Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग पाच असा. क्रमांक ४९ (दि. २३ डिसेंबर २०२१) सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक

Published 23 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ७, अंक ८]

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ४८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

---------------------------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २३ डिसेंबर, २०२१ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-----

L. A. BILL No. XXXV OF 2021.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT, 2016.

सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३५.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

२०१७ चा महा. ६.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:----

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) अधिनियम, २०२१, असे म्हणावे.

(१)

भाग पाच-४८----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ २. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" असा २०१७ चा महा. ६.

केला आहे) याच्या कलम २ मध्ये, खंड (८) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-----

""(८) ""कुलपती"", ""प्र-कुलपती"" व ""कुलगुरू"" याचा अर्थ, अनुक्रमे, विद्यापीठाचे कुलपती, सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २ ची सुधारणा.

प्र-कुलपती व कुलगुरू, असा आहे ;"".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ९ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल,----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यामध्ये कलम ९क समाविष्ट करणे.

'' ९क. (१) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, विद्यापीठाचा प्र-कुलपती असेल आणि कुलपतीच्या अनुपस्थितीमध्ये विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवील.

प्र-कुलपती आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.

(२) प्र-कुलपती, विद्यापीठाच्या विद्याविषयक व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असणारी कोणतीही माहिती मागवील आणि अशा मागणीचे विद्यापीठाकडून अनुपालन करण्यात येईल.

(३) प्र-कुलपती, कुलपती लेखी आदेशाद्वारे सोपवील अशा कुलपतीच्या अधिकारांचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील आणि असे अधिकार सोपविणे हे, अशा आदेशामध्ये विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा निबर्ंधाच्या व शतर्ींच्या अधीन असेल.".

४. मुख्य अधिनियमाच्या कलम १० मध्ये, खंड (१३) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

'' (१३क) संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन;".

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १० ची सुधारणा.

५. मुख्य अधिनियमाच्या कलम ११ मध्ये,----

(१) पोट-कलम (३) मधील,----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ११ ची सुधारणा.

(क) खंड (क) मध्ये,----

(एक) '' कुलपतीला योग्य अशा नावांची " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाला योग्य अशा नावांची " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :----

'' (चार) राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाचे राज्यातील सांविधिक सार्वजनिक

विद्यापीठांचे दोन माजी कुलगुरू.";

(ख) खंड (ग) मधील, '' समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य " या मजकुरानंतर, "विद्यमान अध्यापक किंवा अधिकारी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य या नात्याने, " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(ग) खंड (घ) मध्ये, '' तीन " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(घ) खंड (ङ) मध्ये, '' कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाण्यासाठी कुलपतीच्या विचारार्थ " या मजकुराऐवजी, " राज्य शासनाकडे, " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ३

(२) पोट-कलम (४) ऐवजी, पुढील पोट-कलमे दाखल करण्यात येतील :----

'' (४) राज्य शासनास, कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यासाठी, समितीने शिफारस केलेल्या नामिकेमधून कुलपतीला दोन व्यक्तींच्या नावांची शिफारस करता येईल :

परंतु, जर राज्य शासनाने अशाप्रकारे शिफारस केलेल्या व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीस मान्यता दिली नाही तर, त्यास, त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून नवीन नामिका मागविता येईल.

(४क) कुलपती, राज्य शासनाने पाठविलेल्या नामिकेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीची तीस दिवसांच्या आत कुलगुरू म्हणून नियुक्ती करील.".

६. मुख्य अधिनियमाच्या कलम १३ मधील, पोट-कलम (६) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----

'' (६) कुलपती, कुलगुरूने राज्य शासनाला सुचविलेल्या नावांमधून राज्य शासनाने शिफारस केलेल्या

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १३ ची सुधारणा.

तीन नावांच्या नामिकेमधून, विद्यापीठासाठी प्र-कुलगुरूची नियुक्ती करील.".

७. मुख्य अधिनियमाच्या कलम २४ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यामध्ये कलम २४क समाविष्ट करणे.

'' २४क. (१) विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचा प्रमुख हा, पदसिद्ध मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन संचालक असेल.

संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन.

(२) जेव्हा मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन संचालकाचे पद रिक्त होईल किंवा संचालक, आजारपण किंवा अनुपस्थिती या कारणाने किंवा इतर कोणत्याही कारणाने आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा, कुलगुरू, नवीन संचालक पद ग्रहण करेपयर्ंत, किंवा यथास्थिति, संचालक कामावर परत रूजू होईपयर्ंत, संचालक म्हणून स्थानापन्न करण्याकरिता, विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागातील अध्यापकांमधून योग्य व्यक्तीची नियुक्ती करील.

