RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ७ अंक ७(१६)] बुधवार, डिसेंबर २२, २०२१/पौष १, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २२ डिसेंबर, २०२१ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-----
L. A. BILL No. XXXIII OF 2021.
A BILL
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT.
सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३.
मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
१८८८ चा ३.
२०२१ चा महा. अध्या. १३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि म्हणून, त्यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२१, हा प्रख्यापित केला होता ;
(१)
भाग पाच---४६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २२, २०२१/पौष १, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
१. (१) या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०२१, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
१८८८ चा ३.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात आला आहे), कलम ५ मध्ये, पोट-कलम (१) च्या, खंड (अ) मधील " दोनशे सत्तावीस " या मजुकाराऐवजी " दोनशे छत्तीस " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ ची सुधारणा.
३. (१) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२१, हा याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
२०२१ चा महा. अध्या. १३.
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ याचे निरसन व व्यावृती.
(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २२, २०२१/पौष १, शके १९४३ ३उद्देश व कारणे यांचे निवेदन
मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम ५ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग निवडणुकीत, प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येची तरतूद आहे. प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांची विद्यमान संख्या, २००१ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित आहे. २०११ च्या जनगणनेनंतर, प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येत बदल केलेला नव्हता.
२. २००१ ते २०११ या दशकामधील २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. नागरी लोकसंख्येमधील ही वाढ आणि जलदगतीने होणारे नागरीकरण विचारात घेता, वाढलेल्या लोकसंख्येस महानगरपालिकेमध्ये त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येत वाढ करणे इष्ट वाटले. म्हणून, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, मुंबई महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि म्हणून, त्यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२१ (२०२१ चा महा. अध्या. १३), हा प्रख्यापित केला होता.
४. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक १७ डिसेंबर, २०२१.
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.
विधान भवन : मुंबई, दिनांक २२ डिसेंबर, २०२१.
राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.