RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ७, अंक १७] मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१/अग्रहायण ९, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.--- मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी
१-३ अध्यादेश.
नगर विकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३० नोव्हेंबर २०२१.
MAHARASHTRA ORDINANCE No. XIII OF 2021.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT.
सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.
मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
१८८८ चा ३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
(१)
भाग चार---३०-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर ३०, २०२१/अग्रहायण ९, शके १९४३ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----
१. (१) या अध्यादेशास, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२१, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (१) च्या, खंड (अ) मधील १८८८ चा ३.
" दोनशे सत्तावीस " या मजुकाराऐवजी " दोनशे छत्तीस " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ ची सुधारणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर ३०, २०२१/अग्रहायण ९, शके १९४३ ३निवेदन
मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम ५ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग निवडणुकीत, प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येची तरतूद आहे. प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांची विद्यमान संख्या, २००१ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित आहे. २०११ च्या जनगणनेनंतर, प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येत बदल केलेला नाही.
२. २००१ ते २०११ या दशकामधील २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. नागरी लोकसंख्येमधील ही वाढ आणि जलदगतीने होणारे नागरीकरण विचारात घेता, वाढलेल्या लोकसंख्येस महानगरपालिकेमध्ये त्या प्रमाणात प्रतिनिधिव मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील प्रत्यक्षपणे निवडून द्यावयाच्या पालिका-सदस्यांच्या संख्येत वाढ करणे इष्ट वाटते. म्हणून, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, मुंबई महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; आणि म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक २७ नोव्हेंबर २०२१.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महेश पाठक, शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.