RNI No. MAHBIL /2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी
[पृष्ठे ३ , किंमत: रुपये ११.०० वर्ष ७ , अंक ५३ (४) ]
गुरुवार , नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांजकडून
क्र. भूसंपादन /टें ६ /मौजे चेंढरे / १ ९ ची अधिसूचना /प्रसिद्धी / २०२१ .-ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांचेमार्फत पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटारवाहन इत्यादी प्रयोजनाकरिता अलिबाग , ता. अलिबाग , जि. रायगड येथील जमीन संपादित करावयाची आहे. सदर संपादनासाठी केलेली जमीन उपविभागीय अधिकारी , अलिबाग , उपविभाग अलिबाग , ता. अलिबाग, जि. रायगड यांचे कार्यालयाकडून संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी , भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे ) यांच्या कलम ११ च्या पोट - कलम ( १ ) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , उपविभागीय अधिकारी , अलिबाग यांनी अधिसूचना, क्रमांक उविअ/कात-२ / भूसंपादन/ चेंढरे /एस आर १ वाढीव क्षेत्र / २०१५/ २०२० , दि. २४ नोव्हेंबर २०२० , अन्वये कलम ११ ची अधिसूचना मराठीमध्ये महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरूवार ते बुधवार , दि.३ - ९ डिसेंबर २०२० , पृष्ठ क्र. २४ ते २६ वर तसेच " दै . रत्नागिरी टाईम्स " मध्ये गुरूवार दि. १७ डिसेंबर २०२० रोजी पान क्र. ९ वर आणि " दै. किल्ले रायगड " मध्ये गुरूवार दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी पान क्र . २ वर प्रसिद्ध झाली आहे. सदर अधिसूचनेबाबतचे शुद्धीपत्रक क्र. उविअ/कात -२ /भूसंपादन/ अलिबाग/ शुद्धीपत्रक/ एसआर ८२ / २०२० / २०२१ , दि. १७ मार्च २०२१ अन्वये कलम ११ चे अधिसूचनेबाबत शुद्धीपत्रक मराठीमध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, दि. २५-३१ , मार्च २०२१ , पृष्ठ क्र. ९ वर प्रसिद्ध झाली आहे . तसेच " दै . रायगड वृत्तवेध " मध्ये शनिवार , दिनांक १० एप्रिल २०२१ , रोजी पान क्र. ४ वर आणि " दै . आपले साम्राज्य " मध्ये शुक्रवार दिनांक ० ९ एप्रिल २०२१ , रोजी पान क्र. ८ वर प्रसिद्ध झाली आहे. यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची , अनुसूची - दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
त्याअर्थी , मी , जिल्हाधिकारी रायगड - अलिबाग , भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे ) हा राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम १५ च्या पोट - कलम ( २ ) अन्वये अहवाल पाठविलेल्या प्राधिकाऱ्याचा अहवाल विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत माझी खात्री पटली आहे ; आणि म्हणून , उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ च्या पोट- कलम ( १ ) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे ;
(१)
भाग एक ( को.वि.पु ) -७३-१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७ , शके १ ९ ४३ आणि ज्याअर्थी , अनुसूची - तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून " निरंक " निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून , पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची - चार मध्ये " निरंक " विनिर्दिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. उक्त जमिनीच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व कार्यवाहीच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्याकरीता संपादन अधिनियमाचे कलम ३ च्या खंड ( छ ) याद्वारे उपविभागीय अधिकारी, अलिबाग , उपविभाग अलिबाग, ता. अलिबाग, जि . रायगड यांची नेमणूक करण्यात येत आहे . त्याप्रमाणे त्यांना उक्त जमिनीच्या संबंधातील संपादनाची कार्यवाही या प्रयोजनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी , असे निर्देश देण्यात येत आहे.
अनुसूची- एक
( संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन )
मौजे अलिबाग , ता . अलिबाग , जिल्हा रायगड
अ.क्र.
स.नं./हि.नं./गट नंबर
मालमत्ता पत्रक/ सिटएस. क्र.
संपादित क्षेत्र (हे.आर. )
०-०३-०
१
१३५५
स.नं .१०१/२
एकूण क्षेत्र
०-०३-०
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: मौजे अलिबाग , ता. अलिबाग येथील जमीन रायगड जिल्हा पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटारवाहन इत्यादी प्रयोजनाकरिता संपादन.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन
: रायगड जिल्हा पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटारवाहन इत्यादी प्रयोजनासाठी संपादन करण्यात येणारी जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असून पोलीस मुख्यालयाच्या परिसरात प्रस्तावित भूसंपादनाच्या जमिनीशेजारी तळकर नगर येथे १०० ते १२५ घरांची वस्ती आहे. दंगलरोधक पथकाच्या कवायती व सरावाकरिता निवडलेली जागा पोलीस मुख्यालयाला लागून असल्याने सोयीची आहे. तसेच सध्याच्या कवायती क्रिडा मैदानाला लागूनच आहे. या ठिकाणी पोलीस नियमित सराव करतात व याची परिसरातील नागरीकांना माहिती आहे व सवय आहे.
समाजाला होणारे लाभ
: अलिबाग शहराचे औद्योगिक महत्त्व वाढते नागरीकरण व पर्यटन वाढते महत्त्व लक्षात घेता , येत्या दशकात अलिबाग शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होईल . वाढत्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत ग्रामीण ते शहरी स्थलांतर तर होतेच , परंतु परप्रांतीय स्थलांतरसुद्धा वेगाने होत आहे. याचा नागरी सुविधांवर खूप ताण येतो , रोजच्या जगण्यासाठी संघर्ष वाढतो व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते . गुन्हेगारांना पकडणे , शिक्षा करणे व गुन्हेगारी वृत्तीला प्रतिबंधकरणे या सर्व आघाड्यांवर पोलीस यंत्रणेला काम करावे लागते. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलाची भूमिका व कर्तव्य महत्त्वाचे ठरते . यादृष्टिने स्थानिक पोलीस दलाकडे दंगलरोधक पथक व शीघ्रकृतीदल असणे आवश्यक आहे . यामुळे लोकांना सुरक्षित व आश्वासक वाटते . या पथकाचा नियमित सराव पोलीस मुख्यालयाच्या परिसरात होतो . आजुबाजूच्या वस्तीमधील ९ ० टक्के लोकांना दंगलरोधक पथक व शीघ्रकृतिदलामुळे सुरक्षित वाटते.
लोकांच्या मते १. सुरक्षिततेची भावना २. भुरटेचोर, साखळीचोर यांना दहशत ३. गुन्हेगारी कमी होईल . ४ लहान मुले , स्त्रिया, जेष्ठ नागरीकांना सुरक्षित वाटेल. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी , लोकांच्या मनात विश्वास, सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी दंगलरोधक पथक व शीघ्रकृतीदलाची महत्त्वाची भूमिका आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७ , शके १ ९ ४३
अनुसूची- तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गावचे नाव मौजे अलिबाग, तालुका अलिबाग , जिल्हा रायगड
क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
अनुक्रमांक
निरंक
अनुसूची- चार
( पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश )
" निरंक "
टीप: उक्तजमिनीच्या नकाशाचे. उपविभागीय अधिकारी , अलिबाग , उपविभाग अलिबाग, ता. अलिबाग , जि. रायगड या कार्यालयात निरीक्षणाकरिता उपलब्ध होऊ शकेल.
ठिकाण: अलिबाग
डॉ. महेंद्र कल्याणकर,
दिनांक १७ नोव्हेंबर २०२१
जिल्हाधिकारी , रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .