महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ [पृष्ठे ७, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
अलिबाग नगरपरिषद
सूचना
[महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये]
क्रमांक ३०८८, दिनांक १३ डिसेंबर २०२१
ज्याअर्थी, अलिबाग शहराची सुधारीत विकास योजना (दुसरी सुधारणा) शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/१४९/सी.आर.-३८/ १२/यु.डी.१२, दिनांक ३० मार्च, २०१३ नुसार भागश: (ई.पी.क्र.१ ते २९ वगळून) मंजूर झालेली असून, वगळलेल्या भागाची विकास योजना (ई.पी.क्र.१ ते २९) नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१६/५६३/प्र.क्र.२४१/२०१६/नवि-१२, दिनांक ३० नोव्हेंबर, २०१६ नुसार मंजूर झालेली आहे;
आणि ज्याअर्थी, अलिबाग नगपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. १००४, दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर- रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये अलिबाग शहराच्या मंजूर विकास योजनेत खालीलप्रमाणे बदल करण्याचे ठरविले आहे.
(१) मौजे अलिबाग, ता. अलिबाग येथील सि.स.नं. ६५१ या जागेमध्ये मंजूर विकास योजनेमधील विद्यमान, 'शाळा' (School) याप्रमाणे दर्शविलेल्या जागेचे नामाभिधान 'मुस्लिम समाजाकरीता समाज हॉल' (Community Centre) करीता बदल करणे.
त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये ही जाहिर सूचना देण्यांत येत आहे की, ज्यांना उक्त्त बदलांबाबत हरकती अगर सूचना दयावयाच्या असतील त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे मुदतीत लेखी स्वरुपात नगरपरिषदेकडे सादर कराव्यात म्हणजे या फेरफाराचे प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी त्यांचा विचार केला जाईल.
उक्त्त फेरफार दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयांत कामकाजाचे वेळांत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यांत आलेला आहे.
प्रशांत म. नाईक, अंगाई साळुंखे,
अलिबाग, अध्यक्ष,
मुख्याधिकारी, दिनांक १३ डिसेंबर २०२१. अलिबाग नगरपरिषद अलिबाग नगरपरिषद.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ALIBAG MUNICIPAL COUNCIL
Notice
[Under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966]
No. 3088, Dated 13th December 2021
Whereas, Development Plan of Alibag (Second Revised) has been sanctioned by the State Govt. vide Urban Development Department's Notification bearing No. TPS-1712/149/C.R.38/12/UD-12, Dated 30th March 2013 Partly (Excluding E.P. No. 1 to 29) and Development Plan of excluded part (E.P. No. 1 to 29) has been sanctioned by the state government vide Urban Development Department's Notification bearing No. TPS-1716/563/C.R.241/ 2016/UD-12, Dated 30th November 2016;
And whereas, the Alibag Municipal Council vide general body resolution No. 1004, dated 22nd November 2021 has decided to make modifications under section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development Plan of Alibag as below:—
(1) To change the designation of land under C.T.S. No 651, Moje Alibag from 'School' to 'Community Centre' for Muslim community.
Now therefore, vide this notice published under section 37(1) of the Maharashtra Regional and Town Plan- ning Act, 1966, it is informed that those who want to give suggestions or objections in respect of the said modifi- cations may submit to the Alibag Municipal Council in writing within a period of 30 days from the date of Publica- tion of the notice in the Maharshtra Goverment Gazette so that those could be considered before finalizing the proposal of said modifications.
A part plan of Development Plan showing the said the modifications is kept open for the inspection of the public during office hours in the office of the Alibag Municipal Council.
PRASHANT M. NAIK, ANGAI SALUNKHE , Alibag, President, Chief Officer, Dated : 13th December 2021. Alibag Municipal Council. Alibag Municipal Council.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३जिल्हा परिषद, पालघर
अधिसूचना
क्रमांक पाजिप/साप्रवि/प्रशा/८६९
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२ अन्वये महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे संबंधित जे नियम १९६४ व सुधारीत नियम, १९६६ व १९८१ च्या अनुषंगाने व महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील परिपत्रक क्रमांक संगणक-१०९५/सीआर/२९५४/५७, दिनांक २४ जानेवारी १९९५ द्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पालघर जिल्हा परिषदेचा सन २०२०-२०२१ चा वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार ब, असाधारण क्रमांक १५३ ग्रामविकास व जलसंधारण विभाग, ३१ जुलै २०१४ रोजीच्या अधिसूचनेस अधिन राहून पालघर जिल्हा परिषदेच्या वर्ाषिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनी दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता दिली आहे. सदर वर्ाषिक प्रशासन अहवाल, महाराष्ट्र जिल्हा परिषदा, व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ चे नियम ९ अन्वये प्रसिद्ध करणेत येत आहे.
