Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन संकीर्ण (साप्ताहिक राजपत्र) दि. ६ जानेवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२२, बॅच नं. २०५८

Published 06 January 2022

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35827

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ८ अंक १ ]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी ६-१२ , २०२२ / पौष १६-२२ , शके १ ९४३

[पृष्ठे ६ , किंमत: रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

ठाणे महानगरपालिका, ठाणे क्रमांक ठामपा / अति.वि. / आयुक्त/ ८६६/ २०२१

अधिसूचना

ज्याअर्थी , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६० आणि कलमे २६१ , २६४ , २६७ व ४७८ यांचे प्रयोजनाकरिता आयुक्त यांनी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पदनिर्देशित अधिकारी म्हणून महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकाऱ्यास पदनिर्देशित करावयाचे आहे .

ज्याअर्थी , पदनिर्देशित अधिकाऱ्यांची अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा स्थानिक क्षेत्रावर अधिकारिता असेल आणि वेगवेगळ्या स्थानिक क्षेत्राकरिता वेगवेगळे अधिकारी पदनिर्देशित करावयाचे आहेत .

ज्याअर्थी , उपरोक्त तरतुदीनुसार अधिसूचना क्रमांक ठामपा/ अति.वि./ आयुक्त/ ९ १४ / २०१७ , दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ अन्वये दिवा प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्राकरिता संबंधित प्रभाग समिती सहायक आयुक्त यांची व दिवा प्रभाग समिती क्षेत्राकरिता कार्यालयीने अधीक्षक यांची " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून नियुक्ती करण्यात आली होती .

ज्याअर्थी , दिवा प्रभाग समिती क्षेत्रासाठी सहायक आयुक्त यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी , मी , डॉ . विपीन शर्मा , महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्याची त्यांचे पदनामासमोर दर्शविलेल्या क्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील उक्त कलमांच्या प्रयोजनाकरिता नियुक्ती करीत आहे .

अ.क्र.

स्थानिक क्षेत्र

१ पदनिर्देशित अधिकारी सहायक आयुक्त, दिवा प्रभाग समिती दिवा प्रभाग समिती ( प्रभाग क्र. २७ , २८ , २ ९ , ३३ ) ठाणे,

डॉ. विपिन शर्मा ( भा.प्र.से. ) , महापालिका आयुक्त, दिनांक २ ९ डिसेंबर २०२१ .

ठाणे महानगरपालिका , ठाणे .

(१)

भाग दोन (संकीर्ण ) -१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ६-१२ , २०२२/पौष १६-२२, शके १९ ४३

महापारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

No. MSETCL /CO / PS / Scheme - I/ RE - ORC / PN / 7885

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६ /प्र.क्र.३१२ / ऊर्जा/ ४ , दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८० ) नुसार , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार , खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डेडीकेटेड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी अंतर्गत महापारेषणच्या देखीरेखीखाली काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे . या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण , वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं . मर्या. च्या समन्वय , संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल . जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नविन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे .

(अ) पुणे जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. चाकण फेज- II , वासुली गाव , ता. खेड येथील मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा . लि. यांना २२० के.व्ही. क्षमतेवर १० मे . वॅ . विद्युत पुरवठा करणेबाबत. मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा. लि . यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या देखरेखीखाली करावयाची कामे . ( १ ) गँट्री पायाभरणी , उपकरणे पायाभरणी , कंट्रोल रुम, मिटरिंग रुम , केबल ट्रेंच, मेटल स्प्रेडींग व जी . आय. पाईप इ . सहित २२० के.व्ही . उपकेंद्राची उभारणी मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा.लि. यांच्या जागेत करणे. ( i ) मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा.लि. च्या जागेत २२० के.व्ही. वाहिनी बे उभारणे -२ नं. ( ii ) मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा.लि. च्या जागेत मीटरींग सीटी, पीटी ( मेन व चेक ) , आयसोलेटर उभारणे -१ नं . ( एम.ई.आर.सी. मिटरींग कोड २०१ ९ अन्वये मेन व चेक मीटर सहित ) ( iii ) २२० व्होल्ट व ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर ( iv ) एफ . ओ . टी . उपकरणे-३ नं. (v ) मे. टेट्रा पॅक इंडिया प्रा.लि. उपकेंद्रात बस बार प्रोटेक्शन उभारणे ( vi ) २२० के.व्ही. पीटी बे -१ नं. ( २ ) २२० के .व्ही . ब्रीजस्टोन चाकण फेज- II वाहिनीवर मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा.लि. उपकेंद्रापर्यंत लिलो वाहिनी उभारणे -१०० मीटर्स ( ३ ) २२० के.व्ही . ब्रीजस्टोन चाकण फेज- II वाहिनीवर अस्तित्वात असलेली २४ फायबर ओ.पी.जी. डब्ल्यू. वाहिनी बदलून ४८ फायबर ओ.पी.जी. डब्ल्यू. वाहिनी उभारणे-५ कि.मी. ( ४) २२० के.व्ही . ब्रीजस्टोन चाकण फेज- II वाहिनीच्या लिलो पॉईंटपासून मे . टेट्रा पॅक इंडिया प्रा . लि. च्या उपकेंद्रापर्यंत ओ.पी.जी. डब्ल्यू. वाहिनी उभारणे -१०० मीटर्स ( ५ ) एबीटी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे . ( ६ ) स्काडा प्रणाली उभारणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ७२०.५८ लाख इतका आहे .

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास , ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत , अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता ( योजना- I ) , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं . सी -१ ९, बांद्रा- कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व ) , मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते .

मुंबई,

दिनांक २८ डिसेंबर २०२१ .

नसीर कादरी , संचालक (प्रकल्प) .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ६-१२ , २०२२ /पौष १६-२२, शके १ ९ ४३

जिल्हा परिषद, जळगाव

क्रमांक साप्रवि/वाप्रअ/ आरआर/ ६५६/२०२१

जाहिरनामा

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल ) नियम, १ ९ ६४ मधील नियम ९ अन्वये , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , जळगाव जाहीर करतात की, जळगाव जिल्हा परिषदेचा सन २०२०-२०२१ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्र. ६४० , दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी मंजूर केला आहे .

डॉ. पंकज आशिया ( भा.प्र.से. ) , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , जळगाव.

भाग दोन ( संकीर्ण) -२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ६-१२ , २०२२/पौष १६-२२, शके १९ ४३

जिल्हा परिषद, धुळे

क्रमांक साप्रवि/ आस्था १ - ब/ ५८६/ २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ चे कलम १४२ , पोट-कलम ( ४ ) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १ ९ ६४ मधील नियम (६ ) अन्वये मी , वान्मथी सी. ( भा.प्र.से. ) , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे याद्वारे जाहीर करते की , धुळे जिल्हा परिषदेचा सन २०२०-२०२१ या वित्तीय वर्षाचा प्रशासन अहवालांस धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक २१३ , दिनांक १३ डिसेंबर २०२१ अन्वये मंजुरी दिली असून वरील नियमातील नियम ( ९ ) अन्वये सदरच्या अहवालास स्विकृती संबंधी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे .

धुळे ,

दिनांक २२ डिसेंबर २०२१ .

वान्मथी सी. (भा.प्र.से. ) , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ६-१२ , २०२२ /पौष १६-२२, शके १ ९ ४३

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

क्रमांक साप्रवि/नोंदणी / वाप्रअ कामकाज/२४०४/ २०२१

अधिसूचना

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा व तिच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समित्यांचा सन २०२०-२१ चा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल , महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ चे आधारे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, वार्षिक प्रशासन अहवाल नियम १ ९ ६४ व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणानुसार तयार करणेत आला असून , सदर अहवाल जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ७५ ९ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ने संमत करून तो दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे .

प्रजित प्र. नायर ( भा.प्र.से. ) , सिंधुदुर्ग,

दिनांक २५ डिसेंबर २०२१ .

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

६

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ६-१२ , २०२२/ पौष १६-२२, शके १९ ४३

BEFORE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL ( AUXI ) , SURAT Room No. 413 , New Court Building , Athwalins , Surat

MACP : 126/2015

Adv- R.V . Navdiya Applicant : Manishaben Kanjibhai Ghevariya

Add- 76 , Sarvoday nagar Udhana , Surat and

Flat No. 101 , A- 9 , Shantivihar Meera Road , East ( Thane) Maharashtra .

V/ s

Opponent : ( 1 ) Sumit Hariram Jadhav

Add- Sainath Chowk , Gavanpada , Chembur , Mumbai .

(3 ) Kavita Prabhakar Patil

Add- Fanas Pada , Vetarana, Po - Dahisar , Ta - Vasai , Dist . Thane , Maharashtra .

You , the Opponent No. 1 and 3 are hereby informed by this Public notice that the Scorpio Car No. MH - 04- ED - 8434 was your ownership , face an accident on 1st March 2015 Near Alipor Gam , Opposite Rajwadi Kathiyawadi Hotel , Surat . Hence , above applicants have file above petitions to get compensation under section 166 of M.V. Act .

You , the Opponent No. 1 , 3 inspite of repeated process of notice by Court and by R.P.A.D. are not served , hence by this notice you are informed that you the Opponent No. 1 , 3 must remain present before the Motor Accident Claim Tribunal (Auxi ) , Surat on 10th February 2022 at 10.30 a.m. personally or through Advocate under your instructions , failing which the same will be treated as your absence and the said application for Compensation shall be proceed ex - party and disposed off accordingly which , please note .

Signed and sealed today on this 27th December 2021 under my hand and seal of the court .

Compared by

Prepared by

By Order

H. K. MEGHAT ,

(Superintendent )

H.G. CHANDEL , (Assistant) M.A.C.T. ( Auxi ) , Surat .

M.A.C.T. ( Auxi ) , Surat .

S.R. PATEL , (Deputy Registrar) M.A.C.T. ( Auxi ) , Surat .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.