Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex.370) (Dated the 4th December 2021) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अधिसूचना क्रमांक एमईडी.1016/प्र.क्र.69/16/शिक्षण-२

Published 04 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

शनिवार , डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १९ ४३ [पृष्ठे २० , किंमत: रुपये ९.०० वर्ष ७ , अंक १५०]

असाधारण क्रमांक ३७०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

मंत्रालय , गो.ते. रुग्णालय आवार, ९ वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १ ९ ऑगस्ट २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ .

क्रमांक एमईडी. १०१६/प्र.क्र.६ ९/ १६/शिक्षण-२ . - महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम , २०१५ ( २०१५ चा महा. २८ ) याच्या कलम २३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे , पूर्णवेळ व्यावसायिक आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, भौतिकोपचार ,व्यवसायोपचार , स्पीच थेरपी , प्रोस्थेटिक्स व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पदवीपुर्व पाठ्यक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत.

१. संक्षिप्त नाव व प्रारंभ - ( एक) या नियमांस , महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी , समचिकित्सा, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी, प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन ) नियम, २०१६ असे म्हणावे.

( दोन ) ते , राजपत्रात प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

२. व्याख्या - (१ ) या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,

(क) " अधिनियम" याचा अर्थ , महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन, ) अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. २८ ) , असा आहे ;

(ख) "प्रवेश उपस्थिती संस्था " याचा अर्थ, जेथे उमेदवार कागदपत्रे सादर करून आणि शुल्क प्रदान करून प्रवेश निश्चित करण्यासाठी उपस्थित राहील ती संस्था, असा आहे ;

(१)

भाग चार- ब- ३७०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १९ ४३

(ग) " अर्जाचा नमुना ' याचा अर्थ, खंड (च) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे पाठ्यक्रमातील प्रवेशासाठी उमेदवाराने ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने भरावयाचा विहित नमुना, असा आहे ;

( घ) "केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेच्या ( कॅप ) जागा " याचा अर्थ , सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे पार पाडलेल्या केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेमार्फत (कॅप ) भरलेल्या जागा, असा आहे ;

(ङ) " सामाईक प्रवेश चाचणी ( सीईटी ) " याचा अर्थ , या नियमान्वये पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी आयोजित केलेली सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) , असा आहे ;

(च) "पाठ्यक्रम" याचा अर्थ , संबंधित केंद्रीय परिषदेच्या मान्यतेनुसार राज्यात चालवण्यात येणारे , यथास्थिती आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, भौतिकोपचार , व्यवसायोपचार , स्पीच थेरपी , प्रोस्थेटिक्स व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पदवीपुर्व पाठ्यक्रम असा आहे .

(छ) "परिषद" याचा अर्थ, संबंधित केंद्रीय परिषद , असा आहे ;

(ज) "कागदपत्र पडताळणी केंद्र " याचा अर्थ , जेथे कागदपत्रे पडताळणी करावयाची आहे ते सक्षम प्राधिकाऱ्याने घोषित केलेले शहर किंवा नगर, असा आहे ;

(झ) " पात्र उमेदवार " याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट- कलम (१ ) अन्वये शासनाने वेळोवेळी अधिसूचित केल्याप्रमाणे विविध व्यावसायिक पाठ्यक्रमांसाठी जे पात्र आहेत असे उमेदवार, असा आहे ;

(ञ) "प्रदेश" याचा अर्थ , विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यांच्या संबंधित वैधानिक विकास मंडळातील क्षेत्र, असा आहे ;

(ट) "उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ( एच.एस.सी ) " याचा अर्थ , महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा. ४१ ) याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ( इयत्ता बारावी) परीक्षा अथवा मान्यताप्राप्त मंडळाने दिलेले, त्यास समतुल्य असे प्रमाणपत्र, असा आहे ;

(ठ) "संस्थास्तरीय कोटा " याचा अर्थ, शासनाने किंवा समुचित प्राधिकरणाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांच्या प्रवेशासाठी संस्थास्तरावर उपलब्ध असणाऱ्या जागा , असा आहे;

(ड) "परस्पर गुणवत्ता " याचा अर्थ , उमेदवारांचा विविध वर्गाच्या/प्रवर्गाच्या संबंधातील गुणानुक्रम, असा आहे;

(ढ) " अल्पसंख्याक कोटा " याचा अर्थ , संस्था ज्या अल्पसंख्याक समाजाकरिता आहे अशा, महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राखून ठेवलेल्या जागा, असा आहे;

(ण) " महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ " याचा अर्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम , १ ९९ ८ ( १ ९९९ चा महा. १० ) याच्या कलम ३ च्या पोट- कलम ( १ ) अन्वये स्थापन केलेले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , असा आहे;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(त) " भारताचे समुद्रपार नागरिक ( ओसीआय) " याचा अर्थ, नागरिकत्व अधिनियम , १ ९ ५५ याच्या कलम ७ क अन्वये केंद्र सरकारने घोषित केलेला भारताचा समुद्रपार नागरिक म्हणून नोंदणी केलेला उमेदवार किंवा व्यक्ती , असा आहे आणि त्यात भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश होतो.

स्पष्टीकरण. या खंडाच्या प्रयोजनार्थ , गृह मंत्रालय भारत सरकार अधिसूचना , क्रमांक एफ.क्र. २६०११/०४/९ ८ / एफ.आय , दिनांक १ ९ ऑगस्ट, २००२ अन्वये नोंदणी केलेल्या भारतीय वंशाच्या विद्यमान सर्व कार्डधारक व्यक्ती आता गृह मंत्रालय , भारत सरकार , अधिसूचना क्रमांक २५०२४ /९/ २०१४/एफ. आय , दिनांक ९ जानेवारी , २०१५ अनुसार भारताच्या कार्डधारक समुद्रपार नागरिक ( ओसीआय) असल्याचे मानण्यात येईल.

(थ) " अर्हता परीक्षा " याचा अर्थ , प्रवेशाच्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेल्या संस्थेची इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र) या विषयासह उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी ) अथवा त्यास समतुल्य अशी परीक्षा, असा आहे;

(द) "माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ( एस.एस.सी. ) " याचा अर्थ , महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा. ४१ ) याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १० वी ) अथवा मान्यताप्राप्त मंडळाने दिलेले , त्यास समतुल्य असे प्रमाणपत्र, असा आहे ;

( २ ) या नियमामध्ये वापरलेल्या परंतु व्याख्या न केलेल्या शब्दांना व शब्दप्रयोगांना अधिनियमांमध्ये अनुक्रमे जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल .

३. अर्ज मागविणे.- सक्षम प्रधिकारी , ज्या शैक्षणिक वर्षाच्या पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश चाचणी ( सीईटी ) आवश्यक आहे, त्या पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेमध्ये (कॅप ) सहभागी होण्याकरीता त्याने विहीत केलेल्या नमुन्यामध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवील.

४. सामाईक प्रवेश चाचणीचे (सीईटी) माध्यम, पध्दती, अभ्यासक्रम, वेळापत्रक, इत्यादी जाहीर करणे. (१) संबंधित परिषदेचे विनियमन यांच्या अधीन राहून, सक्षम प्राधिकारी , सामाईक प्रवेश चाचणी ( सीईटी) आयोजित करण्याच्या प्रयोजनासाठी पुढील घोषणा करतील.