पालघर, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१.
सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३जिल्हा परिषद, अमरावती
वर्ाषिक प्रशासन अहवाल
सन २०२०-२१
अधिसूचना
क्रमांक जिप/साप्रवि/नियोजन/१२२२६/२०२१
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम १९६४ मधील नियम ९ व (सुधारणा) नियम १९८१ अन्वये मी, अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र. १०, दिनांक ३० सप्टेंबर २०२१ नुसार वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०२०-२१ ला अंतिम मंजुरी प्रदान केल्यानंतर सदरहू तारखेस प्रसिद्ध करीत आहे.
अमरावती, दिनांक १४ डिसेंबर २०२१.
अविश्यांत पंडा (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३Serial No. M-2175
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : Bombay House 24, Homi Mody Street, Mumbai 400 001
Public Notice
NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities, should lodge such claim with the Company as its, Registered office within 15 days from this date else the Company will proceed to issue the duplicate certificate(s), without further intimation.
Name of the Kind of Securities No. of Distinctive Holder(s) and and Face Value Securities Number(s) Jt. Holder(s), if any (1)
(2) (3)
(4) Mamta Piyush Goradia & Equity Shares of 400 38077391-38077790 Piyush Kanaiyalal Goradia Face Value of Rs.1 each
Mumbai, MAMTA PIYUSH GORADIA, dated 15th December 2021. PIYUSH KANAIYALAL GORADIA,
Name(s) of the Holder(s)/Applicant(s).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
मर्ुतिजापूर रोड, अकोला, ता., जि. अकोला
क्र.आस्था/३०९२/२०२१
चौकशीची जाहीर नोटीस
(परिशिष्ट XXIIIA)
चौ.क्र.---३६/२०२१ कलम किरकोळ
सर्व संबंधित लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मा. सहायक संस्था निबंधक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अकोला, विभाग, अकोला यांचे कार्यालयात (१) भारती फाऊन्डेशन, अकोला, ता., जि. अकोला एफ--२००५१ (अकोला), (२) यशोदीप शिक्षण प्रसारक व जनकल्याण समिती, अकोला एफ-२१३१ (अकोला), (३) आकाश शिक्षण संस्था, अकोला एफ--३७१२ (अकोला) या न्यासामध्ये एकत्रीकरण करणेबाबत अर्ज दिनांक ८ मार्च २०२१ या रोजी आल्यामुळे संस्थेचे संस्था नोंदणी अधिनियम, १८६० चे कलम किरकोळ अन्वये श्री. राजेश हिरालाल भारती यांनी नोंदणीकरिता अर्ज केला असून सदर न्यासबाबतीत काही आक्षेप/हरकत असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत या कार्यालयात अर्जदाराने सादर केलेल्या रेकॉर्डचे निरीक्षण करून हरकत किंवा आक्षेप नोंदवावा. सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या हरकत/आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.
ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. सहायक संस्था निबंधक, अकोला विभाग, अकोला यांच्या शिक्यानिशी आज रोजी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ ला दिली.
अकोला, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१.
ज्ञा. पु. गवते, अधीक्षक, सार्व. न्यास नोंदणी कार्यालय, अकोला.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
मर्ुतिजापूर रोड, अकोला, ता., जि. अकोला
क्र.आस्था/३०७६/२०२१
चौकशीची जाहीर नोटीस
(परिशिष्ट XXIIIA)
चौ.क्र.---१२/२०२१ कलम ५० अ(२)
सर्व संबंधित लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मा. सहायक धर्मादाय आयुक्त्त-२, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अकोला विभाग, अकोला यांचे कार्यालयात (१) भारती फाऊन्डेशन, अकोला, ता., जि. अकोला एफ--२००५१ (अकोला), (२) यशोदीप शिक्षण प्रसारक व जनकल्याण समिती, अकोला एफ-२१३१ (अकोला), (३) आकाश शिक्षण संस्था, अकोला एफ--३७१२ (अकोला) या न्यासामध्ये एकत्रीकरण करणेबाबत अर्ज दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ या रोजी आल्यामुळे संस्थेचे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५० अ (२) अन्वये श्री. राजेश हिरालाल भारती यांनी नोंदणीकरिता अर्ज केला असून सदर न्यासा बाबतीत काही आक्षेप/हरकत असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत या कार्यालयात अर्जदाराने सादर केलेल्या रेकॉर्डचे निरीक्षण करून हरकत किंवा आक्षेप नोंदवावा सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या हरकत/आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.
ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त्त, अकोला विभाग, अकोला यांच्या शिक्यानिशी आज रोजी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ ला दिली.
अकोला, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१.
ज्ञा. पु. गवते, अधीक्षक, सार्व. न्यास नोंदणी कार्यालय, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.