Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex.86) (Dated the 7th December 2021) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र.१ उरण यांजकडून अधिसूचना क्रमांक भूसंपदन/कात-१/सीआर/30/2021

Published 07 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ७ , अंक ५९ ]

मंगळवार, डिसेंबर ७ , २०२१/ अग्रहायण १६ , शके १ ९ ४३ [ पृष्ठे २ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८६

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) , मेट्रो सेंटर क्र. १ उरण यांजकडून

अधिसूचना

भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१ ) नुसार अधिसूचना

क्रमांक भूसंपदन/ कात-१/ सीआर / ३० / २०२१ . ज्याअर्थी , महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाची अधिसूचना क्रमांक मिस / ११ / २०१४ /सीआर/७७ / अ २ दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यास यापुढे सदर अधिसूचना असे संबोधले जाईल ) भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ३ पोट- कलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून असे अधिसूचित केले आहे की , सदर अधिनियमाच्या कलम ३ ( झअ ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.

त्याअर्थी, सदर अधिसूचने अन्वये जिल्हाधिकारी , रायगड हे समुचित शासन आहे. त्याअर्थी , परिशिष्ट १ मध्ये नमूद जमीन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यक आहे किंवा आवश्यकता भासू शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट , २ मध्ये करण्यात आले आहे . त्याअर्थी सदर कायद्याचा कलम ११ उप - कलम ( १ ) अन्वये अधिसूचित करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमीन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते ;

त्याअर्थी, परिशिष्ट-३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटूंबासाठी प्रस्तावित जमीन संपादनाची माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे ; आणि त्याअर्थी , परिशिष्ट-४ मध्ये सामाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे ;

आणि त्याअर्थी, परिशिष्ट -५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उप- कलम ( १ ) अन्वये कामकाज पार पाडणाऱ्या प्रशासकाचा तपशील देण्यात आला आहे ;

त्याअर्थी , सदर कायद्याच्या कलम ११ उप- कलम ( ४ ) अन्वये असे जाहीर करण्यात येते की, सदरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पूर्ण होईल अशा वेळेपर्यंत कोणतीही व्यवहार / हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार / हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही :

परंतु जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट -कलमाच्या अंमलबजावणीतून अशा जमीन मालकास सूट देऊ शकेल परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्याद्वारे भरपाई करण्यात येणार नाही ;

सदर कायद्याच्या कलम ११ चे उप - कलम ( ५ ) व भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ चे कलम १० उप- नियम ( ३ ) अन्वये जिल्हाधिकारी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे भूमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल.

(१)

भाग एक (को.वि.पु . ) -८६-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०२१/ अग्रहायण १६, शके १ ९ ४३ आणि ज्याअर्थी , सदर कायद्याचे कलम ३ उप- कलम (ग ) अन्वये जिल्हाधिकारी , रायगड हे समुचित शासन असल्याने उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) , मेट्रो सेंटर क्र. १ उरण यांच्या वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत करीत आहे.

परिशिष्ट १

गावाचे नाव पिसार्वे, ता. पनवेल, जि. रायगड

स.नं.

क्षेत्र

अ.क्र.

१

१२९ /१

एकूण

परिशिष्ट २

प्रकल्पाचे नाव: - लागू नाही

प्रकल्पाचे विवरण: - लागू नाही

सामाजिक फायदे: - रेल्वे क्रॉसिंग पूल

परिशिष्ट ३

पुनर्वसनविषयक बाबीचे विवरण

गावाचे नाव पिसार्वे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

अ.क्र.

ग.नं. /स.नं क्षेत्र (हे.आर)

लागू नाही

परिशिष्ट ४

सामाजिक आघात निर्धारण अहवालाचा गोषवारा: - लागू नाही.

परिशिष्ट ५

प्रशासक नियुक्तीचे विवरण

(१ ) प्रशासकाचे पदनाम:- लागू नाही.

(२ ) प्रशासकाच्या कार्यालयीन पत्ता: - लागू नाही.

(३ ) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमूद करावे लागू नाही .

सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उप - कलम ( १ ) खाली अधिसूचित करण्यात आले आहे . प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र . १ उरण यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल .

नोट: - प्रस्तुत जमिनीचा नकाशा पाहणीसाठी उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) मेट्रो सेंटर क्र . १ उरण यांचे कार्यालयात उपलब्ध आहे .

दत्तात्रय नवले , उरण ,

दिनांक ३ डिसेंबर २०२१ .

उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) , मेट्रो सेंटर क्र. १ , उरण.

BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , ON RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.