(३) संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन पुढील अधिकारांचा वापर करील व पुढील कर्तव्ये पार पाडील :----

(क) शिक्षणाचे व संप्रेषणाचे माध्यम म्हणून मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करणे ; (ख) अन्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिसंस्था, खाजगी विद्यापीठे, अशासकीय संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्या सहयोगाने विविध विषयांतील पुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी उपाययोजना करणे ;

(ग) मराठी भाषा व साहित्य समृद्ध करण्यासाठी व त्यांचा प्रसार करण्याकरिता माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाच्या विस्तृत वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करणे ;

(घ) मराठी भाषेचा इतर भाषांशी असलेला सांस्कृतिक व भाषाशास्त्रीय संबंध यांवरील मराठी भाषेतील संशोधनास चालना देण्यासाठी, आंतर-सांस्कृतिकता लक्षात घेऊन, इतर भाषांतील साहित्याचा मराठी भाषेत अनुवाद करण्याचे कार्य करण्यासाठी उपाययोजना करणे ;

(ङ) महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठामध्ये मराठी भाषेतील व्यावसायिक व उपयोजित स्वरूपाच्या पाठयक्रमांना चालना देणे ;

(च) मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळाची उद्दिष्टे पार पाडता यावीत म्हणून विद्यापीठ प्राधिकरणांद्वारे, त्यास नेमून देण्यात येईल असे इतर कोणतेही काम हाती घेणे ;

(छ) या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये विहित केलेल्या किंवा कुलगुरुने किंवा प्र-कुलगुरुने त्यास वेळोवेळी, नेमून दिलेल्या अशा इतर अधिकारांचा वापर करणे आणि अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.".

भाग पाच-४८----१-अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ८. मुख्य अधिनियमाच्या कलम २६ मधील, खंड (१७) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येतील :----

'' (१७क) मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळ ;

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २६ ची सुधारणा.

(१७ख) समान संधी मंडळ ;".

९. मुख्य अधिनियमाच्या कलम २८ मध्ये,----

(१) पोट-कलम (२) मधील,----

(क) खंड (क) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २८ ची सुधारणा.

'' (कक) प्र-कुलपती ;";

(ख) खंड (ठ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

'' (ठक) संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळ ;";

(ग) खंड (प) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येतील :----

'' (पक) राष्ट्रीयदृष्टया महवाच्या संस्थांचे व राष्ट्रीय प्रयोगशाळांचे संचालक किंवा प्रमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षण, सामजिक कार्य, संस्कृती, क्रीडा, साहित्य व सहकार चळवळ यांतील पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, उल्लेखनीय योगदान असलेला पर्यावरणवादी, महिलांचे हक्क व सबलीकरण यांच्या प्रचालनासाठी कार्य केलेल्या राष्ट्रीय लौकिक प्राप्त असलेल्या व्यक्ती, संप्रेषण परिसंस्थांचा किंवा शैक्षणिक परिसंस्थांचा प्रमुख किंवा संचालक अथवा राष्ट्रीय वृत्तपत्राचा किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाचा संपादक किंवा पुरस्कार विजेता पत्रकार असतील, अशा राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच व्यक्ती ;

(पख) राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाचा, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, जागतिक विजेतेपद स्पर्धा (वल्र्ड चॅम्पीयनशीप), एशियाड किंवा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार विजेता यांमधील एक खेळाडू ;

(पग) राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी असलेली सामाजिक कार्य क्षेत्रातील एक व्यक्ती ;";

(२) पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----

'' (३) सर्वसाधारणपणे, कुलपती हा, अधिसभेच्या अध्यक्षस्थानी असेल आणि त्याच्या अनुपस्थितीत, प्र-कुलपती आणि प्र-कुलपतीच्या अनुपस्थितीत, कुलगुरू हा अध्यक्षस्थानी असेल.".

१०. मुख्य अधिनियमाच्या कलम ३० मध्ये, पोट-कलम (४) मधील, खंड (ट) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येतील :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ३० ची सुधारणा.

'' (टक) राष्ट्रीयदृष्टया महवाच्या परिसंस्थेचा व राष्ट्रीय प्रयोगशाळांचा संचालक किंवा प्रमुख, पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, पर्यावरण, महिला विकास आणि संप्रेषण व प्रसार माध्यमे या क्षेत्रातील राष्ट्रीय- स्तरावरील मान्यताप्राप्त किंवा राष्ट्रीय पुरस्कार विजेता यांमधून राज्य शासनाद्वारे नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य ;

(टख) राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी असलेली सामाजिक कार्य क्षेत्रातील एक व्यक्ती ;"".

११. मुख्य अधिनियमाच्या कलम ६० नंतर, पुढील कलमे समाविष्ट करण्यात येतील :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यामध्ये कलमे ६०क व ६०ख समाविष्ट करणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ५

'' ६०क. (१) राज्याची राजभाषा म्हणून तसेच जनतेच्या संपर्काची स्थानिक भाषा म्हणून मराठी भाषेचे जतन व विकास करण्यासाठी एक मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळ असेल.

मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळ.

(२) मंडळ, पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :----

(क) प्र-कुलगुरू — अध्यक्ष ;

(ख) संचालक, राज्य मराठी विकास संस्था किंवा तिची नामनिर्देशित व्यक्ती ;

(ग) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित करावयाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा एक माजी अध्यक्ष ;

(घ) कुलगुरूद्वारे नामनिर्देशित करावयाचे मराठी भाषा व साहित्य यांचे विकास करण्याचे काम करणा-या नागरी समाजाचे किंवा संघटनांचे दोन सदस्य ;

(ङ) विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागामधील विभाग प्रमुखाव्यतिरिक्त एक वरिष्ठतम प्राध्यापक ;

(च) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा संलग्न महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाचा एक विभाग प्रमुख ;

(छ) संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन — सदस्य-सचिव.

(३) मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :----

(क) शिक्षणाचे व संदेशवहनाचे माध्यम म्हणून मराठीस प्रोत्साहन देणे ;

(ख) विद्याथ्यार्ंसाठी मुद्रित स्वरूपात व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्रोत साहित्य म्हणून मराठी भाषेमध्ये पाठयपुस्तके तयार करणे ;

(ग) विद्याथ्यार्ंकरिता शैक्षणिक अभिजात साहित्य कृतीचा मुद्रित स्वरूपामध्ये व इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये विशेषत: इंग्रजी व इतर आधुनिक भाषांमधून मराठीमध्ये अनुवाद करणे ;

(घ) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिसंस्था, खाजगी विद्यापीठे, अशासकीय संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्या सहयोगाने विविध विषयामधील अन्य भाषेतील पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचे काम हाती घेणे ;

(ङ) मराठी भाषा व साहित्य समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा विस्तृत वापर करणे ;

(च) मराठी भाषेचा इतर भाषांशी असलेला सांस्कृतिक व भाषाशास्त्रीय संबंध यांवरील मराठीतील प्रगत संशोधन हाती घेणे, आंतर-सांस्कृतिकता लक्षात घेऊन, इतर भाषांतील साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचे कार्य करणे ;

(छ) मराठीतील संकल्पनात्मक, समीक्षात्मक, सर्जनात्मक विचारांना आणि सिद्धांताना प्रोत्साहन देणे ;

(ज) महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमार्फत मराठी भाषेतील व्यावसायिक व उपयोजित स्वरूपाचे पाठयक्रम तयार करणे व उपलब्ध करून देणे ;

(झ) विविध प्रदेशांमधील मराठी भाषेच्या विभिन्नतेचे संशोधन करणे ;

(ञ) अहवाल, प्रबंधिका, पुस्तके, संशोधन खंड मराठीमध्ये प्रसिद्ध करणे सुलभ करणे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३

समान संधी मंडळ.

६०ख. (१) प्रत्येक विद्यापीठात एक समान संधी मंडळ असेल, जे, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी आणि समाजातील दुर्बल घटकांचे विविध प्रवर्ग, अल्पसंख्याक, महिला, एलजीबीटीक्युआयए (समलिंगी संबंध असणारी स्त्री (लेस्बीयन), समलिंगी संबंध असणारा पुरुष (गे), उभयलिंगी संबंध असणा-या व्यक्ती (बाय सेक्शुअल), तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरुष (क्यूर), आंतरलैंगिक, अलैंगिक व इतर) व दिव्यांग व्यक्ती यांमधील विद्यार्थी यांचे कल्याण, विकास व सामाजिक सुरक्षा यांच्या संबंधात विविध विकास व कल्याण कार्यक्रम, योजना, विनियम व धोऱणे यांचे नियोजन करणे, संनियंत्रण करणे, त्याबाबत मार्गदर्शन करणे आणि त्याचे समन्वयन करणे, भारताच्या संविधानामध्ये जतन केलेल्या स्वातंय, धर्मनिरपेक्षता, समानता, समान संधी, प्रतिष्ठा व सामाजिक न्याय या मूल्यांना चालना देणे व ती प्रस्थापित करणे आणि तसेच विद्यापीठातील सर्वसमावेशक शिक्षणासाठी धोरण, कार्यपद्धती व प्रथा तयार करणे, यासाठी जबाबदार असेल.

(२) मंडळामध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :----

(क) प्र-कुलगुरू — अध्यक्ष ;

(ख) आयुक्त, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य किंवा उपायुक्ताच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली त्याची नामनिर्देशित व्यक्ती ;

(ग) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, महिला, एलजीबीटीक्युआयए (समलिंगी संबंध असणारी स्त्री (लेस्बीयन), समलिंगी संबंध असणारा पुरुष (गे), उभयलिंगी संबंध असणा-या व्यक्ती (बाय सेक्शुअल), तृतीथपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरुष (क्यूर), आंतरलैंगिक, अलैंगिक व इतर) किंवा दिव्यांग व्यक्ती या प्रवर्गातील प्रत्येकी एकजण असे कुलगुरूद्वारे नामनिर्देशित करावयाचे विद्यापीठ विभागांतील नऊ वरिष्ठतम अध्यापक ;

(घ) समान कालावधीकरिता आळीपाळीने, कुलगुरूने नामनिर्देशित केलेले संलग्न महाविद्यालयांचे दोन वरिष्ठ प्राचार्य, त्यापैकी एक प्राचार्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागास वर्ग यांच्यामधील असेल ;

(ङ) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, महिला, एलजीबीटीक्युआयए (समलिंगी संबंध असणारी स्त्री (लेस्बीयन), समलिंगी संबंध असणारे पुरुष (गे), उभयलिंगी संबंध असणा-या व्यक्ती (बायसेक्शुअल), तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरूष (क्यूर), आंतरलैंगिक, अलैंगिक व इतर) आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यामधून कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा विद्यापीठ विभागातील एक विद्यार्थी ;

(च) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा एक विख्यात समाज सेवक ;

(छ) कुलसचिव — सदस्य-सचिव.

(३) समान संधी मंडळ, एका वर्षात किमान तीन बैठका घेईल.

(४) समान संधी मंडळास पुढील अधिकार व कर्तव्ये असतील :----

(क) भारताच्या संविधानात जतन केलेल्या स्वातंय, धर्मनिरपेक्षता, समानता, समान संधी, प्रतिष्ठा व सामाजिक न्याय या मूल्यांना चालना देण्यासाठी आणि ते प्रस्थापित करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासावरील मूलभूत अभिवृत्ती आणि सारभूत मूल्ये यांस चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करणे ;

(ख) अध्यापन, अध्ययन, प्रशिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या इतर आधारभूत सेवा सुविधा यांमध्ये समन्याय वाटप व समान संधी यांस चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करणे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ७

(ग) समाजातील दुर्बल घटकांमध्ये स्वाभिमान व प्रतिष्ठेची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यास चालना देण्यासाठी आणि तसेच समाजातील लिंगभाव समानतेस व संवेदनशीलतेस चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करणे ;

(घ) विद्यापीठातील सर्वसमावेशक शिक्षणासाठी धोरण, कार्यपद्धती व प्रथा निर्माण करणे आणि विद्यापीठाची प्राधिकरणे किंवा मंडळे आणि विद्यापीठाने, वेळोवेळी घटित केलेल्या विविध समित्या तयार करताना, त्यात दुर्बल घटकांचा सहभाग असल्याची सुनिश्चिती करणे ;

(ङ) उच्च शिक्षण परिसंस्थामध्ये समन्यायतेस चालना देण्यासंबंधीची आणि भरती व प्रवेश यांमधील आरक्षणासंबंधीची शासनाची धोरणे, विनियम किंवा त्याबाबतीत वेळोवेळी काढलेले आदेश यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे संनियंत्रण करणे व मूल्यमापन करणे ;

(च) राज्य शासनाने वेळोवेळी निदेश दिल्याप्रमाणे, समाजातील दुर्बल घटकांतील विविध प्रवगार्ंच्या व अल्पसंख्याकांच्या कल्याणाच्या संबंधातील राज्य शासनाच्या सर्वसाधारण धोरणाच्या अंमलबजावणीचे संनियत्रंण करणे व मूल्यमापन करणे ;

(छ) विद्यापीठाच्या दुर्बल घटकांतील विद्याथ्यार्ंच्या व कर्मचा-यांच्या सवार्ंगीण विकासासाठी व कल्याणासाठी कृती आराखडा तयार करणे ;

(ज) दुर्बल घटकांच्या विकासासाठी व कल्याणासाठी शासकीय व अशासकीय निधी पुरवठा करणा-या अभिकरणांनी मंजूर केलेल्या विविध योजनांच्या किंवा प्रकल्पांच्या बाबतीत विद्यापीठाने, संलग्न महाविद्यालयांनी व मान्यताप्राप्त परिसंस्थांनी केलेल्या अनुदानांच्या वापराचे संनियंत्रण करणे, मूल्यमापन करणे व मूल्यनिर्धारण करणे आणि उचित कारवाईकरिता व्यवस्थापन परिषदेला शिफारशींसह अहवाल सादर करणे ;

(झ) मंडळाने तयार केलेल्या कृती आराखडयाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत वित्तीय अंदाज पत्रक तयार करणे आणि ते विचारार्थ, वित्त व लेखा समितीकडे पाठविणे ;

(ञ) कुलगुरुने केलेल्या निर्देशांवरून मंडळाने घटित केलेल्या समितीने पुढील बाबतीत करावयाच्या चौकशीची व्यवस्था करणे,----

(एक) जात, वंश, धर्म, रंग व लिंग यांवर आधारित भेदभावाविरोधात विद्यापीठाच्या व संलग्न महाविद्यालयांच्या विद्याथ्यार्ंकडून, अध्यापकांकडून व अध्यापकेतर कर्मचा-यांकडून प्राप्त झालेली कोणतीही तक्रार ;

(दोन) दुर्बल घटकांच्या विकासासाठी व कल्याणासाठी शासकीय व अशासकीय संघटनांनी मंजूर केलेल्या विविध योजनांच्या व प्रकल्पांच्या बाबतीत, विद्यापीठाने व संलग्न महाविद्यालयांनी केलेल्या अनुदानाच्या वापराचे मूल्यमापन व मूल्यनिर्धारण ;

(ट) विद्यापीठाची व मंडळाची उद्दिष्टे पार पाडता यावी म्हणून कुलगुरूकडून सोपविण्यात येईल असे इतर कोणतेही काम हाती घेणे.".

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३

उद्देश व कारणे यांचे निवेदन

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापिठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ६) यामध्ये, राज्यातील कृषीतर व वैद्यकीयेतर सार्वजनिक विद्यापीठे यांच्या नियमनाची तरतूद आहे. भारत सरकारने, २० जुलै २०२० रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० प्रस्तुत केले आहे. उक्त धोरण विचारात घेता आणि तसेच सार्वजनिक विद्यापीठांची नियमन संरचना बळकट करण्यासाठी आणि उच्च शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनास, उक्त अधिनियमात सुधारणा करणे इष्ट वाटते.

२. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या तरतुदी आणि विद्यापीठांच्या नियमन संरचनेचे विविध पैलू, उच्च शिक्षण, अध्ययन व संशोधन विचारात घेता, महाराष्ट्र शासनाने, उक्त अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. उक्त समितीने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणांशी संबंधित असणा-या शिफारशींचा अंतर्भाव असलेल्या तिच्या अहवालाचा भाग-एक, शासनाच्या विचारार्थ सादर केलेला आहे. उक्त समितीच्या शिफारशी विचारात घेता, उक्त अधिनियमामध्ये यथोचित सुधारणा करणे शासनाला इष्ट वाटते.

३. प्रस्तावित विधेयकाची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत,-----

(क) प्र-कुलपतीच्या तरतुदी ;

(ख) संचालक, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन या पदाच्या तरतुदी ;

(ग) कुलगुरुची नियुक्ती करण्याची रीत आणि नामिकेची शिफारस करणा-या समितीची पुनर्रचना याबाबतच्या तरतुदी ;

(घ) मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन मंडळ आणि समान संधी मंडळ घटित करण्याच्या तरतुदी ;

(ङ) राज्य शासनाद्वारे अधिसभेवरील व व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी तरतुदी.

४. वरील उदिष्टे साध्य करणे, हा या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,

उदय सामंत,

दिनांक २१ डिसेंबर, २०२१.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.

विधान भवन : मुंबई, दिनांक २३ डिसेंबर, २०२१

राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.