RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १५३] शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३७६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)अधिनियम,२०१५
शासनाने के लेले नियम मराठी राजभाषेमध्ये या(cid:४६२)ारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
मंत्रालय, गो. ते. रूग्णालय आवार, ९ वा मजला,लोकमान्य टिळक मार्ग, मु ंबई ४०० ००१, दिनांक ११ एप्रिल २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५.
क्रमांक सीईटी .१२१५ /प्र.क्र.४१२ /१५ /शिक्षण -२.— महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. २८) यांच्या कलम २३ द्वारे प्रदान के लेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थामधील पुर्णवेळ व्यावसायिक वैद्यकीय पदव्युत्तर पा(cid:५०४)क्रमांच्या व दंतवैद्यक पदव्युत्तर पा(cid:५०४)क्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत : —
१. संक्षिप्त नांव व प्रारंभ.— (१) या नियमास, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यक पा(cid:५०४)क्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) नियम २०१६ असे म्हणावे.
(२) ते राजपत्रात प्रसिद्ध के ल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. व्याख्या :- (१) या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,—
(क) " अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ (२०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८) ; असा आहे
(ख) " प्रवेश उपस्थिती संस्था " याचा अर्थ, ज्या संस्थेत कागदपत्रे सादर करून आणि विहित शुल्क प्रदान करून उमेदवार प्रवेश निश्चित करण्यासाठी उपस्थित राहील अशी संस्था, असा आहे ;
(ग) " अर्ज " याचा अर्थ , खंड (च ) मध्ये व्याख्या के ल्याप्रमाणे पा(cid:५०४)क्रमांच्या प्रवेशासाठी उमेदवाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरावयाचा विहित नमुना, असा आहे ;
भाग चार-ब-३७६-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ (घ) " कें द्रीभूत प्रवेश प्रकियेच्या (कॅ प) जागा " याचा अर्थ , सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे पार पाडलेल्या कें द्रीभूत प्रवेश प्रकियेमार्फ त (कॅ प ) भरलेल्या जागा, असा आहे ;
(ङ) " सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) " याचा अर्थ , या नियमांन्वये पा(cid:५०४)क्रमांच्या आयोजित के लेली सामाईक प्रवेश चाचणी , असा आहे ;
(च) " पा(cid:५०४)क्रम " याचा अर्थ, भारतीय आयुर्विज्ञान परिषद (एम सी आय) किंवा भारतीय दंतवैद्यक परिषदेच्या (डी सी आय) मान्यतेने, महाराष्ट्र राज्यात चालविण्यात येणारे पदव्युत्तर वैद्यकीय पा(cid:५०४)क्रम किंवा यथास्थिती पदव्युत्तर दंतवैद्यक पा(cid:५०४)क्रम , असा आहे;
(छ) " भारतीय दंतवैद्यक परिषद " याचा अर्थ , दंतचिकित्सक अधिनियम, १९४८ (१९४८ चा १६ ) अन्वये घटित के लेली भारतीय दंतवैद्यक परिषद असा आहे ;
(ज) " भारतीय दंतवैद्यक परिषद विनियमन " याचा अर्थ पा(cid:५०४)क्रमांच्या प्रयोजनांकरिता तयार के लेले भारतीय दंतवैद्यक परिषदेचे विनियमन, असा आहे ;
(झ) " कागदपत्रे पडताळणी कें द्र " याचा अर्थ, ज्या शहरात किंवा नगरात कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे ते शहर किंवा नगर, असा आहे ;
(ञ) " पात्र उमेदवार " याचा अर्थ , या अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) अन्वये शासनाने वेळोवेळी अधिसूचित के ल्याप्रमाणे विविध व्यावसायिक पदव्युत्तर पदवी पा(cid:५०४)क्रमांसाठी जे पात्र आहेत असे उमेदवार, असा आहे ;
(ट) " आंतरवासिता " याचा अर्थ, भारतीय वैद्यक परिषद (एम सी आय ) किंवा भारतीय दंतवैद्यक परिषद (डी सी आय ) व महाराष्ट्र वैद्यक परिषद (एम एम सी ) किंवा महाराष्ट्र राज्य दंतवैद्यक परिषद (एम एस डी सी ) व सबंधित विद्यापीठांच्या नियमानुसार किंवा विनियमानुसार पूर्ण करावयाची अनिवार्य चक्रिय आंतरवासिता, असा आहे ;
(ठ) " परस्पर गुणवत्ता " याचा अर्थ, या नियमांनुसार सामाईक प्रवेश चाचणीच्या (सीईटीच्या ) गुणवत्तेस अनुसरून निर्धारित के लेले उमेदवारांच्या विविध वर्गाच्या, प्रवर्गाच्या व उमेदवारींच्या प्रकाराच्या बाबतीतील गुणानुक्रम, असा आहे ;
(ड) "संस्थास्तरीय कोटा" याचा अर्थ, शासनाने किंवा समुचित प्रधिकरणाने, वेळोवेळी जाहीर के ल्याप्रमाणे संस्था स्तरावरील पात्र उमेदवारांच्या प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागा, असा आहे ;
(ढ) " भारतीय आयुर्विज्ञान परिषद " याचा अर्थ, भारतीय आयुर्विज्ञान परिषद १९५६ (१९५६ चा १०२) अन्वये घटित के लेली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे विनियम, असा आहे ;
(ण) " भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे विनियम " याचा अर्थ , पा(cid:५०४)क्रमांच्या प्रयोजनाकरिता तयार के लेले भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे विनियम , असा आहे ;
(त) "अल्पसंख्याक कोटा "याचा अर्थ, ज्या अल्पसंख्याक समाजाकरिता संस्था आहे अशा, महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्या(cid:१९१)र्याकरिता राखून ठेवलेल्या जागा, असा आहे ;
(थ) "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ" याचा अर्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ (१९९९ चा महा. १०) याच्या कलम ३ च्या पोट -कलम (१) अन्वये स्थापन के लेले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, असा आहे ;
(द) " पात्रता " परीक्षा म्हणजे परीक्षा ज्याच्या आधारावर उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरतो किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा.
(ध) " नोंदणी " म्हणजे १ वर्षाची अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण के ल्यानंतर एमसीआय किंवा डीसीआय किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) किंवा महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल (एमएसडीसी) कडे पात्रतेची नोंदणी.
(२) या नियमांमध्ये वापरलेल्या परंतु यावर व्याख्या न के लेल्या शब्द व शब्दप्रयोग यांना त्या अधिनियामध्ये अनुक्रमे जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल.
३. अर्ज मागविणे.—सक्षम प्रधिकारी संबंधित विद्याविषयक वर्षाकरिता ज्या पा(cid:५०४)क्रमांसाठी सामाईक प्रवेश चाचणी घेणे आवश्यक आहे त्या पा(cid:५०४)क्रमास प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश चाचणीत (सीईटीत) सहभागी होण्याकरिता उमेदवारांकडून त्यासाठी विहित के लेल्या नमुन्यात ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ ३४. सामाईक प्रवेश चाचणीचे (सीईटीचे ) माध्यम, पद्धती , अभ्यासक्रम, वेळापत्रक इत्यादी जाहीर करणे . — (१) भारतीय वैद्यक
परिषद विनियम किंवा यथास्थिति कोणतेही असल्यास भारतीय दंत वैद्यक परिषद विनियम, यास अधीन राहुन, सक्षम प्राधिकारी , सामाईक प्रवेश चाचणी घेण्याच्या प्रयोजनार्थ, पुढील बाबी जाहीर करील : —
(क) सीईटीचे माध्यम ;
(ख) सीईटीचा प्रकार ;
(ग) सीईटीची पद्धत ;
(घ) सीईटीचे वेळापत्रक ;
(ङ) प्रवेशपत्र निर्गमित करणे ;
(च) निकाल जाहीर करणे ; इत्यादी ;
(छ) कें द्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅ प) फे ऱ्या, संस्थास्तरीय कोटा, अल्पसंख्याक संस्थेमार्फ त प्रवेश यांवर आधारित प्रवेशासाठी संबंधित वेळापत्रक आणि प्रवेशासाठी संबंधित इतर बाबी, आणि
(ज) सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) घेण्यासाठी जी आवश्यक आहे किंवा आवश्यक असेल अशी कोणतीही अन्य बाब (२) सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) शी सबंधित अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या पुर्वमान्यतेने सक्षम प्राधिकाऱ्याकडून जाहीर करण्यात येईल.
५. उमेदवारीचा प्रकार . — (१) महाराष्ट्र राज्यातील उमेदवारी
| प्रकार | निकष |
| (क) | जे उमेदवार भारतीय वैद्यक परिषद अधिनियम,१९५६ याला जोडलेल्या अनुसूची मध्ये किंवा दंतवैद्यक अधिनियम, १९४८ याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयाकडून घेतलेल्या एम.बी.बी.एस किंवा बी.डी.एस ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत किंवा सीईटी घेण्यात येणाऱ्या वर्षाच्या ३१ मार्च पर्यत एक वर्षाचे आंतरवासिता प्रशिक्षण पूर्ण के ले आहे किंवा पूर्ण करीत आहेत आणि महाराष्ट्र स्थित आहेत असे सर्व उमेदवार पात्र असतील. वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ अन्वये स्थापन झालेल्या कृ षीतर विद्यापीठांशी संलग्न असणे आवश्यक आहे अथवा महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ या अनुसार अभिमत विद्यापीठांशी संलग्न असले पाहिजे. ज्या उमेदवाराने एकतर भारतीय वैद्यक परिषद किंवा भारतीय दंत वैद्यक परिषद अथवा संबंधित राज्य परिषदेकडून नोंदणी प्राप्त के ली आहे, असे उमेदवार परीक्षेस बसण्यात पात्र असेल. |
| (ख) | जो उमेदवार, प्रकार (क) मध्ये येत नाही, मात्र जो महाराष्ट्र राज्यातील अधिवासी आहे आणि ज्याने महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या वैद्यकीय किंवा दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस अथवा बी.डी.एस अभ्यासक्रमाकरिता अखिल भारतीय वैद्यक पूर्व चाचणी प्रवेश परीक्षेसाठी ( ए आय पी एम टी ) १५% कोǷा अ ंतर्गत प्रवेश घेतला आहे आणि ज्याने महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या विद्यापीठातून पदवी मिळवली आहे असा उमेदवार सामाईक प्रवेश चाचणीसाठी (सीईटी ) पात्र असेल. |
(२) अल्पसंख्याक उमेदवारी.— नियम ५ च्या पोट-नियम (१) अनुसार पात्रता निकषांची पूर्तता करणारे . राज्यातील विशिष्ट भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक समाजातील महाराष्ट्राचे अधिवासी असलेले उमेदवार, या प्रवर्गाअंतर्गत पात्र असतील.
(३) अनिवासी भारतीय उमेदवारी.— जे उमेदवार या अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (ढ) मध्ये व्याख्या के ल्याप्रमाणे शतींची पूर्तता करीत असतील ते या प्रवर्गांतर्गत पात्र असतील.
