RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
सोमवार , डिसेंबर ६ , २०२१/ अग्रहायण १५ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १८ ( २ )]
[पृष्ठे ४ , किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे
१-४ सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५. - मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिक अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम , १९ ६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.
नगर विकास विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ डिसेंबर २०२१ .
MAHARASHTRA ORDINANCE No. XV OF 2021 .
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT , THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT AND THE MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ .
मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ यांमध्ये आणखी सुधारणा
करण्याकरिता अध्यादेश.
ज्याअर्थी , राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
(१)
भाग चार-३२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , डिसेंबर ६ , २०२१ / अग्रहायण १५ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका १८८८ चा ३ .
१९ ४९ चा अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ यांमध्ये आणखी ५९. सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती १ ९ ६५ चा
महा . ४० .
अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी , आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत: -
प्रकरण एक
प्रारंभिक
संक्षिप्त नाव व १. ( १ ) या अध्यादेशास , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , प्रारंभ.
नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२१ , असे म्हणावे.
( २ ) तो , तात्काळ अंमलात येईल .
प्रकरण दोन
मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा
सन १८८८ चा २. मुंबई महानगरपालिका अधिनियम ( यात यापुढे, या प्रकरणात ज्याचा निर्देश " मुंबई महानगरपालिका १८८८ चा ३ .
अधिनियम क्रमांक अधिनियम " असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ५ ब च्या पहिल्या परंतुकामध्ये , " मुंबई महानगरपालिका , २०१८ चा ३ याच्या कलम
महा . २१ .
५ ब ची सुधारणा
महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा ) अधिनियम , . २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या " या मजकुराऐवजी, " मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी २०२१ चा (दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी महा. अध्या . संपणाऱ्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल. १५.
सन १८८८ चा ३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७ च्या मध्ये पोट- कलम (२ अ ) च्या पहिल्या परंतुकामध्ये, " मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी २०१८ चा अधिनियम क्रमांक
महा . २१ .
याच्या कलम ( सुधारणा ) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या " ३
३७ ची सुधारणा. या मजकुराऐवजी, " मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व २०२१ चा औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर महा . अध्या . २०२२ रोजी संपणाऱ्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल . १५.
प्रकरण तीन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा
सन १९ ४९ चा
१ ९ ४ ९ चा ४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे , या प्रकरणात ज्याचा निर्देश " महाराष्ट्र महानगरपालिका , अधिनियम क्रमांक अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५ब च्या पहिल्या परंतुकामध्ये , " मुंबई महानगरपालिका , ५९ .
५९ याच्या कलम
महा . २१ .
५ ब ची सुधारणा.
महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अधिनियम , २०१८ चा २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या " या मजकुराऐवजी , " मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी २०२१ चा (दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी महा. अध्या. १५.
संपणाऱ्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर ६ , २०२१/ अग्रहायण १५ , शके १ ९ ४३
अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम सन १९ ४ ९ चा
१९ ची सुधारणा.
५. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १ ९ च्या पोट - कलम ( १ ब ) च्या पहिल्या परंतुकामध्ये , २०१८ चा " मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी महा. २१. ( सुधारणा) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या " २०२१ चा या मजकुराऐवजी, " मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व . अध्या. औद्योगिक नगरी ( दुसरी सुधारणा) अध्यादेश , २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर महा १५.
२०२२ रोजी संपणाऱ्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल .
प्रकरण चार
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी
अधिनियम, १ ९ ६५ याची सुधारणा
१९ ६५ चा ६. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ ( यात यापुढे , या प्रकरणात सन १९ ६५ चा
महाराष्ट्र अधिनियम ज्याचा निर्देश " नगरपरिषदा अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ९अ च्या पहिल्या परंतुकामध्ये, महा . ४०.
" मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी २०१८ चा
क्रमांक ४० याच्या कलम ९अ ची महा. २१. ( सुधारणा ) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या "
सुधारणा.