(क) सामाईक प्रवेश चाचणीचे ( सीईटी) माध्यम ;

(ख) सामाईक प्रवेश चाचणीचा ( सीईटी) आकृतीबंध ;

(ग) सामाईक प्रवेश चाचणीची (सीईटी ) पध्दत ;

(घ) सामाईक प्रवेश चाचणीची ( सीईटी) वेळापत्रक ;

(ङ) प्रवेशपत्र प्रसिध्द करणे ;

भाग चार-ब- ३७०-१अ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १९ ४३

(च) निकालाची घोषणा , इत्यादी ;

(छ) केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया (कॅप ) फेऱ्या, संस्थात्मक कोट्याच्या आधारावर प्रवेश, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाकडून प्रवेश आणि प्रवेशासंबंधित इतर बाबींचा तपशील ; आणि

(ज) ज्या सामाईक प्रवेश चाचणी घेण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहे, किंवा असेल अशी इतर कोणत्याही बाबी.

( २ ) महाराष्ट्र शासनाच्या पूर्व मान्यतेने सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे सामाईक प्रवेश चाचणीशी संबंधित असणारा अभ्यासक्रम घोषित करण्यात येईल.

५. उमेदवारीचे प्रकार

(१ ) महाराष्ट्र राज्य उमेदवारी,

प्रकार

निकष

(एक) उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे.

(क)

(दोन) सन २०१६ साठी असेल त्या खेरीज , भारतीय वंशाचे व्यक्ती (पीआयओ) किंवा भारताचे समुद्रपार नागरिक (ओसीआय ) , अनिवासी भारतीय (एनआरआय) पात्र असणार नाहीत.

(तीन ) सन २०१६ साठी असेल त्या खेरीज , उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे .

( चार) पाठ्यक्रमाच्या प्रवेशाच्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी उमेदवाराने वयाची १७ वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. तथापि, आयुर्वेद व युनानी पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी, पाठ्यक्रमाच्या प्रवेशाच्या वर्षाच्या १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापुर्वी त्याच्या वयाची १७ वर्ष पुर्ण केलेली असली पाहिजे. त्यासाठी उमेदवाराचे नाव दर्शविणारे जन्म प्रमाणपत्र , माध्यमिक शालान्त परीक्षा प्रमाणपत्र , उदा. एस.एस.सी किंवा समतुल्य परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्म दिनांकाचे पुष्टी देणारा शाळा सोडण्याचा दाखला हा वयाचा वैध पुरावा असेल . (वयाची पात्रता, संबंधित केंद्रीय परिषदेद्वारे, वेळोवेळी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल. )

(पाच) उमेदवार हा वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा.

(सहा) उमेदवाराने महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेल्या संस्थेमधून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा त्यास समतूल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली आवश्यक आहे . तथापि, सन २०१६ साठी असेल त्या खेरीज , जो उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा महाराष्ट्र राज्याबाहेरील संस्थेतून उत्तीर्ण झाला असेल आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेल्या संस्थेतुन उत्तीर्ण केली असेल , तो उमेदवार या पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहे, परंतु, तो किंवा ती महाराष्ट्र राज्याची अधिवासी असेल.

(सात) उमेदवाराने पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(ख) महाराष्ट्र शासनाच्या किंवा त्याच्या उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी खंड (क ) ( सहा ) चा किंवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी किंवा समतुल्य परीक्षेसाठी खंड ( क ) (सात) चा अपवाद .

(एक) महाराष्ट्र शासनाचे किंवा त्याच्या उपक्रमाचे जे कर्मचारी सुरूवातीपासून महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या ठिकाणी सेवेत रूजू झालेले आहेत परंतु, त्यांची महाराष्ट्र राज्यात स्थित असलेल्या ठिकाणी बदली झालेली आहे , अशा कर्मचाऱ्यांची पाल्ये जरी ते महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असले तरीही ते प्रवेशासाठी पात्र असतील; परंतु, महाराष्ट्र शासनाच्या किंवा त्याच्या उपक्रमाच्या अशा कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्यात स्थित असलेल्या कामाच्या ठिकाणी पदस्थापना किंवा बदली किंवा प्रतिनियुक्ती झालेली असली पाहिजे आणि पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी कर्तव्यावर उपस्थित झालेले असले पाहिजे म्हणजेच कर्तव्यावर रूजू झालेले असले पाहिजे.

(दोन) वरील (एक) मधील उपरोक्त प्रवर्गातील उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाचा किंवा त्याच्या उपक्रमाचा कर्मचारी पात्रतेच्या सिमांतिक(कट ऑफ) दिनांकापूर्वी म्हणजेच पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी त्या पदावर रूजू झालेला आहे आणि/किंवा कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे याचा पुरावा म्हणून असा कर्मचारी ज्या कार्यालयात कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे त्या कार्यालयाचे आवश्यक प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक असेल. या प्रमाणपत्रामध्ये कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, पदनाम, बदली किंवा पदस्थापना आदेश क्रमांक व दिनांक , रुजू दिनांक व विद्यमान पदस्थापनेचा दर्जा अंतर्भूत असेल. पसंतीक्रम नमुना भरतेवेळी बदली किंवा पदस्थापना आदेशाची प्रत देखील दाखल करण्यात यावी.

(तीन ) ज्यांची महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या ठिकाणी बदली किंवा प्रतिनियुक्ती झालेली आहे किंवा जे प्राथमिक बदलीनंतर किंवा प्रतिनियुक्तीनंतर महाराष्ट्र राज्यात परत आलेले आहेत, अशा महाराष्ट्र शासनाच्या किंवा त्याच्या उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची पाल्ये , जरी अशी पाल्ये महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तरीही प्रवेशासाठी पात्र असतील .

(चार) वरील (तीन ) मधील प्रवर्गातील उमेदवारांनी वरील महाराष्ट्र शासनाचा किंवा त्याच्या उपक्रमाचा कर्मचारी, पात्रतेच्या सिमांतिक ( कट ऑफ) दिनांकापूर्वी म्हणजेच, पसंतीक्रम नमुना सादर करण्याचा शेवटच्या दिनांकापूर्वी, त्या पदावर रुजू झालेला आहे आणि/किंवा कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे याचा पुरावा म्हणून असा कर्मचारी ज्या कार्यालयात कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे , त्या कार्यालयाचे आवश्यक प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक असेल. या प्रमाणपत्रामध्ये कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, पदनाम, बदली किंवा पदस्थापना आदेश क्रमांक व दिनांक, रुजू दिनांक व विद्यमान पदस्थापनेचा दर्जा अंतर्भूत असेल. पसंतीक्रम नमुना भरतेवेळी बदली किंवा पदस्थापना आदेशाची प्रत देखील दाखल करण्यात यावी.

६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(ग)

भारत सरकारच्या किंवा त्याच्या उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी खंड (क) ( सहा ) चा किंवा उच्च माध्यमिक परीक्षेसाठी किंवा समतुल्य परीक्षेसाठी खंड ( क) ( सात) चा अपवाद - (एक) भारत सरकारच्या किंवा त्याच्या उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची पाल्ये, जरी ते महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आणि /किंवा उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असले तरीही, ते प्रवेशासाठी पात्र असतील; परंतु, भारत सरकारच्या किंवा त्याच्या उपक्रमाच्या अशा कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्याबाहेरील ठिकाणाहून बदली झालेली असली पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यात असलेल्या कामाच्या ठिकाणी पदस्थापना झालेली असली पाहिजे, आणि पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी कर्तव्यावर उपस्थित झालेले असले पाहिजे, म्हणजेच कर्तव्यावर रुजू झालेले असले पाहिजे.

(दोन) वरील (एक) मधील प्रवर्गातील उमेदवारांनी , भारत सरकार किंवा त्याच्या उपक्रमाचा कर्मचारी , पात्रतेच्या सिमांतिक (कटऑफ) दिनांकापूर्वी म्हणजेच पसंतीक्रम नमुना सादर करण्याचा शेवटच्या दिनांकापूर्वी , त्या पदावर रुजू झालेला आहे किंवा कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे या वस्तुस्थितीचा पुरावा म्हणून असा कर्मचारी , ज्या कार्यालयात कर्तव्यार्थ उपस्थित झालेला आहे , त्या कार्यालयाचे आवश्यक प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक असेल. या प्रमाणपत्रामध्ये कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, पदनाम, बदली आणि पदस्थापना आदेश क्रमांक व दिनांक, रूजू दिनांक व विद्यमान पदस्थापनेचा दर्जा अंतर्भूत असेल. पसंतीक्रम नमुना भरतेवेळी बदली किंवा पदस्थापना आदेशाची प्रत देखील दाखल करण्यात यावी.

(२) अल्पसंख्याक उमेदवार -

नियम ( ५ ) च्या पोट- नियम ( १ ) अनुसार पात्रता निकषांची पूर्तता करणारे राज्यातील विशिष्ट भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक समाजातील महाराष्ट्राचे अधिवासी असलेला उमेदवार , या प्रवर्गाखाली पात्र असेल .

(३) अनिवासी भारतीय (एन. आर. आय. ) उमेदवार-

जो उमेदवार या अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (ढ) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे शर्तीची पूर्तता करील तो उमेदवार या प्रवर्गा अन्वये पात्र असेल.

६. पात्रता

(क) बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा बीयुएमएस किंवा बीपीटीएच किंवा बीओटीएच किंवा बीएएसएलपी किंवा बीपी अॅन्ड ओ व बी.एस्सी. नर्सिंगला प्रवेशाकरिता पात्रता गुण-पाठ्यक्रमाच्या प्रथम वर्षाकरिता प्रवेशासाठी पात्रता, या अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट - कलम ( १ ) अन्वये शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे असेल. सामाईक प्रवेश चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारावर वर निर्देशिलेल्या पाठ्यक्रमाकरिता उमेदवार निवडले जातील .

(ख ) बीयुएमएस करिता अतिरीक्त पात्रता. - उमेदवार उर्दु किंवा अरेबीक किंवा पर्शियन भाषा यापैकी एका विषयासह मान्यता प्राप्त मंडळामधुन माध्यमीक शालांत प्रमाणपत्र किंवा समकक्ष परिक्षा, किंवा संबधित परिषदेने वेळोवेळी विहीत केल्याप्रमाणे उत्तीर्ण असला पाहीजे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(ग) पात्रतेचा अंतिम ( कट ऑफ) दिनांक : उमेदवाराची पात्रता, पसंतीक्रम नमुना सादर करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन या सर्व नियमांचा व विनियमनांच्या प्रयुक्तीसह सर्व प्रयोजनांसाठी अंतिम (कट ऑफ) दिनांकास निर्धारीत करण्यात येईल किंवा ठरविण्यात येईल. निःसंदेहपणे असे स्पष्ट करण्यात येत आहे की, जर एखादा उमेदवार त्या नियमांच्या व विनियमनांच्या अनुसार , पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अपात्र असल्याचे आढळून आले तर आणि जर असा अपात्र उमेदवार उपरोक्त अंतिम तारखेनंतर म्हणजेच पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आवश्यक पात्रता संपादन करीत असेल तरी पात्रतेच्या अशा नंतरच्या संपादनामुळे जे प्रवेशाच्या प्रयोजनासाठी खुपच कमी आहे , अशा कोणत्याही प्रयोजनासाठी अपात्र उमेदवार पात्र ठरणार नाही .

७. विविध पाठ्यक्रमांसाठी मंजुर केलेल्या प्रवेशाच्या जागा पदवीपूर्व पाठ्यक्रमाच्या प्रथम वर्षासाठी मंजूर केलेल्या प्रवेशाच्या जागा संबंधित पाठ्यक्रमांना मान्यता देण्यासाठी जो सक्षम आहे , अशा प्राधिकाऱ्याने मान्यता दिल्याप्रमाणे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ( एमयुएचएस) दिलेल्या संलग्नीकरणानुसार असतील.

८. जागांचे वाटप पाठ्यक्रमाच्या प्रथम वर्षासाठी सामाईक प्रवेश चाचणीद्वारे उमेदवारांच्या विविध प्रकारांसाठी जागांच्या वाटपाची टक्केवारी , संबधित केंद्रीय परीषद यांच्या विनियमनांनुसार, आणि अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे , शासनाच्या धोरणानुसार असेल .

(१) महाराष्ट्र राज्य उमेदवारी असलेल्या जागा नियम ५ च्या पोट -नियम ( १ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याची उमेदवारी असलेला उमेदवार, या जागांसाठी पात्र असेल.

(२ ) अल्पसंख्याक उमेदवारी असलेल्या जागा - नियम ५ च्या पोट- नियम ( २ ) मध्ये नमूद केलेली उमेदवारी असलेले उमेदवार, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे या जागांसाठी पात्र असतील . या जागा, या अधिनियमाच्या कलम ६ च्या पोट -कलम ( २ ) च्या तरतूदीनुसार भरण्यात येतील.

(३ ) संस्थात्मक कोट्यातील जागा संस्था, पुढील शर्तीस अधिन राहून, अनुसूचीनुसार, मंजूर प्रवेश क्षमतेच्या १५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांना प्रवेश देऊ शकतात: -

( एक) नियम ५ च्या पोट - नियम ( १ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेली उमेदवारी असलेले उमेदवार, लागू असल्याप्रमाणे, या जागांसाठी पात्र असतील.

(दोन) अनिवासी भारतीय (एन आर आय ) उमेदवारांना , प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून, संस्थात्मक कोट्यातील जागांच्या अंतर्गत प्रवेश देण्यात येईल;

(तीन) जर अनिवासी भारतीयांसाठी (एन आर आय ) आरक्षित असलेल्या जागा रिक्त राहिल्या तर , त्या रिक्त जागा सामाईक प्रवेश चाचणीच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारावर नियम ५ च्या पोट - नियम ( १ ) व ( २ ) मध्ये दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांमधून भरण्यात याव्यात.

९ . जागांचे वितरण- सक्षम प्राधिकरणाद्वारे वाटप करण्यात यंईल .

(एक) राज्य पातळीवरील ३० टक्के कोट्यातील जागांचे वितरण - सक्षम प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० टक्के जागा प्रथम राज्यातील उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल , आणि त्या जागा सामाईक ८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १९ ४३

प्रवेश चाचणीच्या गुणवत्ता यादीच्या आधारावर भरण्यात येतील.या बाबतीत प्रचलित नियमांनुसार या जागांमध्ये सांविधानिक व महिला आरक्षण देण्यात येईल .

(दोन) प्रादेशिक पातळीवरील ७० टक्के कोट्यातील जागांचे वितरण- वरील ( एक) मध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्य पातळीवरील ३० टक्के कोट्यातील जागा वगळल्यानंतर, उर्वरित ७० टक्के जागा , या बाबतील प्रचलित असलेल्या नियमानुसार सांविधानिक व महिला आरक्षणास अधीन राहून, संबंधित प्रदेशात स्थित असलेल्या महाविद्यालयातून जे उमेदवार बारावी उत्तीर्ण झाले आहेत, त्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.

(तीन) जे उमेदवार महाराष्ट्र राज्यातून अर्हताकारी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्या उमेदवारांसाठी ७० टक्के प्रादेशिक कोट्यातील जागांसाठी निकषः -७० टक्के प्रादेशिक कोट्यातील जागांअंतर्गत निवडीसाठी उमेदवारांचा प्रदेश हा , तो किंवा ती ज्या प्रदेशातून बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, तो प्रदेश असेल.

