Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांजकडील प्रभाग क्रमांक 16-अ ची जागा अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्याबाबतची अधिसूचना.

Published 22 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - ३९ ] बुधवार, डिसेंबर २२, २०२१ / पौष १, शके १९४३

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त यांजकडून

वाचले : १. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक - रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र.१०/का-५, दिनांक ०३ मे २०२१.

२. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र.-रानिआ/मनपा-२०२१/प्र.क्र.१८/का.५, दिनांक १७ डिसेंबर २०२१.

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

अधिसूचना

क्र. मनपा/साप्रवि/पोट-निवडणूक/अशा/३०८/२०२१-२२.--ज्याअर्थी, वाचले क्र. १ अन्वये मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ५-अ च्या तरतुदीखाली सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बाबतीत सार्वत्रिक निवडणूक, २०१८ करिता निवडावयाच्या सभासदांची संख्या दिनांक २० मार्च २०१८ रोजी आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या सोडतीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवून त्यानुसार अंतिम प्रभाग रचना अधिसूचित करण्यात आली होती.

आणि ज्याअर्थी, उपरोक्त नमूद अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्र. १६ - प्रभागाचे नाव : खणभाग, नळभाग हा चार सदस्यीय प्रभाग असून त्यापैकी १६-अ ची जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली होती.

आणि ज्याअर्थी, विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व रिट याचिका क्र. १३१६/२०२१ अन्वये सदर दोेन्ही अध्यादेशांना मा. सवाच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्यानुसार मा. सवाच्च न्यायालयाने दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार स:स्थितीत सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागांच्या निवडणुकींना स्थगिती दिली, त्यानुसार मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये जागा क्र. १६-अ ची निवडणूक तत्काळ स्थगित केली.

आणि ज्याअर्थी, मा. सवाच्च न्यायालयाने रिट याचिका ८४१/२०२१, विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ व रिट याचिका क्रमांक १३१६/२०२१ मध्ये दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या सुनावणीनंतर पारित केलेल्या आदेशामध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींसाठी आरक्षित करण्यात आलेल्या ज्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, त्या जागा तत्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात, असे मा. राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निदेश दिले आहेत.

आणि ज्याअर्थी, वाचले क्र. २ अन्वये मा. राज्य निवडणूक आयोगाने सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १६-अ या पोट-निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची आरक्षित जागा क्र. १६-अ ही तत्काळ अनारक्षित करण्यात आल्याचे जाहीर करून मूलत: नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेली जागा क्र. १६-अ ही सर्वसाधारण प्रवर्गाची होईल, असे आदेश दिलेले आहेत. यासंदर्भात अधिसूचनेत योग्य ती सुधारणा करण्याचे अधिकार आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. (१) एच-३२४, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.---३९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २२ डिसेंबर २०२१ / पौष १, शके १९४३

त्याअर्थी, मी, नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १६-अ या पोट-निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची आरक्षित जागा क्र. १६-अ ही तत्काळ अनारक्षित करून मूलत: नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेली जागा क्र. १६-अ ही सर्वसाधारण प्रवर्गाची होईल, असे याद्वारे अधिसूचित करीत आहे.

यानुसार, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेेकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र.१०/का-५, दिनांक ३ मे २०२१, अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्र. १६ - प्रभागाचे नाव : खणभाग, नळभाग यामधील १६-अ ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी होईल, अशी सुधारणा करण्यात येत आहे.

नितीन कापडणीस,

आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.

सांगली, २१ डिसेंबर २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.