६. विविध पा(cid:५०४)क्रमांसाठी मंजूर के लेल्या प्रवेशाच्या जागा.— पा(cid:५०४)क्रमांसाठी प्रथम वर्षासाठी मंजूर के लेल्या प्रवेशाच्या जागा, संबंधित पा(cid:५०४)क्रमांना मान्यता देण्यासाठी सक्षम असलेल्या समुचित प्रधिकाऱ्याने दिल्याप्रमाणे आणि संबंधित संलग्नित विद्यापीठाने संलग्निकृ त के ल्याप्रमाणे असतील.
भाग चार-ब-३७६-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ ७. जागांचे वाटप.—पा(cid:५०४)क्रमांच्या प्रथम वर्षासाठी सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) मार्फ त उमेदवारांच्या विविध प्रकारांसाठी जागांच्या वाटपाची टक्के वारी, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, भारतीय वैद्यक परिषद विनियमन (एमसीआय) किंवा भारतीय दंत वैद्यक परिषद विनियमन (डीसीआय) यानुसार आणि पा(cid:५०४)क्रमांच्या प्रथम वर्षासाठी शासनाच्या धोरणानुसार असेल.
(१) महाराष्ट्र राज्य उमेदवारी असलेल्या जागा.— नियम ५ च्या पोट-नियम (१) व (२) यांमध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याची उमेदवारी असलेले उमेदवार, या जागांसाठी पात्र असतील.
(२) अल्पसंख्याक उमेदवारी असलेल्या जागा.— नियम ५ च्या पोट-नियम (२) मध्ये नमूद के लेली उमेदवारी असलेले उमेदवार, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे या जागांसाठी पात्र असतील. या जागा या अधिनियमांच्या कलम ६ च्या पोट-कलम (२) च्या तरतुदींनुसार भरण्यात येतील.
(३) संस्थात्मक कोटयातील जागा.— संस्था पुढील शर्तीस अधीन राहून अनुसूचीमध्ये नमूद के ल्याप्रमाणे मंजूर प्रवेश क्षमतेच्या ५०% जागांवर पात्र उमेदवारांना प्रवेश देऊ शकतात : —
(एक) या जागांसाठी नियम ५ च्या पोटनियम (१), (२) व (३) मध्ये नमूद के लेली उमेदवारी असलेले उमेदवार लागू असल्यास पात्र असतील.
(दोन) प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून , संस्थात्मक पातळीवर अनिवासी भारतीय उमेदवारांकडून जास्तीत जास्त १५% इतक्या जागा भरता येतील.
(तीन) जर अनिवासी भारतीय कोटयासाठी आरक्षित ठेवलेल्या जागा रिक्त राहिल्यास, त्या रिक्त जागा परस्पर गुणानुक्रमांच्या आधारावर नियम ५ च्या पोटनियम (१) व (२) मध्ये दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य पात्र उमेदवारी मधून संस्थेमार्फ त भरता येतील.
८. गुणवत्ता यादी तयार करणे.— (१) गुणवत्ता क्रमांक नेमून देणे.— सक्षम प्रधिकारी उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यमापने करील व निकाल घोषित करील किंवा सामाईक प्रवेश चाचणीमध्ये उमेदवाराने प्राप्त के लेले गुण जाहीर करील.गुण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम राज्य गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल;
(२) पात्रता ठरवण्यासाठी अर्हताकारी परीक्षेच्या गुणांची परिगणना करण्याची पद्धत.— उमेदवारांची पात्रता ठरवताना पुढील कार्यपद्धती अंगिकारण्यात येईल :—
(क) भारतीय वैद्यकीय परिषद विनियमाव्दारे ठरविण्याप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी पा(cid:५०४)क्रमांच्या निवडीसाठी पात्र ठरण्यासाठी सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी ) मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांने ५०% टक्कयांहून कमी नसतील इतके गुण मिळविणे आणि सांविधानिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवाराने ४०% टक्कयांहून कमी नसतील इतके गुण मिळविणे आवश्यक असेल.
(ख) भारतीय दंत वैद्यक परिषद विनियमांद्वारे ठरविल्याप्रमाणे दंत वैद्यकीय पदव्युत्तर पा(cid:५०४)क्रमांच्या निवडीसाठी, पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराने सामाईक प्रवेश चाचणीमध्ये (सीईटी) ५० टक्यांपेक्षा कमी नसतील इतके गुण मिळविणे आणि सांविधानिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवाराने ४० टक्यांपेक्षा कमी नसतील इतके गुण मिळविणे आवश्यक असेल.
(३) विविध पा(cid:५०४)क्रमांसाठी गुणवत्ता क्रमांक देणे :—
(एक) वैद्यकीय पदव्युत्तर पदवी पा(cid:५०४)क्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी,—
उमेदवारांची गुणवत्ता यादी, त्या शैक्षणिक वर्षासाठी दिलेल्या पा(cid:५०४)क्रमांच्या प्रवेशाच्या प्रयोजनाकरिता सक्षम प्राधिकरणाने घेतलेल्या सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) उमेदवाराने प्राप्त के लेल्या गुणांच्या किंवा प्राप्तांकांच्या आधारावर तयार करण्यात येईल :
परंतु सापेक्ष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत पुढील पसंतीक्रमांनुसार व खाली विनिर्दिष्ट के लेल्या पद्धतीनुसार निर्णय घेण्यात येईल.
सीईटीमध्ये समान गुण मिळवणाऱ्या दोन किंवा अधिक उमेदवारांच्या बाबतीत, त्याचा परस्पर गुणानुक्रम खालीलप्रमाणे निश्चित के ला जाईल :—
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ ५(क) उमेदवाराने एम बी बी एस च्या प्रथम, व्दितीय व तृतीय (सत्र-एक व दोन) परीक्षेत एकत्रित प्राप्त के लेल्या टक्के वारीत रूपांतरित के लेल्या अधिकत्तम गुण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असेल तर,
(ख) एम बी बी एस च्या तृतीय (सत्र -एक व दोन) परीक्षेत (टक्के वारीत रुपांतरित के लेल्या) उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असेल तर,
(ग) एम बी बी एस च्या व्दितीय परीक्षेत (टक्के वारीत रुपांतरित के लेल्या) अधिकत्तम एकत्रित गुण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजूनही कायम असेल तर,
(घ) प्रथम एमबीबीएस परीक्षेत (टक्के वारीत रुपांतरित के लेले ) अधिकतम एकत्रित गुण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असेल तर,
(ङ) कमी वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
(च) एमबीबीएसचे प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाचे गुण विचारात घेताना आणि वरील प्रयोजनासाठी एकू ण गुणांमध्ये अनुग्रह गुण व/किंवा राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) गुण हिशेबात घेतले जाणार नाही.
(दोन) दंतवैद्यक पदव्युत्तर पदवी पा(cid:५०४)क्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी :—
उमेदवाराची गुणवत्ता यादी, त्या विद्याविषयक वर्षासाठी, या पा(cid:५०४)क्रमाच्या प्रवेशाच्या प्रयोजनाकरिता सक्षम प्राधिकरणाव्दारे सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) मध्ये उमेदवाराने प्राप्त के लेले गुण किंवा गुणांच्या आधारावर तयार करण्यात येईल.
परंतु उमेदवारास समान गुण असल्यास उमेदवाराची सापेक्ष गुणवत्ता पुढील पसंतीक्रमानुसार व खाली विनिर्दिष्ट के लेल्या पद्धतीनुसार निर्णय घेण्यात येईल.
सामाईक प्रवेश चाचणीमध्ये समान गुण मिळवणाऱ्या दोन किंवा अधिक उमेदवारांच्या बाबतीत अशा उमेदवारांची परस्पर गुणवत्ता पुढील पसंतीक्रमानुसार ठरविण्यात येईल :—
(क) उमेदवाराने दंतवैद्यक पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम (सत्र एक व दोन ) वर्षांच्या परिक्षेत प्राप्त के लेल्या एकत्रित अधिकतम गुण (टक्के वारीमध्ये रुपांतरित के लेले) असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजूनही कायम असल्यास,
(ख) दंत वैद्यक पदवीच्या अंतिम परीक्षेत (सत्र एक व दोन ) गुण (टक्के वारीमध्ये रुपांतरीत के लेले) असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असल्यास,
(ग) दंतवैद्यक पदवीच्या तृतीय वर्ष परीक्षेत अधिकतम गुण (टक्के वारीमध्ये रुपांतरीत के लेले ) असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असल्यास,
(घ) दंतवैद्यक पदवीच्या द्वितीय वर्ष परीक्षेत अधिकतम गुण (टक्के वारीमध्ये रुपांतरीत के लेले ) असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. जर बरोबरी अजुनही कायम असल्यास,
(ङ) कमी वयापेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
(च) दंतवैद्यक पदवीच्या प्रथम,द्वितीय,तृतीय व अंतिम परीक्षेचे गुण विचारात घेताना आणि वरील प्रयोजनासाठी एकु ण गुणांमध्ये उद्देशांकरिता प्रयोजनासाठी एकू ण गुणांमध्ये, अनुग्रह गुण व /किंवा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) गुण हिशोबात घेतले जाणार नाहीत.
(४) अनिवासी भारतीय गुणवत्तेची परिगणना करण्याची पद्धत.— नियम ५ च्या पोटनियम (३) मध्ये नमुद के लेल्या अनिवासी भारतीय उमेदवारांची गुणवत्ता यादी, अर्हताकारी परिक्षेच्या गुणवत्तेच्या टक्के वारीच्या आधारे तयार करण्यात येईल.
९. कें द्रिभूत प्रवेश प्रक्रिया (कॅ प).— (१) विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्था, या अधिनियम कलम ३ च्या पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट के ल्याप्रमाणे कें द्रिभूत प्रवेश प्रक्रीयेमार्फ त (कॅ प) उमेदवारांना प्रवेश देईल. कें द्रिभूत प्रवेश प्रक्रियचे टप्पे खाली नमुद के ल्याप्रमाणे असतील :—
भाग चार-ब-३७६-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ (क) विषयनिहाय व प्रवर्गनिहाय महाविद्यालयीन जागांचे वाटप संके तस्थळावर प्रदर्शित किंवा प्रसिद्ध करणे ;
(ख) संके तस्थळावर पसंती क्रमांक नमुना भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक व स्थळ प्रदर्शित किंवा प्रसिद्ध करणे;
(ग) पसंतीक्रम नमुना भरण्याच्या व पा(cid:५०४)क्रमांस प्रवेश देण्याच्या समुपदेशन प्रक्रीयेची माहिती पुस्तिका प्रदर्शित करणे किंवा प्रसिद्ध करणे.
(घ) पात्र उमेदवारांनी पसंतीक्रम नमुना भरल्यानंतर, कागदपत्रे पडताळणी कें द्रात म्हणजेच मु ंबई, पुणे , औरंगाबाद व नागपुर येथे प्रवेश प्रक्रियेकरिता यशस्वी उमेदवारांच्या पात्रतेच्या कागदपत्रांची पडताळणी व पृष्ठांकन ;
(ङ) संगणकीकृ त प्रक्रियेद्वारे कें द्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅ प) प्रथम फे रीसाठी जागांचे वाटप करणे व विनिर्दिष्ट कालावधीत वाटप के ल्याप्रमाणे उमेदवारांनी निवडलेल्या संबंधित संस्थेत उमेदवारांनी प्रवेश घेतल्याचे प्रदर्शित करणे किंवा प्रसिद्ध करणे;
(च) कें द्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅ प) प्रथम पूर्ण झाल्यानंतर जर जागा रिक्त राहिल्या तर, नंतर संगणकीकृ त फे री (फे ऱ्या ) प्रदर्शित करणे किंवा प्रसिद्ध करणे;
(२) प्रत्येक कें द्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅ प) फे रीच्या शेवटी , उमेदवारांना स्थान धारणा अर्जाद्वारे जागा धारण करण्याची संधी दिली जाईल. जर उमेदवारांने दिलेली जागा स्वीकारली असेल आणि जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फे रीत सहभागी होऊ इच्छित नसेल तर, अशा उमेदवारांना प्रवेशाच्या नंतरच्या फे रीत विचारात घेतले जाणार नाही.
१०. कें द्रिभूत प्रवे(cid:२३६) प्रक्रियेच्या (कॅ प) जागा वाटपाचे टप्पे व वाटपाची प्रक्रिया :—
कें द्रिभूत प्रवेश प्रक्रिये (कॅ प) अंतर्गत जागांचे वाटप पुढील रितीने करण्यात येईल,—
(१) महाराष्ट्र राज्य उमेदवारी :- संगणीकृ त वाटपाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत :—
टप्पा एक : सर्व उमेदवारांसाठी :—
(क) विविध प्रवर्गातील सर्व उमेदवारांचा त्यांच्या परस्पर गुणवत्तेनुसार जागा वाटप , करण्यासाठी विचार करण्यात येईल.
(ख) अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा आणि संस्था ज्या अल्पसंख्याक समाजाची आहे त्या संबंधित अल्पसंख्याक समाजातील त्यांच्या अल्पसंख्याक को(cid:५०३)ातील जागा, वाटप करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारे विचार करण्यात येईल.
(ग) मागास प्रवर्गातील उमेदवारांचा, त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा किंवा जर त्यांच्या गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील जागा उपलब्ध नसेल तर, त्यांच्या संबंधित आरक्षित प्रवर्गातील जागा वाटप करण्यासाठी विचार करण्यात, येईल.
(घ) विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागा, किंवा त्यांच्या गुणवत्तेनुसार खुल्याप्रवर्गातील जागा उपलब्ध नसतील तर, आरक्षणाच्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील जागा, यांचा जागा वाटप करण्यासाठी विचार करण्यात येईल.
टप्पा दोन.— मागासवर्ग प्रवर्गांच्या उमेदवारांच्या संबंधित गटांसाठी :- राखीव प्रवर्गांच्या न भरलेल्या जागांसाठी जर आवश्यक असेल तर प्रत्येक फे रीच्या शेवटी राखीव प्रवर्गातील उमेदवाराची गुणवता व निवड यांनुसार राखीव प्रवर्गातील परस्पर ज्या गटाच्या रिक्त जागा अस्तित्वात असतील त्या विशिष्ट गटांच्या परस्पर गुणवत्ता यादीमधून त्या संबंधित गटाच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील. विविध प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या जागा त्यांच्या परस्परांतील गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रियेदरम्यान खालीलप्रमाणे भरल्या जातील :—
रिक्त पदे अस्तित्वात असलेल्या त्या विशिष्ट गटाच्या परस्पर गुणवत्ता यादीतील त्यांच्या संबंधित गटातील उमेदवारांपैकी प्रवेशाच्या वेळी अस्तित्वात असलेल्या राज्य शासनाच्या आरक्षण धोरणानुसार पुढील प्रमाणे गट असतील आणि प्रवेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडून त्यात फे रबदल करता येतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ ७गट-एक
(एक) अनुसूचित जाती व नवबौद्ध म्हणून धर्मांतरित झालेल्या अनुसूचित जाती (अ.जा.) (दोन) विनिर्दिष्ट क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्यांसह अनुसूचित जमाती (अ.ज.)
गट- दोन
(एक) विमुक्त जाती [(वि.जा. (अ)]
(दोन) भटक्या जमाती [(भ.ज. (ब)]
गट-तीन
(एक) भटक्या जमाती [(भ.ज. (क)]
(दोन) भटक्या जमाती [(भ.ज. (ड)]
(तीन) विशेष मागास प्रवर्गासह (एस बी सी) इतर मागास वर्ग (ओ बी सी)
टप्पा - तीन :- सर्व मागासवर्ग प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी :- जर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांच्या गटासाठी राखीव असलेली जागा रिक्त राहिली तर, अशी जागा, एकत्रित के लेल्या सर्व मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांच्या परस्पर गुणवत्तेच्या उमेदवारास वाटप करण्यासाठी विचारात घेण्यात येईल.
टप्पा - चार :- जर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेली जागा रिक्त राहिली तर, अशी जागा, सर्वसाधारण परस्पर गुणवत्तेच्या उमेदवाराला वाटप करण्यासाठी विचारात घेण्यात येईल.
(२) अल्पसंख्याक उमेदवारी करिता :- संगणकीकृ त वाटपाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :-
(क) अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारास , त्यांच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारे खुल्या , प्रवर्गातील जागा वाटप करताना आणि ज्या अल्पसंख्याक समाजाची संस्था आहे त्या संबंधित अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तेच्या आधारे अल्पसंख्याक कोटयातील जागा वाटप करताना विचारात घेण्यात येईल.