(चार) महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या संस्थेमधून जे उमेदवार अर्हताकारी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे त्या उमेदवारांसाठी ७० टक्के प्रादेशिक कोट्यासाठी निकष जे उमेदवार महाराष्ट्र राज्याबाहेरून अर्हताकारी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे , त्या उमेदवारांसाठी : -

अ. क्र.

७० टक्केप्रादेशिक कोट्यासाठी प्रदेश कोटा/ उमेदवाराचा प्रकार

१.

बदलीपूर्वीचा / प्रतिनियुक्तीपूर्वीचा पालकांचा पदस्थापनेचा प्रदेश .

राज्य सरकारी कर्मचारी- नियम ५ ( १ ) ( ख ) अन्वये पात्र (महाराष्ट्राबाहेर बदली झालेले)

पालकांचा पदस्थापनेचा प्रदेश.

२. राज्य सरकारी कर्मचारी- नियम ५ ( १ ) ( ख ) अन्वये पात्र (महाराष्ट्रात परत बदली झालेले)

पालकांचा पदस्थापनेचा प्रदेश.

३. केंद्र सरकारचे कर्मचारी- नियम ५ ( १ ) ( ग ) अन्वये पात्र.

(पाच) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप ) खाजगी विनाअनुदानीत संस्थेतील पाठ्यक्रमांसाठी निवड ( १ ) भारत सरकार ; ( २ ) संबधित केंद्रीय परिषद; ( ३ ) महाराष्ट्र शासन; आणि ( ४ ) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची परवानगी किंवा मान्यता किंवा संलग्नीकरण यांस अधीन असेल. विशिष्ट महाविद्यालयातील प्रवेश क्षमता ही उक्त प्राधिकरणांनी परवानगी दिलेल्या "जागांच्या किमान संख्ये " इतकी असेल;

( सहा ) दिनांक १ ऑगस्ट, २००६ रोजीच्या महाराष्ट्र खाजगी व्यावसायिक शिक्षण संख्या ( अनुसूचित जाती , अनुसचित जमाती , निरधिसूचित जमाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती , व इतर मागासवर्ग यांच्या प्रवेशासाठी जागांचे आरक्षण) अधिनियम , २००६ ( २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३० ) नुसार , विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्थेच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा सांविधानिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येतील;

(सात) सक्षम प्राधिकाऱ्याने उपलब्ध असलेल्या जागांमधील आयुर्वेद व होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमासाठी ३० टक्के राज्य व ७० टक्के प्रादेशिक कोटा असेल . दोन्ही मध्ये ३० टक्के महिला आरक्षण असेल.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३, शके १९ ४३

( आठ) बीयुएमएस, बीपीटीएच , बीओटीएच , बीएएसएलपी , बीपी अॅन्ड ओ व परिचर्या पाठ्यक्रमाकरिता सर्व जागा फक्त राज्यस्तर गुणवत्ता यादीमधील उमेदवारांद्वारे भरल्या जातील. या पाठ्यक्रमांसाठी ७० टक्के प्रादेशिक कोटा नसेल.

१०. गुणवत्ता यादी तयार करणे सक्षम प्राधिकारी परीक्षा घेईल , उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करील आणि निकाल घोषित करील;

(एक) पाठ्यक्रमांसाठी निवड करण्याकरिता गुणवत्ता यादी तयार करणे - पाठ्यक्रमांसाठी निवड करण्याकरिता उमेदवाराने सामाईक प्रवेश चाचणीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे , गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल . राज्य गुणवत्ता यादी सामाईक प्रवेश चाचणीतील गुणवत्तेच्या उतरत्या क्रमाने असेल. गुणवत्ता यादीमध्ये राज्य गुणवत्ता यादी क्रमांक, प्रादेशिक गुणवत्ता यादी क्रमांक, प्रवर्ग गुणवत्ता यादी क्रमांक दर्शविला जाईल.

(दोन) टाय ब्रेकर - सामाईक प्रवेश चाचणीमध्ये समान गुण असल्यास , परस्पर गुणवत्ता ठरविण्यासाठी पुढील प्रक्रिया अंगिकारली जाईल.

प्रथम स्तर - सामाईक प्रवेश चाचणी परिक्षेत जीवशास्त्रामध्ये जास्त गुण असणाऱ्या उमेदवारास पसंती दिली जाईल , जर टाय त्यानंतरही टीकुन राहील्यासः

द्वितीय स्तर - सामाईक प्रवेश चाचणी परिक्षेत रसायनशास्त्रामध्ये जास्त गुण असणाऱ्या उमेदवारास पसंती दिली जाईल , जर टाय त्यानंतरही टीकून राहील्यास :

तृतीय स्तर - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षेत सरासरी गुणांची टक्केवारी जास्त असणाऱ्या उमेदवारास पसंती दिली जाईल , जर टाय त्यानंतरही टीकून राहील्यास :

चतुर्थ स्तर - वय अधिक असलेल्या उमदेवारास कमी वय असलेल्या उमेदवाराच्या वर पसंती दिली जाईल.

(तीन) अनिवासी भारतीय गुणवत्ता परीगणनेची पद्धती- नियम ५ च्या पोट- नियम ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी गुणवत्ता यादी , अर्हताकारी परिक्षेच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार करण्यात येईल.

११. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) -

( एक) विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्था, या अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट- कलम (३ ) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप ) उमेदवारांना प्रवेश देईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खाली नमूद केल्याप्रमाणे असतील : -

(क) महाविद्यालयनिहाय, विषयानिहाय व प्रवर्गनिहाय जागांचे वाटप संकेतस्थळावर प्रदर्शित व प्रसिद्ध करणे;

(ख) पसंतीक्रम नमुना भरण्याच्या प्रक्रियेकरिता वेळापत्रक व ठिकाण संकेतस्थळावर प्रदर्शित वा प्रसिद्ध करणे;

(ग) पाठ्यक्रमांच्या प्रवेशाकरिता पसंतीक्रम नमुना दाखल करण्याची व समुपदेशनाच्या प्रक्रियेसाठी माहितीपुस्तिका प्रदर्शित वा प्रसिद्ध करणे;

(घ) पसंतीक्रम नमुना भरल्यानंतर पात्र उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी केंद्रात म्हणजेच मुंबई ,पुणे , औरंगाबाद, व नागपूर येथे प्रवेश प्रक्रियेकरिता यशस्वी उमेदवारांच्या पात्रतेच्या कागदपत्रांची पडताळणी व पृष्ठांकन;

भाग चार- ब- ३७०-२ १०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(ङ) सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) च्या प्रथम फेरीसाठी जागांचे वाटप आणि वाटप केल्याप्रमाणे संस्थेतील उमेदवारांचे विनिर्दिष्ट कालावधीतील प्रवेश संगणकीकृत प्रक्रियेद्वारे प्रदर्शित करणे किंवा प्रसिद्ध करणे , (च ) सामाईक प्रवेश प्रक्रियेची (कॅप ) प्रथम फेरी पूर्ण झाल्यानंतर जर जागा रिक्त राहिल्या तर, नंतरची संगणकीकृत फेरी (फेऱ्या ) प्रदर्शित करणे किंवा प्रसिद्ध करणे.

(दोन) प्रत्येक कॅप फेरीच्या शेवटी, उमेदवारांना, स्थान धारण अर्जाद्वारे, जागा धारण करण्याची संधी दिली जाईल. जर उमेदवाराने दिलेली जागा स्वीकारली असेल आणि जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेरीत सहभाग घ्यावयाची त्याची इच्छा नसेल तर , अशा उमेदवारास प्रवेशाच्या नंतरच्या फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही .

१२ . कॅपच्या वाटपाचे टप्पे व वाटपाची प्रक्रिया - कॅप अंतर्गत जागांचे वाटप पुढील रीतीने करण्यात येईलः- ( १ ) महाराष्ट्र राज्य उमेदवारी- संगणकीकृत वाटपाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेतः-

टप्पा एकः सर्व उमेदवारांसाठीः

(क) विविध प्रवर्गातील सर्व उमेदवारांचा परस्परांतील गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यासाठी विचार करण्यात येईल .

(ख ) अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा वाटपासाठी विचार करण्यात येईल आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागा वाटप करण्यासाठी संस्था ज्या अल्पसंख्याक समाजाची आहे त्या संबंधित अल्पसंख्याक समाजातील त्यांच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारे विचार करण्यात येईल.

(ग) मागास प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागावाटपासाठी विचार करण्यात येईल किंवा जर त्यांच्या गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील जागा उपलब्ध नसतील तर, त्यांच्या संबंधित आरक्षित प्रवर्गातील जागा वाटप करण्यात येईल.

(घ ) विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा वाटप करतांना विचार करण्यात येईल किंवा त्यांच्या गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसतील तर, इतर मागास प्रवर्गातील जागांसाठी विचार करण्यात येईल.

टप्पा दोनः मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांच्या संबंधित गटासाठी;

राखीव प्रवर्गाच्या न भरलेल्या जागांसाठी जर आवश्यक असेल तर प्रत्येक फेरीच्या शेवटी गुणवत्ता व राखीव प्रवर्गातील उमेदवारांची पसंती यानुसार राखीव प्रवर्गातील परस्परांतील गुणवत्ता कार्यान्वित करण्यात येईल. विविध राखीव प्रवर्गाच्या रिक्त राहीलेल्या जागा परस्पर गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे भरण्यात येतीलः-

(क) जेव्हा रिक्त जागा अस्तित्वात असतील तेव्हा त्या विशिष्ट प्रदेशातील त्यांच्या संबंधित गटाच्या उमेदवारांमधून परस्परांतील गुणवत्तेद्वारे उर्वरित रिक्त जागा भरल्या जातील. त्यांचे गट -

गट (एक)

(एक) अनुसुचित जाती व नवबौध्द म्हणून धर्मांतरीत झालेल्या अनुसुचित जाती (एस. सी. )

(दोन) अनुसुचित जमाती ( एस. टी. ) ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

गट (दोन)

(एक) विमुक्त जाती [ (डी टी) (अ) ]

(दोन) भटक्या जमाती [ एन टी (ब) ]

गट (तीन)

(एक) भटक्या जमाती [ एन टी (क) ]

(दोन) भटक्याजमाती [एन टी (ड) ]

(तीन) विशेष मागास प्रवर्गासह ( एस बी सी) इतर मागास वर्ग ( ओ बी सी)

(ख) तरीही जर जागा रिक्त राहिल्या तर जागा अशा प्रकारे भरण्यात येतील की-

( एक) जेथे रिक्त जागा अस्तित्वात आहेत तेथील विशिष्ट प्रदेशाच्या वर नमूद केलेल्या सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांमधून परस्परांतील गुणवत्तेनुसार भरण्यात येतील . जर अजुनही जागा रिक्त राहील्या, तर त्या जागा , (दोन) संबंधित प्रदेशाच्या सामान्य गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील. जर अजूनही जागा रिक्त राहिल्या तर त्या जागा,

(तीन) परस्परांतील राज्य गुणवत्तेनुसार सामाईक गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील.

(ग) उमेदवाराने मूळ अर्जात सांविधानिक आरक्षणाचा दावा करावयास हवा. मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांनी , पसंतीक्रम नमुना सादर करतेवेळी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यात कसूर केल्यास दावा केलेला प्रवर्ग देण्यात येणार नाही आणि अशा उमेदवारास सर्वसाधारण उमेदवार म्हणून समजण्यात येईल.

( घ) अनुसूचित जाती ( SC ) , अनुसूचित जमाती ( ST ) , विमुक्त जाती [ VJ/ DT ( A ) ] , भटक्या जमाती [ NT ( B ) ] , भटक्या जमाती [NT (C) ] , भटक्या जमाती [NT (D ) ] , विशेष मागास प्रवर्ग ( SBC) व इतर मागासवर्ग ( OBC ) उमेदवारांनी पसंतीक्रम नमुना सादर करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल ; त्यात कसूर केल्यास दावा केलेला प्रवर्ग मंजूर करण्यात येणार नाही , आणि अशा उमेदवारास सर्वसाधारण उमेदवार म्हणून समजण्यात येईल. तथापि, पसंतीक्रम नमुना सादर करण्याच्या दिनांकापर्यंत प्राधिकाऱ्यांमार्फत प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नसेल आणि जात वैधतेसाठी अर्ज केल्याचा पुरावा उमेदवारांकडे असल्यास त्याला किंवा तिला पंसतीक्रम नमुना भरण्यास परवानगी देण्यात येईल , परंतु, त्याला किंवा तिला असा अर्ज केल्याचा पुरावा सादर करावाच लागेल. अशा सर्व उमेदवारांना, समुपदेशनाच्या वेळी पुरविलेल्या प्रपत्रानुसार हमीपत्र सादर करावे लागेल. प्रलंबित दावा असताना अर्जदाराने घेतलेला प्रवेश , जर छाननी समितीने उक्त दावा अवैध ठरविला, तर रद्द करण्यात येईल.

(ङ) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र-

विमुक्त जाती [ VJ/ DT (A) ] , भटक्या जमाती [NT ( B )/ NT (C )/ NT (D) ] , इतर मागास प्रवर्ग ( OBC ) [ विशेष मागास प्रवर्गासह ( SBC ) ] या प्रवर्गातील उमेदवाराने सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) परिक्षेच्या पुढील वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र पसंतीक्रम नमुना भरतेवेळी सादर १२

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

करणे आवश्यक असेल यात कसुर केल्यास दावा केलेला प्रवर्ग मंजूर करण्यात येणार नाही . पसंतीक्रम नमुना भरतेवेळी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

(च) सर्व पाठ्यक्रमांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील . हे महिला आरक्षण , संबधित प्रवर्गाच्या राज्याच्या जागांमध्ये आणि ७० टक्के प्रादेशिक जागांमध्ये देण्यात येईल . आवश्यक संख्येतील जर महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाही तर या जागा संबधित प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांना देण्यात येतील.

टप्पा तीनः सर्व मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी,

जर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांच्या गटासाठी राखीव असलेली जागा रिक्त राहीली तर अशी जागा एकत्रित केलेल्या सर्व मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांच्या परस्परातील गुणवत्तेनुसार उमेदवारास वाटप करण्याकरिता विचारात घेण्यात येईल.

टप्पा चारः जर मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेली जागा रिक्त राहीली तर अशी जागा परस्परातील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण उमेदवारांना वाटप करण्यासाठी विचारात घेण्यात येईल.

( २ ) अल्पसंख्याक उमेदवारी - अल्पसंख्याक उमेदवारी संगणकीकृत वाटपाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेतः - (क ) अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्परातील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा वाटपासाठी विचार करण्यात येईल आणि ज्या अल्पसंख्याक समाजाची संस्था आहे त्या संबंधित अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तेच्या आधारे अल्पसंख्याक कोट्यातील जागा वाटप करतांना विचारात घेण्यात येईल .

(ख ) गुणवत्तेनुसार भरण्यात आलेल्या अल्पसंख्याक प्रवर्गाच्या जागांसाठी , आवश्यक असल्यास, प्रत्येक फेरीच्या शेवटी परस्परातील गुणवत्तेनुसार अल्पसंख्याक जागा भरण्यात येतील.

(ग ) विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थापैकी ज्यांना राज्य शासनाने " अल्पसंख्याक संस्था" म्हणून घोषित केलेले आहे , अशा संस्थेतील एकूण जागांचे वितरण अनुसूचि मध्ये नमूद केल्याप्रमाणे करण्यात येईल .

१३. केंद्रीभुत प्रवेशप्रक्रियेच्या फेरीद्वारे निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत उमेदवारांना प्रवेश देईल: - विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था, (क) उमेदवारांनी दिलेल्या पसंतीक्रमाच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल. केवळ मर्यादित गुणवत्ताप्राप्त उमेदवारांनाच समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल व पसंती नमुना भरण्यास सांगण्यात येईल. समुपदेशन सत्राचा हेतू तात्काळ जागा वाटप करणे हा नाही. विविध अभ्यासक्रम व संस्था यांसाठी त्यांची पसंती वापरण्याकरिता ह्या सत्रांमध्ये मदत करण्यात येते. जागांचे वाटप , नीटची गुणवत्ता यादी , पात्रता व उमेदवारांनी दिलेले पसंतीक्रम यांच्या आधारे नंतरच्या दिनांकाला केंद्रीभुतपणे जागा वाटप करण्यात येईल.

(ख) पसंतीक्रमाचा नमुना सक्षम प्राधिकाऱ्याने अधिसुचित केल्याप्रमाणे दस्तऐवज पडताळणी केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध असेल. योग्यरीत्या भरलेला पसंतीक्रमाचा नमुना त्याच कार्यालयात सादर करावा. उमेदवाराने केवळ एकच पसंतीक्रमाचा नमुना सादर करावा. एकापेक्षा अधिक नमुने सादर केल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

( ग) रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार उमेदवारांच्या एकापेक्षा अधिक निवड फेऱ्या घेण्यात येतील. उमेदवारांची गुणवत्ता आणि त्यांनी त्याच्या पसंतीक्रमाच्या नमुन्यात सादर केलेले पसंतीक्रम या आधारे निवड करण्यात येईल. पहिल्या किंवा नंतरच्या फेरीकरता उमेदवारांकडुन कोणताही स्वतंत्र पसंतीक्रमाचा नमुना भरला जाणार नाही . उमेदवारांच्या पडताळणी नंतर अभिलेखात/ विदेत (डेटा) दाखल केलेला पाठ्यक्रमांचा व महाविद्यालयांचा पसंतीक्रम अंतिम असेल व तो अपरिवर्तनीय असेल . ही अंतिम विदा (डेटा) केवळ त्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्ष पाठ्यक्रमांच्या प्रवेशाच्या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये वापरण्यात येईल.

( घ) निवडीच्या प्रत्येक फेरीमध्ये राज्य गुणवत्ता यादीतील क्रमांक- एक पासून पुढे सामाईक प्रवेश चाचणीची गुणवत्ता यादी कार्यान्वीत केली जाईल. आधीच्या फेरीत निवड झालेल्या उमेदवाराचा पुढील फेरीमधील अधिक चांगल्या पसंतीक्रमासाठी विचार करण्यात येईल. येथे अधिक चांगला पसंतीक्रम (बेटरमेन्ट) याचा अर्थ, उमेदवाराने वापरलेला उच्च पसंतीक्रम, असा आहे. ज्यांनी स्थितीधारणा नमुना ( Status retention form ) भरला आहे , त्याखेरीज अन्य उमेदवारांना असा अधिक चांगला पसंतीक्रम ( betterment) बदलणे सक्तीचे व अनिवार्य असेल. अशा उमेदवाराचा केवळ त्याच शैक्षणिक वर्षाच्या निवड प्रक्रियेच्या कोणत्याही नंतरच्या फेरीसाठी विचार केला जाणार नाही. स्थितीधारणा नमुना ( Status retention form ) भरण्याचा अंतिम दिनांक, प्रत्येक केंद्रिभुत प्रवेश प्रक्रिया फेरीच्या निवड यादी सोबत अधिसूचित करण्यात येईल.

(ङ) पहिली फेरी समाप्त झाल्यानंतर, आधीच्या फेरीत ज्या उमेदवारांना जागा वाटप केले आहे आणि ज्यांनी पाठ्यक्रम स्वीकारला आहे, तसेच ज्या उमेदवारांना कोणत्याही जागेचे वाटप करण्यात आले नाही असे उमेदवार , पुढील फेऱ्यांसाठी पात्र असतील. ज्या उमेदवारांना याआधीच जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत अशा उमेदवारांना अधिक चांगल्या पसंतीक्रमाची संधी देण्यात येईल.

(च ) याद्वारे असे विस्तृतपणे स्पष्ट करण्यात येते की, एखाद्या उमेदवाराने, कोणत्याही फेरीमध्ये दिलेल्या अधिक चांगल्या पसंतीमुळे होणारा बदल , जर असा उमेदवार नंतरच्या फेरीत पाठ्यक्रम बदलण्यासाठी किंवा महाविद्यालय बदलण्यासाठी पात्र असल्याचे आढळून आला असेल , तरच केवळ अंमलात येईल. पुढील फेऱ्यांमध्ये त्याच महाविद्यालयात आणि/ किंवा त्याच पाठ्यक्रमात जागा उपलब्ध असल्यामुळे प्रवर्ग बदलाची केवळ संभाव्यता ही , अशी प्रकारची अधिक चांगला पसंतीक्रमासारखा असणार नाही आणि म्हणून , अशाप्रसंगी कोणताही बदल अंमलात येणार नाही. " प्रवर्गातील बदल " यामध्ये इतर गोष्टीबरोबर राखीव प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात किंवा खुल्या प्रवर्गातून राखीव प्रवर्गातील बदलाचा समावेश असेल. ज्यांनी स्थितीधारणा नमुना (स्टेटस रिटेन्शन फॉर्म ) भरलेला आहे अशा उमेदवारांव्यतिरिक्त, असा अधिक चांगला पसंतीक्रमातील बदल हा , सक्तीचा व अनिवार्य असेल.

(छ) दिलेल्या पसंतीक्रमाच्या आधारे गुणवत्तेच्या आधारावर जागेचे वाटप करण्यात येईल आणि केलेले वाटप संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

भाग चार-ब- ३७०-३ १४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

( ज) उमेदवारांनी जागावाटपानुसार संपूर्ण मुळ प्रमाणपत्रे व सर्व आवश्यक दस्ताऐवजांच्या साक्षांकित छायाप्रतींचा एक संच यासह विहित केलेल्या कालावधीत जागा वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित रहावे. प्रवेश अंतिम करण्यापूर्वी, अधिष्ठाता/प्राचार्य संपूर्ण मुळ कागदपत्रांची पडताळणी करतील .

(झ) कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या जागा भरताना, प्रथम ३० टक्के राज्य कोट्यातील जागा भरण्यात येतील , व त्यानंतर ७० टक्के प्रादेशिक कोट्याच्या जागा भरण्यात येतील.

(ञ) राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखून ठेवणे- खुल्या प्रवर्गातील जागेसाठी गुणवत्तेच्या आधारावर प्रवेशास हक्कदार असलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारास एकतर त्याच्या संबंधित प्रवर्गाच्या जागेनुसार किंवा खुल्या प्रवर्गातील जागेवर प्रवेश घेण्याचा पर्याय खुला असेल. जर त्याने राखीव प्रवर्गाचा पर्याय स्वीकारला तर त्यास राखीव प्रवर्गातील उमेदवार म्हणून नव्हे तर खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून प्रवेश देण्यात आला असल्याचे मानण्यात येईल. अशा प्रकरणी तो उमेदवार ज्या महाविद्यालयात खुल्या जागेवर प्रवेशासाठी पात्र असेल त्या महाविद्यालयातील जागा विशिष्ट राखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात येईल. समुपदेशन करताना राखून ठेवलेली जागा त्याच प्रवर्गातील नंतरच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारास गुणवत्तेनुसार तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.

