेल्या बैठकीमध्ये झालेल्या कामकाजाची नोंद, संस्थेच्या इतिवृत्त पुस्तकामध्ये करण्यात येईल आणि ते निबंधकास कळविण्यात येईल.
७६- आर. (१) वरील तरतुदींखेरीज या नियमांच्या नियम १,२,४,१४,७०,७२,७८ ते ८६ मधील तरतुदी "ई" वर्गात मोडणाऱ्या संस्थांच्या समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत देखील लागू असतील.
या नियमांच्या नियम ३,५ ते १३,१५ ते ६९,७१ व ७३ ते७७ च्या तरतुदी , "ई" वर्गात मोडणाऱ्या संस्थांच्या समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत लागू असणार नाहीत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनुप कु मार,
शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.