(ख) गुणवत्तेनुसार भरण्यात न आलेल्या अल्पसंख्याक प्रवर्गाच्या जागा आवश्यक असेल तर प्रत्येक फे रीच्या शेवटी परस्पर गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.
११. कें द्रिभूत प्रवेश प्रक्रिया संगणकीकृ त फे रीद्वारे आणि कें द्रिभूत प्रवेश प्रक्रिया वैयक्तिक पसंतीक्रम फे रीव्दारे जागांचे
वाटप.—कें द्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या सर्व फे ऱ्या संगणकीकृ त वाटपाद्वारे घेण्यात येतील.
(क) जर जागांचे वाटप न झाल्यामुळे आणि प्रवेशासाठी उपस्थित न राहिल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जागा रिक्त राहिली तर, अशी जागा लगतनंतरच्या फे रीमध्ये वाटप करण्यासाठी विचारात घेण्यात येईल.
(ख) भरण्यात न आलेल्या जागांकरिता अंतिम वैयक्तिक समुपदेशन फे री आयोजित करण्यात येईल. या वैयक्तिक समुपदेशन फे रीसाठी उमेदवारांनी भरलेले पसंतीक्रम रद्दबाबत व शुन्य ठरविण्यात येतील.
ते सर्व उमेदवार या वैयक्तिक समुपदेशन फे रीसाठी पात्र असणार नाहीत, ज्यांनी
(एक) पसंतीक्रम प्रपत्र भरलेले नाही/किंवा ;
(दोन) ज्यांना संगणकीकृ त कें द्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या फे ऱ्यांमध्ये जागा वाटप करण्यात आलेले आहे मात्र जे दाखल झालेले नाहीत; किंवा
(तीन) ज्यांनी स्थान धारणा प्रपत्र भरलेले आहे ; किंवा
(चार) ज्यांना महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय पदव्युत्तर पदवी कोटयाव्दारे जागा वाटप करण्यात आली व ते महाविद्यालयात दाखल झाले आहेत आणि विहित के लेल्या दिनांका अगोदर जागा सोडून दिलेली नाही.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३१२. सर्वसाधारण तरतुदी :—
(क) लगतनंतरच्या संगणकीकृ त फे रीचे (फे ऱ्यांचे) वाटप पसंतीक्रम नमुना भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने सादर के लेल्या त्याच पसंतीक्रमाच्या आधारावर करण्यात येईल.
(ख) ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम नमुना भरलेला आहे आणि त्यांना जागा वाटप के लेले नाही, असे सर्व उमेदवार लगतनंतरच्या संगणकीकृ त फे रीसाठी (फे ऱ्यांसाठी) पात्र असतील.
(ग) ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम नमुना भरलेला आहे आणि ज्यांना जागा वाटप के लेल्या आहेत आणि जे पा(cid:५०४)क्रमास दाखल झालेले आहेत आणि ज्यांनी स्थान धारणा अर्ज भरलेले नाही, असे सर्व उमेदवार लगतनंतरच्या संगणकीकृ त फे रीसाठी (फे ऱ्यांसाठी) पात्र असतील.
(घ) ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम नमुना भरलेला आहे अणि ज्यांना जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत आणि जे पा(cid:५०४)क्रमात दाखल झालेले आहेत आणि ज्यांनी स्थान धारणा प्रपत्र भरलेले आहे असे सर्व उमेदवार लगतनंतरच्या संगणकीकृ त फे रीसाठी (फे ऱ्यांसाठी) पात्र असणार नाहीत.
(ङ) संके तस्थळावर प्रदर्शित के लेली वाटप यादी उमेदवारांना के लेले वाटप दर्शविल. या संबंधात उमेदवारास व्यक्तिगतरित्या कळवण्यात येणार नाही किंवा वाटप पत्र देण्यात येणार नाही.
(च) ज्या उमेदवारांना गुणवत्ता-नि-पसंतीक्रमाच्या आधारावर जागा वाटप करण्यात आलेले आहे, अशा सर्व उमेदवारांनी संबंधित संस्थेत संबंधित सर्व मूळ कागदपत्रे सादर करण्याच्या आणि विहित के लेले शुल्क प्रदान करण्याच्या आवश्यक औपचारिकता पूर्ण करून विहित के लेल्या कालावधीत अशा प्रकारे नेमुन दिलेल्या महाविद्यालयात व संस्थेतील पा(cid:५०४)क्रमात अनिवार्यपणे दाखल झाले पाहिजे. जर तो किंवा ती पा(cid:५०४)क्रमास दाखल होत नसेल तर तो किंवा ती लगतनंतरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही.
(छ) जागा स्वीकृ त करण्यासाठी व्यक्तिश: उपस्थित राहण्यात कसुर करणे ही बाब जणु काही उमेदवारांने प्रस्ताव नाकारला आहे, असे समजण्यात येईल.
(ज) जर कोणत्याही वेळी, कोणतेही कागदपत्र किंवा प्रमाणपत्र अवैध असल्याचे किंवा कपटपुर्व सादर के लेले असल्याचे आढळून आल्यास आणि /किंवा उमेदवार पात्रता निकषांची पुर्तता करीत नसल्यास त्यास वाटप के लेली जागा रद्द करण्यात येईल.
१३. संस्थात्मक को(cid:५०३)ातील व कॅ प नंतर रिक्त राहीलेल्या जागांवरील प्रवेश.—संचालक किंवा संस्थेचा प्राचार्य या जागांचे प्रवेश पुढील रितीने करील :—
(क) ज्या उमेदवारांने संस्थेकडे प्रवेशासाठी अर्ज के लेला आहे अशा उमेदवारांना परस्पर गुणवत्तेनुसार पारदर्शक रितीने व काटेकोरपणे प्रवेश देण्यात येतील.
(ख) प्रवेशाचे नियम विनिर्दिष्ट के लेली संस्थेची माहिती लघुपुस्तिका अथवा माहितीपुस्तिका प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पुरेशा कालावधीपुर्वी प्रकाशित करण्यात यावी. लघुपुस्तिके तील सर्व माहिती संस्थेच्या संके तस्थळावर देखील प्रदर्शित करण्यात यावी.
(ग) संस्था प्रवेशाचे वेळापत्रक आणि संस्थेव्दारे भरावयाच्या प्रत्येक पा(cid:५०४)क्रमासाठी जागांची संख्या किमान दोन प्रमुख वर्तमानपत्रात आणि संस्थेच्या संके तस्थळावर जाहिरातीव्दारे अधिसुचित करून अर्ज मागवील.
(घ) शासनाने अधिसुचित के ल्यानुसार आणि सक्षम प्रधिकरणाने वेळोवेळी विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे अर्हता निकषांची पुर्तता करणारे इच्छु क उमेदवार, संस्थास्तरीय प्रवेशासाठी संबंधित संस्थेच्या प्राचार्यकडे किंवा संचालकाकडे अर्ज करतील.
(ङ) संस्थेस, संस्थात्मक कोटयातील जागा भरण्यासाठी सक्षम प्रधिकरणाव्दारे जाहीर के लेल्या गुणवत्ता यादीतुन प्राप्त झालेल्या त्यांच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारे अर्जदारांना प्रवेश देता येईल.
परंतु समुचित प्राधिकरणाने सामाईक चाचणी परीक्षेच्या आधारे असे प्रवेश करण्याचे विनिर्दिष्ट के ले असेल तर अशा प्रकरणी संस्थात्मक कोटा परस्पर गुणवत्तेच्या आधारे भरण्यात येईल.
(च) संस्था संस्थात्मक को(cid:५०३)ातील संस्थास्तरावरील भरावयाच्या उमेदवारांची परस्पर गुणनुक्रम यादी तयार करील व ती संस्थेच्या संके तस्थळावर प्रसिद्ध करील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ ९(छ) विनिर्दिष्ट पा(cid:५०४)क्रमांचा संस्थात्मक कोटा (अंशत: किंवा पूर्ण) कें द्रिभुत प्रक्रियेत स्वाधीन करण्याचा उद्देश असणारी अल्पसंख्याक किंवा बिगर-अल्पसंख्याक संस्था प्रत्येक कें द्रिभुत प्रवेश प्रक्रिया फे रीच्या जागांची संख्या प्रदर्शित करण्यापूर्वी किमान एक आठवडा आधी कळवील आणि कें द्रिभुत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांप्रमाणे त्याचे वाटप करण्यात येईल.
(ज) सर्व प्रवेश आणि रद्द झालेले प्रवेश सक्षम प्रधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या विहित कालावधीत सक्षम प्रधिकरणास कळविण्यात येतील.
(झ) कें द्रिय प्रवेश प्रक्रिया फे ऱ्यांनंतर कें द्रीय प्रवेश प्रक्रियेच्या जागा शि(cid:४९८)क राहिल्या किंवा रिक्त झाल्या तर त्या जागा कें द्रीय प्रवेश प्रक्रियेदरम्यान ज्या प्रवर्गासाठी राखुन ठेवल्या होत्या, त्याच प्रवर्गातील उमेदवारांमधून त्या भरण्यात येतील.
याशिवाय जर जागा राहिल्या तर, त्या जागा अर्जदारांच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारावर भरण्यात येतील.
१४. संस्थास्तरीय फे री.—सर्व कें द्रीभूत प्रवेश प्रक्रियनंतर जागा रिक्त राहिल्या तर, उक्त जागा, सक्षम प्राधिकरणाच्या पुर्व मान्येतेने, संस्थास्तरीय फे रीद्वारे भरण्यात येतील,संस्था सामाईक प्रवेश चाचणीमध्ये (सीईटी ) ज्यांना पात्र घोषित के लेले आहे, अशा इच्छु क उमेदवारांकडून अर्ज मागवील. सामाईक प्रवेश चाचणी मधील परस्पर गुणवत्तेच्या आधारे संस्थेत प्रवेश दिला जाईल.
१५. गुणवत्ता यादीची व प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या यादीची मान्यता :—
(१) प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था, अधिनियमाच्या कलम ९ च्या पोट-कलम (५) अनुसार, प्रवेश नियामक प्राधिकरणाला प्रवेश मान्यता प्रस्ताव सादर करील.
(२) प्रवेश मान्यता प्रस्तावामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व उमेदवारांची यादी समाविष्ट असेल, ज्यात कोटा, उमेदवारीचा प्रकार, आरक्षण अर्हताकारी गुण, इत्यादी तसेच संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे यांचा अंतर्भाव असेल.
१६. संस्थेकडून प्रवेश रद्द के ल्यानंतर शुल्काचा परतावा.—
(क) महाविद्यालयात बदल किंवा प्रवेश रद्द के ल्यानंतर महाविद्यालयाव्दारे शुल्क परत करणे.
(१) सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे घोषित करण्यात येईल अशा दिनांकास किंवा त्यापूर्वी रु.१५०० /- (रूपये एक हजार पाचशे फक्त ) वजा के ले जातील, आणि जे उमेदवाराला परत मिळण्यास तो हक्कदार असेल ते शुल्क तात्काळ परत के ले जाईल.
(२) सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे घोषित करण्यात येईल अशा दिनांकानंतर कोणताही परतावा मिळणार नाही.
(ख) जर उमेदवाराचा मृत्यु झाला असेल किंवा तो एम.सी.आय प्रमाणकानुसार किंवा डी.सी.आय प्रमाणकानुसार आणि अधिसूचित के लेल्या वैद्यकीय मंडळाने ठरविल्याप्रमाणे पा(cid:५०४)क्रमास प्रवेश घेण्यास अपात्र ठरला असेल तर प्रवेशाच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत भरणा के लेल्या शुल्काच्या संपूर्ण परतावा के ला जाईल.
१७. पा(cid:५०४)क्रम किंवा संस्था बदलणे.—एम.सी.आय च्या विनियमानुसार किंवा डी.सी.आय च्या विनियमांनुसार परस्पर तत्वावर प्रवेशाच्या कट-ऑफ (अंतिम) दिनांकानंतर पा(cid:५०४)क्रमात किंवा संस्थेत बदल करण्यास परवानगी असणार नाही.
१८. वर्तणूक व शिस्त :—
(क) अर्जामध्ये पूर्ण व अचूक माहिती भरण्यामध्ये उमेदवारांने कसूर के ली किंवा कोणतीही माहिती दडपून ठेवली तर, नंतरच्या तारखेस देखील उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल. अशा उमेदवारास संपूर्ण निवड प्रक्रियेमधून प्रतिरोधित के ले जाईल.
(ख) योग्य कागदपत्रे सादर करणे हे प्रत्येक उमेदवारांची जबाबदारी आहे . जी खरी नाहीत अशी कागदपत्रे सादर करण्याचा कोणताही प्रयत्न के ल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याकडून किंवा त्याच्या प्राधिकृ त अधिकाऱ्याकडून उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल उमेदवारांची अनामत रक्कम सरकारजमा करण्यात येईल व उमेदवारांस महाविद्यालयातून निष्कासित करण्यात येईल. अशा उमेदवारांचे नाव /उमेदवारांची नावे, राज्य गुणवत्ता यादीमधून वगळण्यात येईल /येतील आणि तो किंवा ती निवड प्रकियेच्या पुढील फे ऱ्यांकरिता पात्र असणार नाही आणि त्याला / तिला निवड प्रक्रिे येमधून प्रतिरोधित करण्यात येईल.
(ग) जर कोणताही विद्यार्थी किंवा अधिकृ त प्रतिनिधी किंवा सोबतची व्यक्ती, समुपदेशनात आणि / किंवा प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण करीत असल्याचे, किंवा बेकायदेशीर रीतीने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे, उपद्रव निर्माण करीत१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १०, २०२१/अग्रहायण १९, शके १९४३ असल्याचे आढळून आले तर, असा उमेदवार निवड प्रक्रियेमधून अपात्र ठरण्यास पात्र असेल आणि त्याच्यावर उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. या संबंधात प्राधिकृ त अधिकाऱ्यांने घेतलेला निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
(घ) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, पात्रता, नाव नोंदणी व नोंदणी आणि निवड झालेल्या उमेदवारांला मुदत देण्यासंबंधी निर्णय घेईल. नंतरच्या दिनांकास सक्षम प्राधिकाऱ्याने एखाद्या उमेदवाराच्या के लेल्या निवडीवर मुदत देण्याच्या मान्यतेवर कोणताही भार पडणार नाही.
(ङ) जागा वाटपाचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार के ल्यास, उमेदवार प्रवेशासाठी अपात्र ठरेल. अनुचित साधनांद्वारे कर्मचाऱ्यावर प्रभाव टाकल्यास वाटप के लेली जागा रद्द करण्यात येईल आणि असा उमेदवार नंतरच्या पदव्युत्तर वैद्यकीय किंवा दंतवैद्यक सामाईक प्रवेश चाचणीला (सीईटी) उपस्थित राहण्यासाठी अपात्र ठरेल.
(च) जागा, पा(cid:५०४)क्रम, संस्था वाटपाच्या बाबतीतील किंवा तात्पुरती निवड किंवा प्रवेश रद्द करण्याशी संबंधित असणाऱ्या अन्य कोणत्याही बाबतीतील विवादाच्या प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्याचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
अनुसूची
(नियम ७ पहा)
| अ.क्र. | स ंस्थेचा प्रकार | राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाद्वारे भरावयाच्या जागांची टक्के वारी | स ंस्थेचा कोटा (अनिवासी भारतीय कोǷासह ) |
| (१) | (२) | (३) | (४) |
| (क) | पदव्युत्तर वैद्यकीय पाǸक्रम | ||
| १. विना अनुदानित खाजगी व्यावसायिक श ैक्षणिक संस्था (अल्पसंख्याक संस्था वगळून) | ५०% | ५०% | |
| २.विना अनुदानित अल्पसंख्याक शिक्षण संस्था अल्पसंख्याक समाजाकरिता ५०% तथापि, न भरलेल्या जागा बिगर अल्पसंख्याक उमेदवारांमधून भरल्या जातील. | ५०% | ||
| (ख) | पदव्युत्तर दंतवैद्यक पाǸक्रम | ||
| १. विना अनुदानित खाजगी व्यावसायिक संस्था (अल्पसंख्याक संस्था वगळून) | ५०% | ५०% | |
| २. विना अनुदानित अल्पसंख्याक शिक्षण संस्था | अल्पसंख्याक समाजाकरिता ५०% तथापि, न भरलेल्या जागा, बिगर अल्पसंख्याक उमेदवारांमधून भरल्या जातील. | ५०% |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुरेन्द्र प्र. चानकर
शासनाचे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.