( ट) ज्याची निवड झाली आहे परंतु जो महाविद्यालयात रुजु झाला नसेल किंवा रुजु झाल्यानंतर प्रवेश रद्द केला असेल असा उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही .

(ठ) पहिल्या फेरीनंतर ज्या जागा रिक्त असतील किंवा रिक्त राहत असतील अशा जागा अगोदर सादर केलेल्या पसंतीक्रम नमुन्याच्या आधारावर निवडीच्या दुसऱ्या फेरीत उपलब्ध करून देण्यात येतील. नंतरच्या कोणत्याही फेऱ्यांसाठी कोणताही नवीन पसंतीक्रम नमुना भरण्याची आवश्यकता असणार नाही . पुढील फेरीच्या प्रारंभापूर्वी संकेतस्थळावर रिक्त जागांची स्थिती उपलब्ध करण्यात येईल.

( ड) प्रत्येक फेरीच्या शेवटी, आवश्यकता असेल तर , नियम १२ ( १ ) अनुसार प्रवर्गामधील रिक्त राहिलेल्या उर्वरित जागांसाठी परस्पर फेरी ( inter - se - round) घेण्यात येईल.

(ढ) पाठ्यक्रमांचा अंतिम ( कटऑफ) दिनांक संबंधिक केंद्रीय परिषदेने वेळोवेळी विहित केल्याप्रमाणे असेल .

१४. प्रवेशासाठी अपात्रता - निवड झालेल्या ज्या उमेदवारांनी संबंधित पाठ्यक्रमाच्या अंतिम (कट-ऑफ) दिनांकानंतर त्यांचा प्रवेश रद्द केला असेल , ते उमेदवार पुढील दोन वर्षासाठी सीईटी परिक्षेस बसण्याकरिता पात्र असणार नाहीत.

१५. शुल्क प्रदान करणे - पाठ्यक्रमांचे शुल्क लागू असेल त्याप्रमाणे , महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा प्राचार्य यांच्या नावाने कोणत्याही राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित वाणीज्यिक बँकेच्या धनाकर्षाद्वारे संबंधित महाविद्यालयात भरण्यात येईल .

(क) महाविद्यालय किंवा पाठ्यक्रम बदलल्यानंतर किंवा प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत करणे : ज्या उमेदवाराला प्रवेश देण्यात आला आहे आणि जो प्रवेश रद्द करू इच्छित आहे असा उमेदवार प्रवेश रद्द करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे किंवा संस्थेकडे अर्ज सादर करील. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अशा उमेदवाराचे शुल्क पुढील वजावटीनंतर परत करण्यात येईल .

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

( एक) केंद्रिय परिषदेने घोषित केलेल्या अंतिम दिनांकापुर्वी (कट- ऑफ-डेट) - रुपये १५०० /- (एक हजार पाचशे फक्त) वजा करुन उर्वरित शुल्क परत करण्यात येईल ;

(दोन) संबंधित केंद्रिय परिषदेने घोषित केल्याप्रमाणे अंतिम दिनांकास ( कट- ऑफ- डेट) किंवा त्यानंतर कोणतेही शुल्क परत केले जाणार नाही .

(तीन) महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा प्राचार्य उमेदवाराकडुन प्रवेश रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शुल्क परत करण्यास जबाबदार असेल. जर प्रवेशाच्या दिनांकापासुन ९ ० दिवसांच्या आत उमेदवाराचा मृत्यु झाला असेल किंवा तो अवैध ठरला असेल तर, कोणतीही रक्कम वजा केली जाणार नाही .

१६. संस्थास्तरीय फेरी - केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेच्या सर्व फेऱ्यानंतर जागा रिक्त राहत असतील तर उक्त जागा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व मान्यतेने संस्थास्तरीय फेरीव्दारे संस्थेकडुन भरण्यात येतील. ज्या उमेदवारांना सामाईक परिक्षा चाचणीत ( सीईटी) पात्र असल्याचे घोषित करण्यात आले आहे अशा इच्छुक उमेदवारांकडुन संस्थेद्वारे अर्ज मागविण्यात येतील. सक्षम प्राधिकाऱ्याच्या निदेशानुसार, सामाईक परिक्षा चाचणीत ( सीईटी) परस्पर गुणवत्तेच्या आधारावर संस्थेव्दारे काटेकोरपणे प्रवेश देण्यात येईल.

१७. प्रवेश रद्द करणे - निवड झालेल्या उमेदवाराने ज्या महाविद्यालयात त्याची किंवा तिची निवड झाली आहे तेथे सक्षम प्राधिकाऱ्याव्दारे विहित केलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी रुजू झाले पाहिजे, त्यात निष्फळ ठरल्यास , त्याचा/ तिचा प्रवेश रद्द होईल . निवड झालेला जो उमेदवार महाविद्यालयात दाखल झाला आहे व ज्याची प्रवेश रद्द करायची इच्छा आहे, त्या उमेदवाराने त्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश रद्द करावा. महाविद्यालय प्रवेश रद्द केल्याचे पत्र स्वीकारील आणि प्रवेश रद्द केल्याच्या पत्राच्या प्रतीसह तात्काळ सक्षम प्राधिकाऱ्याला कळविल.

१८ . गुणवत्ता यादी व प्रवेशित उमेदवारांच्या यादीस मान्यता -

(१ ) प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमाच्या कलम ९ च्या पोट कलम ( ५ ) नुसार, यथास्थिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास अथवा आयुष संचालनालयास आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाला प्रवेश मान्यता प्रस्ताव सादर करील.

( २ ) प्रवेश मान्यता प्रस्तावामध्ये आरक्षण अंतर्गत प्रवेश घेतलेल्या सर्व उमेदवारांची यादी , अर्हता परीक्षेतील गुण, इत्यादी तसेच ज्यांनी अर्ज केला आहे त्या उमेदवारांची यादी आणि संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची यादी यांसह आवश्यक कागदपत्रे यांचा अंतर्भाव असेल .

१९. वर्तणूक व शिस्त -

(क) अर्जामध्ये पूर्ण व अचूक माहिती भरण्यांमध्ये उमेदवाराने कसूर केली अथवा कोणतीही माहिती लपविली असल्यास असा उमेदवार नंतरच्या तारखेस देखील अपात्र ठरवण्यात येईल . अशा उमेदवारास संपूर्ण निवड प्रक्रियेमधून प्रतिरोधित करण्यात येईल.

भाग चार- ब- ३७०-३अ १६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

(ख ) योग्य कागदपत्रे सादर करणे ही प्रत्येक उमेदवाराची जबाबदारी आहे . जी खरी नाही अशी कागदपत्र सादर करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास सक्षम प्रधिकाऱ्याकडुन किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडुन महाविद्यालयातील उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल , उमेदवाराची अनामत रक्कम सरकार जमा करण्यात येतील व उमेदवाराचे निष्कासन करण्यात येईल. अशा उमेदवाराचे नाव / उमेदवारांची नावे राज्य गुणवत्ता यादीमधुन वगळण्यात येईल / येतील आणि तो किंवा ती निवड प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांकरिता पात्र असणार नाही आणि त्याला / तिला निवड प्रक्रियेमधून प्रतिरोधित करण्यात येईल.