२०२१ चा या मजकुराऐवजी , " मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व महा . अध्या. औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर १५.
२०२२ रोजी संपणाऱ्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
२०१८ चा
७. नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ५१-१ब च्या पहिल्या परंतुकामध्ये, " मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महा . २१. महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा ) अधिनियम, २०१८ याच्या
सन १९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५१-१ ब ची प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०१ ९ रोजी संपणाऱ्या " या मजकुराऐवजी, " मुंबई महानगरपालिका, चा महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( दुसरी सुधारणा) अध्यादेश ,
सुधारणा.
२०२१ महा. अध्या . २०२१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणाऱ्या " हा मजकूर दाखल १५.
करण्यात येईल.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , डिसेंबर ६ , २०२१ / अग्रहायण १५ , शके १ ९ ४३
निवेदन
मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३ ) याचे कलम ५ ब, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१ ९ ४ ९ चा ५ ९ ) याचे कलम ५ ब आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) याचे कलम ९अ यांमध्ये अशी तरतूद आहे की, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महा . २३ ) आणि त्याखाली केलेले नियम , यांच्या तरतुदींनुसार अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती किंवा , यथास्थिति , नागरिकांचा मागासवर्ग यांतील व्यक्तींकरिता राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढवू इच्छिणारी प्रत्येक व्यक्ती , नामनिर्देशनपत्रासोबत , सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातप्रमाणपत्र आणि जातपडताळणी समितीने निर्गमित केलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील.
२. उक्त कलमांमध्ये सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ आणि सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६५ यांद्वारे सुधारणा करण्यात आली आहे . उक्त उमेदवाराला , वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत जात पडताळणी समितीकडे त्याने दाखल केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा जातपडताळणी समितीकडे असा अर्ज केल्याबाबतचा इतर कोणत्याही पुराव्याची सत्य प्रत ; आणि जातपडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र , त्याच्या निवडणुकीच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीच्या आत, तो सादर करील , अशा आशयाचे हमीपत्र , राखीव जागेच्या निवडणुकीसाठीच्या नामनिर्देश पत्रांसोबत सादर करण्याची परवानगी आहे . सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ द्वारे केलेल्या सुधारणेनुसार अशा तरतुदी दिनांक ३० जून २०१ ९ पर्यंत लागू आहेत.
३. हे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कामामुळे जातपडताळणी समितीच्या कामात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्याच्या परिणामी , जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात उमेदवारांना अडचणी येतात . संबंधित नगरपालिका कायद्याच्या तरतुदी लक्षात घेता, जर निवडून आलेल्या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीच्या आत , जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केली तर त्याची निवड, भूतलक्षीप्रभावाने समाप्त होते आणि तसेच तो, ते पद धारण करण्यासाठीदेखील अपात्र ठरेल.
४. निवडून आलेल्या ज्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र यापूर्वीच प्राप्त केले आहे अशा उमेदवारांनी सादर केलेल्या हमीपत्रानुसार जातपडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही केवळ एवढ्याच कारणावरून सदर उमेदवार अपात्र ठरणार नाहीत , याची सुनिश्चिती करण्याकरिता अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणाऱ्या कालावधीपर्यंत निवडून आलेल्या उमेदवारांना असे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ देण्याकरिता तरतूद करणे इष्ट वाटते. यादृष्टीने, मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) याचे कलमे ५ ब व ३७ , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९ ४९ चा ५९ ) याचे कलम ५ ब व १ ९ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा . ४० ) याचे कलम ९अ व ५१-१ब यांमध्ये योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.
५. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी , मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१ ९ ४ ९ चा ५ ९ ) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे , आणि , म्हणून , हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे .
मुंबई,
भगत सिंह कोश्यारी,
दिनांक ५ डिसेंबर २०२१ .
महाराष्ट्राचे राज्यपाल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महेश पाठक,
शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .