Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगरविकास विभाग यांजकडील मौजे बारामती (ग्रा.) येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 31(1) अन्वये फेरबदल करण्याबाबत अधिसूचना. (2) संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 मौजे हिंजवडी, पो. म्हाळुंगे व मौजे माण येथील विशेष नगर वसाहतीच्या विकसन नियमावलीतील विनियम क्रमांक 4.5 नुसार अनुक्रमे अ. क्र. अ मध्ये क्षेत्र अंतर्भूत करणे व ब मध्ये क्षेत्र वगळणेबाबत अधिसूचना. (3) संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) नुसार मौजे लोणावळा व मौजे पंढरपूर येथील मंजूर विकास योजनेतील जमिनीवरील आरक्षण व्यप्तगत झालेबाबतची अधिसूचना. (4) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 20(4) अन्वये मौजे आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथील फेरबदलाबाबत अधिसूचना. (5) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीबाबत अधिसूचना. (6) जिल्हधिकारी, सोलापूर यांजकडील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013 (30) च्या कलम 3 अन्वये अधिसूचना. (7) नगराध्यक्ष, आष्टा नगरपरिषद, आष्टा, जिल्हा सांगली यांजकडील आष्टा शहराची दुसरी सुधारित विकास योजनाबाबत अधिसूचना. (8) नगराध्यक्ष, सासवड नगरपरिषद, सासवड, जिल्हा पुणे यांजकडील सासवड शहराच्या सुधारित विकास योजनेबाबत अधिसूचना. (9) सहायक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांजकडील मयत समरीबाबत दुरुस्तीची अधिसूचना. (10) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील रास्ता पेठ, पुणे, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड, पांढरकरनगर, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड, विठ्ठलनगर, पिंपरे-वाघिरे येथील पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत अधिसूचना. (11) अध्यक्षा, लोणावळा, नगरपरिषद, लोणावळा यांजकडील फेरबदलाबाबत शुद्धीपत्रक. (12) पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे यांजकडील " नो-पार्किंग " बाबत अधिसूचना. (13) विशेष वसुली अधिकारी यांजकडील पुणे कर्जवसुलीबाबत अधिसूचना.
Published 16 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.