(ग ) आरोग्य विज्ञान पाठ्यक्रमामध्ये शिकत असताना विद्यार्थी , जर कोणत्याही प्रकारची राष्ट्रविघातक कृत्ये, बेकायदेशीर कृत्ये किंवा शासनाद्वारे अधिनियमाच्या व कायद्याच्या तरतुदी विरूद्ध रॅगिंग करताना आढळून आला तर महाविद्यालयाच्या अधिष्ठातांद्वारे किंवा प्राचार्यांद्वारे महाविद्यालयामधून काढून टाकण्यास पात्र असेल.

( घ) रिट याचिका (दिवाणी ) क्र. ६५६/१ ९९९ मध्ये भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने मानव संसाधन विकास मंत्रालय , भारत सरकार यांना रॅगिंगच्या संकटाला पायबंद घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे आणि अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांविरूद्व कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

(ङ) " महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम , १ ९९९ , " ( १ ९९९ चा ३३ ) याच्या तरतुदीनुसार रॅगिंगमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी या अधिनियमाखालील शिक्षेस पात्र असतील.

( च) वरील मुद्दयांच्या संबंधात उद्भवलेल्या विवादाच्या बाबतीत, सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे कार्यवाही करण्यात येईल.

अनुसूची

अ.क्र.

संस्थेचा प्रकार

(१)

(२)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे

भरावयाच्या जागांची टक्केवारी

(३)

संस्थात्मक कोटा (अनिवासी भारतीय कोट्यासह) (४) १.

८५%

१५% विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (अल्पसंख्याक संस्था वगळून)

१५% २ . विनाअनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था

८५ % अल्पसंख्याक समुदायासाठी , तथापि न भरलेल्या जागा ह्या अल्पसंख्याक नसलेल्या उमेदवारांमधून भरण्यात येतील .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

सुरेन्द्र प्र. चानकर,

शासनाचे उप सचिव.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग

मंत्रालय , गो.ते. रुग्णालय आवार इमारत , ९ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक ७ सप्टेंबर २०२०.

अधिसूचना

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५.

क्रमांक एमईडी -१०२० /प्र.क्र. ४४/२०/शिक्षण-२ .- महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम , २०१५ ( २०१५ चा महा. २८ ) याच्या कलम २३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे , महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक, शैक्षणिक संस्थांमधील प्रथम वर्षाच्या पूर्णवेळ आयुर्वेद , युनानी , समचिकित्सा , भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स आणि परिचर्या पदवीपूर्व पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यासायिक शैक्षणिक संस्था ( पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, भौतिकोपचार , व्यवसायोपचार , स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) नियम, २०१६ यामध्ये सुधारणा करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करीत आहे: - १. या नियमांस महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, भौतिकोपचार , व्यवसायोपचार, स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) ( सुधारणा) नियम, २०२० असे म्हणावे.

२. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी , समचिकित्सा , भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमाच्या प्रवेशाचे विनियमन ) नियम , २०१६ ( यात यापुढे ज्याचा निर्देश "मुख्य नियम " असा केला आहे. ) याच्या नियम ९ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल: -

" ९ . जागांचे वितरण - सक्षम प्राधिकाऱ्याकडून जागांचे वाटप करण्यात येईल .

(एक) सक्षम प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व जागा , राज्यातील सर्व उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील आणि या जागा राष्ट्रीय पात्रता-नि-प्रवेश परीक्षेच्या (नीटच्या) गुणवत्ता यादीच्या आधारावर भरण्यात येतील . याबाबतीत प्रचलित असलेल्या नियमानुसार या जागांमध्ये संविधानात्मक व महिला आरक्षण असेल;

( दोन ) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत खाजगी विनाअनुदानित संस्थेमधील सदर पाठ्यक्रमांची निवड ही , ( १ ) भारत सरकार; ( २ ) केंद्रीय परिषद; (३ ) महाराष्ट्र शासन; ( ४ ) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची परवानगी किंवा मान्यता किंवा संलग्नता यांच्या अधीन असेल. एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची " प्रवेश क्षमता " ही, उपरोक्त प्राधिकरणांनी परवानगी दिलेल्या "किमान जागांच्या संख्ये " इतकी असेल;

( तीन) महाराष्ट्र खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती -विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग यांच्या प्रवेशासाठी जागांचे आरक्षण) अधिनियम, २००६ १८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१ / अग्रहायण १३ , शके १९ ४३

(सन २००६ चा महा. ३० ) नुसार, विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्थाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा सांविधानिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांसाठी वाटप करण्यात येतील. "

३. मुख्य नियमाच्या नियम १२ मध्ये, पोट- नियम ( १ ) मधील खंड (च) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल: - " (च) सक्षम प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पाठ्यक्रमातील ३० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील. जर आवश्यक संख्येइतक्या महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर , या जागा संबंधित प्रवर्गाच्या पुरूष उमेदवारांना देण्यात येतील. "

४. मुख्य नियमाच्या नियम १३ मधील , खंड (झ) वगळण्यात येईल .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १ ९ ४३

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग

गो. ते. रुग्णालय आवार , ९ वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक १३ ऑक्टोबर , २०२० .

अधिसूचना

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५.

क्रमांक एमईडी-१०१६/प्र.क्र.६ ९/१६/शिक्षण-२. - महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम, २०१५ ( २०१५ चा महा. २८ ) याच्या कलम २३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे , महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी , समचिकित्सा, भौतिकोपचार, व्यवसायोपचार , स्पीच थेरपी, प्रोस्थेटीक व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन ) नियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे: -

१. संक्षिप्त नाव या नियमांस महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी , समचिकित्सा, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन ) ( दुसरी सुधारणा) नियम , २०२० असे म्हणावे.

२. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी, प्रोस्थेटीक व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन ) नियम , २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश "मुख्य नियम " असा केला आहे. ) याच्या नियम ५ मध्ये पोट- नियम ( ३ ) नंतर, पुढील नियम जादा दाखल करण्यात येईल: -

"(४ ) भारताचे समुद्रपार नागरीक (ओसीआय) उमेदवारी - जो उमेदवार, नियम २ च्या पोट -कलम ( १ ) च्या खंड (त) मध्ये व्याख्या केलेल्या शर्तीची पूर्तता करतो असा उमेदवार या प्रवर्गाखाली पात्र असेल" .

३. मुख्य नियमाच्या नियम ८ मधील पोट नियम (३ ) , ऐवजी, पुढीलप्रमाणे दाखल करण्यात येईल: - "(३) संस्थात्मक कोट्यातील जागा - जे उमेदवार राष्ट्रीय पात्रता-नि-प्रवेश परीक्षेला बसलेले होते आणि व्यावसायिक पदवीपूर्व आयुर्वेद, युनानी , समचिकित्सा, भौतिकोपचार, व्यवसायोपचार , स्पीच थेरपी , प्रोस्थेटीक व ऑर्थोटिक्स आणि परिचर्या पाठ्यक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र म्हणून घोषित केलेले होते अशा अनिवासी भारतीय व भारताचे समुद्रपार नागरिक यांसह पात्र उमेदवारांना, अखिल भारतीय स्तरावर , अनुसूचीनुसार मंजूर केलेल्या प्रवेश क्षमतेच्या १५ % जागांवर, संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांमधून परस्परांतील गुणवत्तेनुसार प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून , संस्था प्रवेश देऊ शकेल".

२०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ४ , २०२१/ अग्रहायण १३ , शके १९ ४३

४. मुख्य नियमांस जोडलेल्या अनुसूचीमधील, स्तंभ (४ ) " अनिवासी भारतीय कोट्यासह" या मजकुराऐवजी " अनिवासी भारतीय व भारताचे समुद्रपार नागरिक यासह" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.